Health Tips : वर्कआऊट करताय तर अशी घ्या खाण्यापिण्याची काळजी...
Workout Health Tips :तुम्ही रोज किती वेळ वर्कआऊट करता आणि किती घाम गाळता, याने काहीही फरक पडत नाही. तुम्हाला तुमच्या वर्कआऊटचा परिणाम तोपर्यंत दिसू शकणार नाही, जोपर्यंत तुम्ही योग्य आहार घेत नाही.
Workout Health Tips : उत्तर आरोग्य आणि फिटनेससाठी अनेकजण रोज कित्येक तास वर्कआऊट करतात. मात्र फक्त वर्कआऊटनं हे साध्य होतं का? तर नाही. तुम्ही रोज किती वेळ वर्कआऊट करता आणि किती घाम गाळता, याने काहीही फरक पडत नाही. तुम्हाला तुमच्या वर्कआऊटचा परिणाम तोपर्यंत दिसू शकणार नाही, जोपर्यंत तुम्ही योग्य आहार घेत नाही. त्यामुळेच आम्ही आज तुम्हाला असे काही सुपरफूड सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या वर्कआऊटचा परिणाम दिसण्यास मदत होईल.
आपण वर्कआऊट करताय तर खालील गोष्टी आपण खायला हव्यातच...
केळी – स्नायूंना बळकटी येण्यासाठी केळी उपयुक्त ठरतात. त्यामुळे वर्कआऊटआधी केळी खाणं आवश्यक आहे.
ड्राय फ्रूट – सुका मेवा खाल्ल्याने तुम्ही दिवसभर एनर्जेटिक राहता. त्यामुळे वर्कआऊटआधी ड्राय फ्रूट खाणं चांगलं असतं.
ओट्स – ओट्समध्ये फायबर आणि कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे दिवसभर अंगात ऊर्जा राहण्यासाठी ओट्स खायला हरकत नाही.
कॉफी – वर्कआऊटआधी कॉफी पिणंही एक चांगला पर्याय आहे. कॉफी शरीरात इंधनाप्रमाणे काम करते.
फ्रूट स्मूदी – कार्बोहायड्रेट्स फ्रूट्सच्या स्मूदीमुळे शरीर कणखर आणि मजबूत बनण्यासाठी मदत होते. शिवाय, दिवसभर चेहऱ्यावर एकप्रकारचं तेज राहतं.
चणे – वर्कआऊटआधी प्रोटिन आणि कार्ब्स भरपूर प्रमाणात असलेले चणे खायला हवेत.
अंडी – अंडी खाल्ल्याने विशेषत: वर्कआऊटआधी अंडी खाल्ल्याने शरीराला एक वेगळी ऊर्जा मिळते.
कडधान्य – वर्कआऊटआधी आहारात कडधान्य असल्यास शरीराला फायद्याचं ठरतं.
पनीर – पनीरमध्ये साखरेचं प्रमाण कमी आणि प्रोटिन अधिक असतं. वर्कआऊटआधी पनीर खाणं हा चांगला पर्याय आहे.
चिकन आणि ब्राऊन राईस – संध्याकाळी आणि रात्री वर्कआऊटसाठी चिकन आणि ब्राऊन राईस हा पर्याय उत्तम आहे. यामधून शरीराला कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात मिळतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )