Women Health: नवरात्री पूजा दरम्यान 'मासिक पाळी' सुरू झाली तर? निराश होऊ नका! अनेक महिलांच्या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या
Women Health: महिलांची मासिक पाळी सुरू झाली की त्यांच्यासाठी चिंतेचा विषय बनतो. तुमच्याकडे नवरात्रीची पूजा सुरू असताना पाळी आली तर काय करावं? पूजा कशी करावी..जाणून घ्या
Women Health: अवघ्या देशभरात शारदीय नवरात्रौत्सवाला (Navratri 2024) मोठ्या उत्साहात सुरूवात झालीय. नवरात्र म्हटलं तर देवीची, शक्तीची पूजा... तिचं जागरण, गोंधळ, घटस्थापना या सारख्या धार्मिक गोष्टी आल्याच... हिंदू धर्मानुसार नवरात्रीते हे 9 दिवस पवित्रतेचे प्रतीक मानले जाते, अशात जर घरातील एका महिलेला मासिक पाळी आली तर काय कराव? देवीची पूजा कशी अखंडित ठेवता येईल? असे अनेक प्रश्न महिला वर्गाला पडतात. मासिक पाळी दरम्यान पूजा करणे अनेक महिलांसाठी आव्हानात्मक असू शकते, महिलांना मासिक पाळी आल्यास हा सण कसा साजरा करता येईल? जाणून घेऊया..
उपवास सुरू ठेवा
धार्मिक मान्यतेनुसार, जर तुमची मासिक पाळी नवरात्रीच्या दरम्यान सुरू झाली तर तुम्ही उपवास सुरू ठेवू शकता. अशा परिस्थितीत, देवीची पूजा कुटुंबातील अन्य सदस्य करू शकतात. जर तुम्ही याआधी उपवास केला असेल तर शेवटचा उपवास करून तुम्ही तुमचा संकल्प पूर्ण करू शकता. देवी दुर्गेची आरती आणि पूजा इतर कोणाकडून तरी करून घ्या.
देवी दुर्गेचे स्मरण करा
ज्या महिलांना नवरात्रीच्या काळात मासिक पाळी आली आहे किंवा येणार आहे, त्यांनी चिंता किंवा निराश होऊ नये. फक्त मनात देवी दुर्गेचे स्मरण करा आणि एकाग्र व्हा. यावर आई प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद नक्की देईल, अशी मनात मनोकामना ठेवा.
जर तुम्हाला मासिक पाळी येण्याची भीती वाटत असेल तर...
नवरात्रीत घटस्थापना किंवा कलश प्रतिष्ठापना केली जाते. मात्र महिलांनो.. जर तुम्हाला मासिक पाळी येण्याची भीती वाटत असेल तर तुम्ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करू नये, कारण हिंदू धर्मात त्यासाठी काही खास नियम आहेत. ज्या ठिकाणी कलश बसवला आहे ती जागा अत्यंत पवित्र ठेवणे आवश्यक आहे. धार्मिक मान्यतेनुसाक, जर कलश आधीच स्थापित केला असेल, तर तुम्ही मासिक पाळी दरम्यान त्यापासून अंतर राखले पाहिजे. कलशाचे पावित्र्य राखावे.
हेही वाचा>>>
Women Health: महिलाचं 'हेच' ते योग्य वय, ज्यानंतर मासिक पाळी थांबते! गर्भधारणेची शक्यताही कमी होते, जाणून घ्या..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )