Women Health: काय सांगता! नियमित मासिक पाळीसोबत अनेक महिला PCOS मुळे त्रस्त? WHO काय म्हणते? महिलांनो लक्ष द्या...
Women Health: काही तज्ज्ञांच्या मते, अनेक महिलांना दर महिन्याला मासिक पाळी आल्यानंतरही PCOS म्हणजेच पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमची समस्या उद्भवू शकते.
Women Health: वाढत्या वयानुसार, महिलांच्या शरीरात अनेक बदल होत जातात. अनेकदा महिला इतर जबाबदाऱ्यांमुळे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. महिलांच्या शरीरातील हार्मोन्सपैकी एक म्हणजे मासिक पाळी जो गर्भधारणेशी संबंधित आहे. जीवनशैलीतील बदलांमुळे योग्य वयाच्या आधी किंवा 8 ते 9 वर्षांच्या मुलींना मासिक पाळी सुरू होते, पण काही मुली अशा आहेत ज्यांची मासिक पाळी 18 वर्षानंतर सुरू होते. साधारणपणे एका महिन्यात सलग 3 दिवस किंवा 7 दिवस मासिक पाळी येते. तर अशा काही महिला आहेत, ज्यांना दर महिन्याला मासिक पाळी येत नाही किंवा आली तर ती फक्त एक-दोन दिवसांसाठी असते. अनियमित कालावधीला वैद्यकीय भाषेत PCOS किंवा PCOD म्हणतात. तर, इतर लक्षणे आहेत जी PCOS किंवा PCOD असण्याकडे निर्देश करतात. तर काही तज्ज्ञांच्या मते, दर महिन्याला मासिक पाळी आल्यानेही PCOS म्हणजेच पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमची समस्या उद्भवू शकते. काही प्रकरणांमध्ये केवळ वजन वाढणे, वजन कमी होणे हे देखील पीसीओएसच्या लक्षणांपैकी एक आहे.
PCOS म्हणजे काय?
पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) ही हार्मोनशी संबंधित समस्या आहे. PCOS च्या बाबतीत, मासिक पाळी येत नाही किंवा अनेक दिवस सतत मासिक पाळी येऊ शकते. अशी काही प्रकरणे आहेत, ज्यात PCOS झाल्यानंतरही महिलांना साधारणपणे दर महिन्याला मासिक पाळी येते. PCOS ची समस्या प्रजनन वर्षांमध्ये उद्भवते. स्त्रीच्या अंडाशयांमध्ये असामान्य प्रमाणात एन्ड्रोजन तयार होतात. अशा स्थितीत एंड्रोजन नावाच्या हार्मोनचे प्रमाणही वाढू शकते.
70% महिला PCOS मुळे त्रस्त?
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, जगभरातील प्रजनन टप्प्यातील सुमारे 8 ते 13 टक्के महिला PCOS मुळे प्रभावित आहेत. 70% पर्यंत प्रभावित महिलांचे निदान झालेले नाही. एनोव्ह्युलेशन हे PCOS चे सर्वात सामान्य कारण असल्याचे म्हटले जाते. तर एक प्रमुख कारण म्हणजे वंध्यत्व. PCOS ची लक्षणे आणि उपचारांबद्दल जाणून घेऊया.
नियमित मासिक पाळीसोबत PCOS होऊ शकतो का?
केवळ अनियमित मासिक पाळी असलेल्या महिलांनाच PCOS असणे आवश्यक नाही. जर्नल फर्टिलिटी अँड स्टेरिलिटीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात, सुमारे 74 टक्के स्त्रिया ज्यांना उच्च एन्ड्रोजन पातळी होती त्यांना पीसीओएसचे निदान झाले. याव्यतिरिक्त, जर्नल ऑफ ह्यूमन रिप्रॉडक्शनमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असेही आढळून आले आहे की 30 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सहभागी ज्यांना PCOS होते त्यांचे वय वाढत असताना नियमित मासिक पाळी येऊ लागली.
PCOS ची लक्षणे काय आहेत?
- मासिक पाळी संबंधित समस्या
- वंध्यत्व
- चेहऱ्यावर मुरुम
- तेलकट त्वचा असणे
- चेहऱ्यावर किंवा शरीरावर जास्त केस असणे
- केस गळणे
- वजन वाढणे
- पोटाभोवती वाढलेली चरबी
PCOS उपचार काय आहेत?
- PCOS साठी कोणताही उपचार नाही.
- यासाठी कोणतेही विशेष औषध नाही.
- तुम्हाला तुमची जीवनशैली बदलावी लागेल.
- उत्तम आहार, व्यायाम, योगासने, ध्यानधारणा, नियमित खाणे-झोपणे हा त्याचा उपचार आहे.
- यामध्ये दूध, दही, चीज इत्यादी दुग्धजन्य पदार्थांचे सेवन कमी करणे देखील समाविष्ट आहे.
- चांगले खाणे आणि पुरेशी झोप घेणे तसेच शारीरिक हालचाली केल्याने
- PCOS किंवा PCOD सारख्या समस्यांपासून काही महिन्यांत आराम मिळू शकतो.
हेही वाचा>>>
Men Health: पुरूषांनो..अगदी शांतपणे शरीरात पसरतो हा कॅन्सर, चुकूनही दुर्लक्ष करू नका 'ही' 7 लक्षणं, संशोधनात म्हटलंय...
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )