(Source: Poll of Polls)
Women Health: महिलांनो..जबाबदाऱ्यांचं ओझं पेलताना स्वत:चीही काळजी घ्या..संधिवाताची समस्या वाढतेय, जीवनशैलीत 'हे' बदल करा
Women Health: कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि कामाच्या ओझ्याखाली महिला अनेकदा त्यांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे त्यांना संधिवात सारखे आजार वेळेत ओळखता येत नाहीत
Women Health: वाढत्या वयानुसार महिलांच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यात अनेक बदल होतात. महिला अनेकदा स्वत:ची काळजी घेत नसल्यामुळे त्या विविध आजारांना बळी पडतात. आजकाल संधिवात ही एक अशी सामान्य समस्या आहे, जी बऱ्यात लोकांसाठी त्रासाचे कारण बनलीय. याचा परिणाम कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो. हा आजार विशेषतः महिलांमध्ये जास्त आढळतो. कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि कामाच्या ओझ्याखाली महिला अनेकदा त्यांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे त्यांना संधिवात सारखे आजार वेळेत ओळखता येत नाहीत आणि नंतर ते त्यांच्यासाठी त्रासाचे कारण बनते. अशा परिस्थितीत सुरुवातीच्या काही लक्षणांमुळे त्यावर नियंत्रण ठेवता येते. त्याची लक्षणे आणि प्रतिबंध जाणून घ्या..
जागरुकतेचा अभाव
या आजाराची वाढती रुग्णसंख्या आणि लोकांमध्ये त्याबद्दल जागरुकतेचा अभाव लक्षात घेऊन दरवर्षी 12 ऑक्टोबर रोजी जागतिक संधिवात दिवस साजरा केला जातो. यानिमित्ताने, आज आम्ही तुम्हाला आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, महिलांमध्ये सांधेदुखीची सुरुवातीची लक्षणे आणि त्यापासून दूर राहण्यासाठी काही बदलांबद्दल सांगणार आहोत, ज्यांचा तुमच्या जीवनशैलीत समावेश करून तुम्ही स्वतःचे संरक्षण देखील करू शकता.
स्त्रियांमध्ये संधिवात सामान्य का आहे?
वास्तविक, महिलांचे सांधे अधिक लवचिक असतात, त्यामुळे त्यांना झीज होण्याची अधिक शक्यता असते, त्यामुळे ऑस्टियोआर्थरायटिसचा धोका वाढतो. याशिवाय हार्मोन्समधील बदलही यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. विशेषतः रजोनिवृत्ती म्हणजेच मेनोपॉज दरम्यान, स्त्रियांच्या शरीरात इस्ट्रोजेन कमी होते, ज्याचा सांध्यांवर संरक्षणात्मक प्रभाव पडतो. अशा परिस्थितीत शरीरात इस्ट्रोजेनच्या कमतरतेमुळे सूज आणि सांधेदुखी होऊ शकते.
स्त्रियांमध्ये सांधेदुखीची सुरुवातीची लक्षणे
जेव्हा संधिवात होतो, तेव्हा त्याची सुरुवातीची लक्षणे दिसतात, जी वेळेत ओळखून त्यावर नियंत्रण ठेवता येते. स्त्रियांमध्ये सांधेदुखीची सुरुवातीची लक्षणे अशी आहेत:
सांधेदुखी
कडकपणा
सूज
थकवा
वेग कमी होणे इ.
या मार्गांनी स्वतःचे रक्षण करा
- सांधेदुखीचा धोका कमी करण्यासाठी शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे महत्त्वाचे आहे.
- यासाठी तुम्ही चालणे, पोहणे किंवा योगासारखे सोपे व्यायाम करू शकता.
- याशिवाय, निरोगी वजन राखणे देखील महत्त्वाचे आहे, कारण लठ्ठपणामुळे सांधेदुखीचा धोका वाढतो.
- जास्त वजनामुळे सांध्यांवर, विशेषत: गुडघे, नितंब आणि पाठीच्या खालच्या भागात ताण येऊ शकतो.
- जास्त वेळ बसण्याची सवयही तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते.
- त्यामुळे जास्त वेळ सतत न बसण्याचा प्रयत्न करा आणि मध्येच ब्रेक घ्या.
हेही वाचा>>>
Women Health: महिलांनो..तुमच्या 'या' सवयी आताच सोडा! ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतोय, डॉक्टरांनी सांगितले...
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )