Health Tips : महिलांनो, वयाच्या 30 व्या वर्षी काळजी घ्या; दुर्लक्ष केल्यास होतील गंभीर आजार, 'ही' आहेत लक्षणं
Women's Health : वयाच्या तिशीनंतर महिलांना अनेक आजारांचा सामना करावा लागतो. हे आजार कोणते ते जाणून घ्या.
Women's Health : वाढत्या वयाबरोबरच मानवी शरीरात अनेक बदल होतात. हे बदल पुरुषांपेक्षा महिलांमध्ये लवकर होतात. बाहेरचे अन्न आणि बिघडती जीवनशैलीमुळे त्यांचं जीवनमानही कमी झालेलं आहे. वयाच्या 30 व्या वर्षी महिलांमध्ये असे अनेक बदल होतात, ज्यांची वेळीच काळजी घेतली नाही तर अनेक आजार उद्भवू शकतात. या ठिकाणी आम्ही तुम्हाला अशाच काही आजारांबद्दल सांगणार आहोत, जे वयाच्या तिशीनंतर महिलांना (Women Health) होण्याचा धोका असतो. हे आजार कोणते ते जाणून घ्या.
ऑस्टियोपोरोसिस : बिघडत्या जीवनशैलीमुळे वयाच्या 30 व्या वर्षी महिलांच्या शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. त्यापैकी पहिली समस्या म्हणजे हाडे कमकुवत होणे. जर तुम्ही योग्य आहार घेत नसाल तर तुमची हाडे कमकुवत होऊ शकतात. अशा वेळी तुम्हाला ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. अस्वास्थ्यकर जीवनशैलीमुळे हाडे आतून पोकळ होऊ लागतात. शारीरिक हालचालींअभावी आपली हाडे कमकुवत होऊ शकतात. याशिवाय आहारात कॅल्शियमची कमतरता किंवा शरीरातील कॅल्शियमला हानी पोहोचवणाऱ्या गोष्टींचे अति प्रमाणात सेवन करणे देखील आरोग्यासाठी हानिकारक आहे. या कारणांमुळे ऑस्टिओपोरोसिसची समस्या उद्भवते.
प्रजननक्षमतेशी संबंधित समस्या : तुमची जीवनशैली जर बरोबर नसेल तर वयाच्या 30 व्या वर्षांनंतर प्रजननक्षमतेशी संबंधित समस्या सुरु होतात. काही महिलांची प्रजनन क्षमता 30 नंतर हळूहळू कमकुवत होऊ लागते, त्यामुळे गर्भधारणेशी संबंधित समस्या सुरु होतात. अशा परिस्थितीत योग्य आहार घ्या.
स्तनाचा कर्करोग : 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो. मात्र, अलिकडील अभ्यासानुसार, स्तनाचा कर्करोग हा 30 वर्षांच्या स्त्रियांमध्ये सर्वात सामान्य कर्करोगांपैकी एक आहे, ज्याची लक्षणे वयाच्या 20 व्या वर्षी दिसू लागतात. अशा परिस्थितीत, त्यांचे वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे. स्तनाचा भाग घट्ट होणे, स्तनाच्या त्वचेत सूज येणे, चिडचिड होणे, स्तनाग्रातून रक्तासह इतर स्त्राव यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत असेल, तर वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे.
व्हेरिकोज व्हेन्स : व्हेरिकोज व्हेन्स हा शिरांशी संबंधित एक अतिशय वेदनादायक आजार आहे. या आजारात नसा जलद गतीने सूजतात, त्यामुळे तीव्र वेदना होतात. 30 वर्षानंतर हा आजार होण्याचा धोका झपाट्याने वाढतो आणि जीवनशैलीशी संबंधित वाईट सवयी आणि योग्य आहार न घेतल्याने असे होते. जेव्हा शिरा मोठ्या, रुंद किंवा रक्ताने भरलेल्या असतात तेव्हा ही समस्या उद्भवते. अशुद्ध रक्तवाहिन्या फुगून झालेल्या गाठींचा नसा अनेकदा सुजलेल्या आणि फुगवटा दिसतात. ही समस्या महिलांमध्ये खूप सामान्य आहे. 25-30 टक्के लोक व्हेरिकोज व्हेन्सच्या समस्येने ग्रस्त आहेत. पोहणे, चालणे, सायकलिंग करणे किंवा योगासन केल्याने नियंत्रित होऊ शकते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )