(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Winter Travel: वृद्ध आई-वडिलांना घडवा 'या' 5 अद्भूत ज्योतिर्लिंगांचं दर्शन! भारतीय रेल्वेकडून पुण्य कमावण्याची संधी, कमी बजेटमध्ये टूर पॅकेजेस
Travel: या टूर पॅकेजद्वारे तुम्ही तुमच्या वृद्ध पालकांना ट्रीपला पाठवू शकता. भारतीय रेल्वेच्या अशा काही सुविधा आहेत, जिथे तुम्ही टेन्शन घेण्याचे कारण नाही.
Winter Travel: नोव्हेंबर-डिसेंबर महिना फिरण्यासाठी तसेच देवदर्शनासाठी उत्तम समजला जातो. मुलांनाही या महिन्यात सु्ट्ट्या असतात. त्यामुळे अनेकजण या काळात फिरायचा प्लॅन करतात. अशात जर तुम्हाला किंवा तुमच्या वृद्ध आई-वडिलांना देवदर्शन घडवायचे असेल, तर भारतीय रेल्वे तुम्हाला पुण्य कमावण्याची संधी देतेय. भारतीय रेल्वेचे काही खास, बजेटमध्ये बसणारी पॅकेजेस.. या टूर पॅकेजद्वारे तुम्ही तुमच्या वृद्ध पालकांना ट्रीपला पाठवू शकता. कारण विमानतळ किंवा ट्रेनमधून बाहेर पडल्यानंतर हॉटेलमध्ये कॅब घेऊन जाण्याची सुविधा आणि हॉटेलची निवडही भारतीय रेल्वेकडून केली जाते.
सहलीचे नियोजन करताना येतात अनेक अडचणी?
देशातील विविध राज्यात असलेल्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. विविध राज्यांत असलेल्या 12 ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक येतात. पण प्रवास आणि प्रवासाच्या नियोजनात येणाऱ्या अडचणींमुळे आजही अनेक जण धार्मिक सहलीचे नियोजन करू शकलेले नाहीत. कारण जेव्हा तुम्ही स्वत: सहलीचे नियोजन करता तेव्हा तुम्हाला प्रवासासाठी रेल्वेचे तिकीट, इतर शहरांतील चांगली हॉटेल्स, खायला चांगली रेस्टॉरंट आणि प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी गाडी अशा सुविधांसाठी पैसे द्यावे लागतात. दुसऱ्या शहरात जाणे आणि सर्वकाही व्यवस्थित करणे हे एक मोठे काम आहे. यामुळेच लोक टूर पॅकेजमधून प्रवासाचे नियोजन करतात. तुम्हालाही तुमच्या पालकांसोबत धार्मिक सहलीला जायचे असेल तर हे टूर पॅकेज पहा.
IRCTCने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर माहिती शेअर केलीय
- हे टूर पॅकेज 28 नोव्हेंबर 2024 रोजी मदुराई येथून सुरू होणार आहे.
- पॅकेजमध्ये तुम्हाला भीमशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ आणि शिर्डी येथे जाण्याची संधी मिळेल.
- हे टूर पॅकेज 5 रात्री आणि 6 दिवसांसाठी आहे.
- या पॅकेजची सुरुवात फ्लाइट्सपासून होणार असून शहरभर फिरण्यासाठी बसची सुविधा उपलब्ध असेल.
- पॅकेजचे नाव पंच ज्योतिर्लिंग यात्रा एक्स मदुराई आहे.
- तुम्ही भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर पॅकेजचे नाव टाकून प्रवासाचा तपशीलही वाचू शकता.
पॅकेज फी
- जर तुम्ही एकट्याने प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर पॅकेज फी 42,400 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
- जर 2 लोक एकत्र प्रवास करत असतील तर पॅकेज फी प्रति व्यक्ती 35,700 रुपये आहे.
- तीन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 34,500 रुपये आहे.
- मुलांसाठी पॅकेज फी 29,500 रुपये आहे.
- भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरून तिकीट बुक करण्याची प्रक्रिया सोपी आहे.
पॅकेजमध्ये समाविष्ट केलेली वैशिष्ट्ये
- लक्षात ठेवा की, या पॅकेज फीमध्ये तुम्हाला तुमच्या फेरीसाठी फ्लाइट तिकीट, प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी बस आणि राहण्यासाठी हॉटेलची सुविधा मिळेल.
- तसेच, खाद्य खर्चाचाही पॅकेज फीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
- नाश्त्यासाठी 5 दिवस आणि रात्रीचे जेवण 5 दिवस उपलब्ध असेल.
- पॅकेजमध्ये नाश्ता आणि रात्रीच्या जेवणाचा खर्च समाविष्ट आहे,
- तुम्हाला IRCTC टूर पॅकेजमध्ये उपलब्ध सुविधा वाचून दुपारच्या जेवणासाठी स्वतंत्रपणे पैसे द्यावे लागतील.
या सुविधांचा पॅकेजमध्ये समावेश केला जाणार नाही
- प्रेक्षणीय स्थळे आणि मंदिरांसाठी सर्व प्रवेश तिकिटे आकारली जातील, म्हणून तुम्हाला स्वतंत्रपणे पैसे द्यावे लागतील.
- लंच सेवेचा पॅकेज फीमध्ये समावेश नाही, यासाठी तुम्हाला वेगळे पैसे द्यावे लागतील.
- जर तुम्ही मेन्यूव्यतिरिक्त इतर खाद्यपदार्थ खरेदी केले तर तुम्हाला जास्तीचे पैसे द्यावे लागतील.
- भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरून तिकीट बुक करण्याची प्रक्रिया सोपी आहे.
हेही वाचा>>>
Winter Travel: पत्नी सोबतचे वाद मिटतील! फक्त लोणावळ्यातील ही 3 ठिकाणं एक्सप्लोर करा, नात्यात येईल गोडवा
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )