एक्स्प्लोर

GK: पाळीव प्राण्यांना परदेशात फिरायला नेऊ शकतो का? तर उत्तर आहे 'हो'; पण त्याआधी जाणून घ्या 'या' गोष्टी

तुम्ही आतापर्यंत माणसांच्या पासपोर्टबद्दल ऐकलं असेल, पण आज आम्ही तुम्हाला पाळीव प्राण्यांच्या पासपोर्टबद्दल सांगणार आहोत. परदेशात प्रवास करणाऱ्या कोणत्याही पाळीव प्राण्यासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे.

What is Pet Passport: अनेकांना कुत्रे (Dog), मांजर (Cat) किंवा इतर प्राणी पाळण्याची (Pet) आवड असते. ते त्याला आपल्या कुटुंबातील एक सदस्य मानतात. जेव्हा संपूर्ण कुटुंब सहलीसाठी जातं आणि त्यांच्या कुत्र्याला किंवा मांजरीला घरी एकटं सोडावं लागतं तेव्हा मात्र प्राब्लम होतो. तरी, काही लोक त्यांच्यासोबत त्यांच्या पाळीव प्राण्यालाही घेऊन जातात, परंतु ते देशातच कुठे फिरायचं असेल तरच शक्य होतं. अनेकदा लोक परदेशात जातात आणि त्यावेळी त्यांना त्यांच्या कुत्र्याला किंवा मांजरीला सोबत घेऊन जायचं असतं. पण हे करण्यासाठी त्यांना पेट पासपोर्टबद्दल (Pet Passport) माहिती असणं आवश्यक आहे, कारण त्याशिवाय तुम्ही तुमच्या पाळीव प्राण्याला परदेशात नेऊ शकत नाही.

तुम्ही आतापर्यंत माणसांच्या पासपोर्टबद्दल ऐकलं असेल, पण पाळीव प्राण्यांच्या पासपोर्टबद्दल (Pet Passport) तुम्ही ऐकलंय का? तर तुम्ही तुमच्या पाळीव प्राण्याला परदेशात घेऊन जाण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी आधी प्राण्याचा पासपोर्ट (Pet Passport) काढणं गरजेचं आहे. बरेच देश पासपोर्टशिवाय प्राण्यांना प्रवेश देतात, परंतु काही देशांमध्ये प्राण्यांचा पासपोर्ट आवश्यक असतो.

वाराणसीचा 'मोती' जाणार इटलीला

नुकतंच वाराणसीतील असंच एक प्रकरण चर्चेत आलं आहे. मोती हा तेथील रस्त्यावर फिरणारा कुत्रा वाराणसीहून इटलीला जाणार आहे. इटालियन लेखिका वारा लझारेट्टीने गेल्या दहा वर्षांपासून त्याला आपला पाळीव प्राणी (Pet) बनवलं आहे. त्याचं प्रशिक्षण आणि आवश्यक कागदपत्रांचं कामही पूर्ण झालं आहे. या कुत्र्याचा पासपोर्टही तयार झाला आहे, जे परदेशात जाण्यासाठी सर्वात महत्त्वाचं कागदपत्र आहे.

पेट पासपोर्ट म्हणजे नक्की काय?

जर तुम्हाला तुमच्या पाळीव प्राण्याला परदेशात घेऊन जायचं असेल तर तुमच्याकडे पेट पासपोर्ट (Pet Passport) असणं आवश्यक आहे. या पासपोर्टमध्ये पाळीव प्राण्याबद्दलची सर्व माहिती रेकॉर्ड केली जाते. प्राण्यांचा देशांतील प्रवास सुलभ करणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे. काही देशांना प्राण्यांसाठी अधिकृत पासपोर्टची आवश्यकता नसते, परंतु त्यांनी संबंधित देशाला त्यांच्या पाळीव प्राण्याबद्दल संपूर्ण माहिती देणं आणि संबंधित कागदपत्रांची पूर्तता करणं आवश्यक असतं.

हा पासपोर्ट कसा असतो?

हा पासपोर्ट कागदाच्या किंवा छोट्या पुस्तकाच्या स्वरूपात असू शकतो. यात मायक्रोचिपचा नंबर दिला जातो, परदेशात प्रवास करताना आवश्यक असल्यास तो पाळीव प्राण्याच्या गळ्यात किंवा त्वचेच्या मायक्रोचीप बसवली जाते. याशिवाय, पाळीव प्राण्याला रेबीजचं इंजेक्शन केव्हा आणि किती दिवसांपूर्वी दिलं होतं याची नोंद पासपोर्टमध्ये असते. केवळ पशुवैद्यच पेट पासपोर्ट जारी करू शकतात.

पेट पासपोर्टसाठी 'या' आहेत सर्वात महत्त्वाच्या अटी

  • पेट पासपोर्ट बनवण्याची पहिली अट म्हणजे मायक्रोचिप बसवणे, जी प्राण्याची मुख्य ओळख आहे.
  • रेबीज लसीकरणाची तारीख आणि रेबीज अँटीबॉडी चाचणी अहवाल.
  • पिसू, टिक्स आणि इतर कीटकांवर उपचार करण्याचे प्रमाणपत्र.
  • प्राण्याला कोणताही आजार नसल्याची पशुवैद्यकीय खात्री.

परदेशातून भारतात प्राणी आणण्याचे नियम

  • बाहेरून येणारे पाळीव प्राणी मायक्रोचिपने सुसज्ज असले पाहिजेत.
  • जर एखाद्या पर्यटकाने तात्पुरता पाळीव प्राणी सोबत आणला, तर त्याला परदेशी व्यापार महासंचालनालयाकडून परवाना घ्यावा लागेल.
  • भारतात दाखल होण्याच्या 31 दिवस आधी रेबीज लसीकरण आवश्यक आहे.
  • प्राण्याला विलगीकरणात ठेवायचं असेल तर त्यासाठी किमान 14 दिवस आणि जास्तीत जास्त 30 दिवसांसाठी ठेवावं लागतं.

हेही वाचा:

India: 'हे' आहेत देशातील टॉप-10 श्रीमंत व्यक्ती; जाणून घ्या व्यवसाय आणि वार्षिक उत्पन्न...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satish Bhosale : होळीच्या दिवशीच खोक्या भोसलेंचं घर पेटवलं, जीवनावश्यक वस्तू जळून खाक, बीडमध्ये खळबळ
होळीच्या दिवशीच खोक्या भोसलेंचं घर पेटवलं, जीवनावश्यक वस्तू जळून खाक, बीडमध्ये खळबळ
Virar : सुटकेसमध्ये सापडलं महिलेचं मुंडकं, इतर अवयवांचा पत्ता नाही, विरारमध्ये खळबळ
सुटकेसमध्ये सापडलं महिलेचं मुंडकं, इतर अवयवांचा पत्ता नाही, विरारमध्ये खळबळ
Temperature Today: अकोल्यात 41.3 अंश! तापमाचा पारा चढताच ; तुमच्या शहरात किती ? तपासा इथे, Photos
अकोल्यात 41.3 अंश! तापमाचा पारा चढताच ; तुमच्या शहरात किती ? तपासा इथे , Photos
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 06:30AM : 14 March 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 06:30 AM : 14 March 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 07 AM : 14 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSatish Bhosale : खोक्याला घेऊन पोलीस छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर दाखल EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satish Bhosale : होळीच्या दिवशीच खोक्या भोसलेंचं घर पेटवलं, जीवनावश्यक वस्तू जळून खाक, बीडमध्ये खळबळ
होळीच्या दिवशीच खोक्या भोसलेंचं घर पेटवलं, जीवनावश्यक वस्तू जळून खाक, बीडमध्ये खळबळ
Virar : सुटकेसमध्ये सापडलं महिलेचं मुंडकं, इतर अवयवांचा पत्ता नाही, विरारमध्ये खळबळ
सुटकेसमध्ये सापडलं महिलेचं मुंडकं, इतर अवयवांचा पत्ता नाही, विरारमध्ये खळबळ
Temperature Today: अकोल्यात 41.3 अंश! तापमाचा पारा चढताच ; तुमच्या शहरात किती ? तपासा इथे, Photos
अकोल्यात 41.3 अंश! तापमाचा पारा चढताच ; तुमच्या शहरात किती ? तपासा इथे , Photos
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
Aamir Khan : मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
IPL 2025 : तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
Manikrao Kokate : शासनाच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, 'जे कोणी अधिकारी...'
शासनाच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, 'जे कोणी अधिकारी...'
Dada Khindkar : दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार, तीन गावे दहशतीमध्ये; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखानं त्याच्या 'आका'चं नावही सांगितलं!
दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार, तीन गावे दहशतीमध्ये; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखानं त्याच्या 'आका'चं नावही सांगितलं!
Embed widget