एक्स्प्लोर

'जीवतोड मेहनत करूनही जर ..' लक्ष्मीच्या पावलांनी मालिका सोडण्याचं इशा केसकरनं सांगितलं खरं कारण

कलाच्या एक्झिटमुळे चाहतेही नाराज झाले होते . नुकत्याच एका मुलाखतीत इशा केसकरने मालिका का सोडली? याचं कारण उघड केलं आहे.

Isha Keskar: स्टार प्रवाहवरील 'लक्ष्मीच्या पावलांनी' ही मालिका आता नव्या वळणावर पोहोचली आहे. (Lakshmichya Pavalanni) कलाची भूमिका साकारणारी अभिनेत्री इशा केसकर (Isha Keskar) हिने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला.  कलाचं पात्र गेल्याने चाहते मात्र नाराज झालेले दिसतात. काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाहने या मालिकेचा प्रोमो शेअर केला होता. या प्रोमोच्या खाली चाहत्यांनी कमेंट्स करत आपली नाराजी व्यक्त केल्याचं दिसलेलं. पण आता मालिका सोडण्याचं खरं कारण काय? हे खुद्द कलाने अर्थात अभिनेत्री ईशा केसकरने सांगितलं आहे. 

लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत सध्या नवे ट्विस्ट पाहायला मिळतायत. या मालिकेत आता नवीन नाही का म्हणून नक्षत्रा मेढेकरची एन्ट्री झाली आहे. तिच्या येण्याने इशा केसकरने मालिका सोडली अशी चर्चा सुरू झाली होती. स्टार प्रवाहने शेअर केलेल्या मालिकेच्या प्रोमोमधूनही कथानकात बदल होणार असल्याचे संकेत मिळत होते. अखेर कलाने शेवटचा श्वास सोडला आणि अद्वैतची खरे निघून गेली. दरम्यान कलाच हृदय सुकन्या नावाच्या एका तरुणीला मिळाल्याचे दाखवलं आहे .  कलाच्या एक्झिटमुळे चाहतेही नाराज झाले होते . नुकत्याच एका मुलाखतीत इशा केसकरने मालिका का सोडली? याचं कारण उघड केलं आहे.

काय म्हणाली इशा केसकर ?

गेल्या दोन वर्षांपासून लक्ष्मीच्या पावलांनी मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. यात कला आणि अद्वैतचं पात्र, मालिकेत त्यांची मिश्किल भांडणं पाहणं चाहत्यांना आवडायचं. पण आता कला जग सोडून गेल्याचं दाखवल्याने मालिकेतन नवा ट्विस्ट आलाय. अभिनेत्री इशा केसकरने मालिका सोडली आहे. मालिका सोडल्याचं खरं कारण तिने काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीत सविस्तर स्पष्ट केलं आहे . ती म्हणाली" मी सलग दोन वर्ष काम करत होते. जून महिन्यापासून माझ्या डोळ्याला फोड आला होता. पण मी तशीच शूटिंग करत राहिले. पण ती दुखापत वाढल्याने डॉक्टरांनी मला काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिलाय. विश्रांती घेतली नाही तर भविष्यात डोळ्याची एक छोटीशी शस्त्रक्रिया करावी लागेल. 15 ते 20 दिवस मी सूर्यप्रकाशही बघू शकणार नाही. त्यामुळे सारासार विचार करून आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. सप्टेंबरमध्येच मी मालिका सोडणार असल्याचे टीमला कळवलं होतं" असं इशा केसकरने सांगितलं.

ती पुढे म्हणाली " मध्यंतरी मला चिकनगुनिया आणि अन्नातून विषबाधा झाली होती. त्यामुळे मी काही दिवस रजेवर गेले होते. त्यावेळी मालिकेच्या टीमने माझी खूप काळजी घेतली. आता डोळ्याला दुखापत झाल्यामुळे पुन्हा सुट्टी मागणं मला योग्य वाटत नाही. त्यामुळे मालिकेच्या कथेलाही अडथळा आला असता. त्यामुळे मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. " ती म्हणाली " आपण इतकी मेहनत करून पैसे कमवतो पण त्याचा आनंदच घेता आला नाही तर त्याचा काय उपयोग? म्हणून मी थोडा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतलाय. विश्रांती घेतल्यानंतर मी पुन्हा कामाला सुरुवात करणार आहे. " असंही इशा म्हणाली.

महत्त्वाच्या बातम्या

Sonalee Kulkarni brother Marriage: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
हिंदू मुली मुस्लिमांच्या संपर्कात आल्या की कट्टर डाव्या होतात... कंगना रनौतचा video व्हायरल; नेमकं काय म्हणाली?
हिंदू मुली मुस्लिमांच्या संपर्कात आल्या की कट्टर डाव्या होतात... कंगना रनौतचा video व्हायरल; नेमकं काय म्हणाली?
Marathi Actor Hrishikesh Kanade: मराठी रंगभूमीवर शोककळा; तरुण अभिनेत्याचं निधन, अवघ्या 38 व्या वर्षी अकाली एक्झिट
मराठी रंगभूमीवर शोककळा; तरुण अभिनेत्याचं निधन, अवघ्या 38 व्या वर्षी अकाली एक्झिट
Salman Khan Weight Loss: सलमान खाननं 16 किलो वजन का घटवलं? भाईजान साठीत करतोय, पंचविशीतील तरुण दिसण्याची तयारी; पण कशासाठी?
सलमान खाननं 16 किलो वजन का घटवलं? भाईजान साठीत करतोय, पंचविशीतील तरुण दिसण्याची तयारी; पण कशासाठी?

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
Embed widget