Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी तुम्हीही दिवसभर उपाशी राहता? जरा थांबा, तज्ज्ञांचं म्हणणं जाणून घ्या
Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी कमी अन्न खाणे हा कधीही योग्य पर्याय नाही.
Weight Loss Tips : बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की उपाशी राहिल्याने वजन (Weight Loss Tips) कमी होते. म्हणून, वजन कमी करण्यासाठी, ते फारच कमी अन्न खातात आणि दिवसातून एकदाच अन्नाचं सेवन करतात. यामुळे वजनही कमी होते, त्यामुळे डायटिंगमध्येही या सवयीचा कल वाढताना दिसतोय. पण तुम्हाला माहित आहे का याचे अनेक गंभीर तोटे देखील होऊ शकतात. जेवण वगळणे किंवा उपाशी राहणे यामुळे वजन कमी होते. पण, यातून अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. यावर तज्ज्ञांचं म्हणणं काय आहे ते जाणून घेऊयात.
वजन कमी करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे का?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, वजन कमी करण्यासाठी कमी अन्न खाणे हा योग्य पर्याय नाही. अशा प्रकारे वजन कमी करणे आरोग्यासाठी धोकादायक आणि हानिकारक असू शकते. प्रत्येक व्यक्तीचे वजन कमी खाल्ल्यानेच कमी होते हे गरजेचं नाही. अशा केसेस 10 पैकी 8 प्रकरणांमध्ये होऊ शकतात. पण, शरीरासाठी ही पद्धत योग्य नाही.
तज्ञ काय म्हणतात?
तज्ज्ञांच्या मते, वजन कमी करणे हे तुम्ही दिवसभरात किती कॅलरी वापरत आहात आणि बर्न करत आहात यावर अवलंबून असते. कॅलरी जास्त प्रमाणात घेतल्यास आणि योग्य प्रकारे बर्न होत नसल्यास वजन वाढते. कमी खाऊन वजन कमी करण्याची पद्धत अजिबात योग्य नाही. कारण या पद्धतीमुळे शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होऊ शकते. कमी अन्न खाल्ल्याने शरीर कमकुवत होते आणि अनेक आजारांचा धोका वाढतो. असे केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही कमकुवत होते. आहारामुळे अनेक जीवनसत्त्वे आणि प्रथिने यांची कमतरता भासते. अशा स्थितीत कुपोषणाची भीतीही कायम आहे. अशी अनेक प्रकरणे यापूर्वीही समोर आली आहेत. कधीकधी वजन कमी करण्याचा ध्यास तुम्हाला अडचणीत आणू शकतो. म्हणून, अशा पद्धतींनी वजन कमी करण्याचा विचार करू नये.
वजन कमी करण्याचा चांगला मार्ग कोणता
तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर त्यासाठी व्यायाम करणे हाच उत्तम उपाय आहे. जास्त खाल्ले तरी व्यायाम करत राहा. यामुळे फॅट आणि कॅलरी बर्न होत राहतील आणि वजन वाढणार नाही. प्रत्येकाने दररोज किमान 15 मिनिटे व्यायाम केला पाहिजे.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.