Hot Water Benefits : लठ्ठपणा कमी होईल, पचनही सुधारेल! जाणून घ्या गरम पाणी पिण्याचे फायदे
Hot Water Benefits : भरपूर पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत राहते. तसेच, गरम पाणी प्यायल्याने अनेक फायदे देखील होतात. पाणी शरीराला डिटॉक्स करण्याचे काम करते.
Hot Water Benefits : लोक वजन कमी करण्यासाठी (Weight Loss) जेवणावर नियंत्रण, जीम, वर्क आऊट असे अनेक प्रयत्न करत असतात. परंतु, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, फक्त पाणी पिऊनही तुम्ही तुमचे वजन कमी करू शकता. आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी पाणी (Hot Water) खूप महत्वाचे आहे. आपण अन्नाशिवाय बरेच दिवस जगू शकतो, परंतु पाण्याशिवाय एक दिवसही जगणे कठीण आहे.
भरपूर पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत राहते. तसेच, गरम पाणी प्यायल्याने अनेक फायदे देखील होतात. पाणी शरीराला डिटॉक्स करण्याचे काम करते. पाण्यामुळे तुमचे वजनही नियंत्रित राहते. यासाठी पाणी पिण्याची पद्धत आणि प्रमाण याकडे लक्ष दिले पाहिजे. योग्य पद्धतीने पाणी प्यायल्यास तुमचे वजन कमी होऊ शकते. दररोज दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी प्यायले पाहिजे. चला तर, जाणून घेऊया गरम पाणी पिण्याचे फायदे..
टॉक्सिक घटक बाहेर पडतात : रोज सकाळी गरम पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. गरम पाणी प्यायल्याने अन्न पचन होण्यास मदत होते. त्यामुळे वजन झपाट्याने कमी होते. गरम पाणी प्यायल्याने भूक देखील कमी होते. जेवणाच्या 30 मिनिटांपूर्वी 1 ग्लास कोमट पाणी प्यायल्याने जास्त कॅलरीज शरीरात जाण्याची शक्यता कमी होते.
फॅट बर्न होते : फॅट कमी करण्यासाठी तुम्ही दिवसभरात किती फॅटच्या सेवन करता याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. गरम पाणी प्यायल्याने शरीरात साठलेली चरबी नष्ट होते. यासाठी गरम पाण्याचा आपल्या डाएटमध्ये नक्कीच समावेश करा.
पचन सुधारते : पाणी लुब्रिकंट एजंट म्हणून काम करते, जे पचन प्रक्रियेचा प्रवाह सुरळीत ठेवण्यास मदत करते. पाणी पोटातील अन्नाचे कण विरघळवण्यास मदत करते, जे पचण्यास कठीण असते.
बद्धकोष्ठता दूर करते : गरम पाणी प्यायल्याने आतडे आकुंचन पावतात. पाण्यामुळे आतड्यातील रक्तसंचय कमी होतो. गरम पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्सिक घटक बाहेर पडतात. गरम पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठता आणि अपचन दूर होते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
संबंधित बातम्या:
- Omicron Variant : सर्दी-खोकला या आजारांकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात, जाणून घ्या तज्ज्ञांचं मत
- Weight Loss : वजन कमी करण्यासाठी मध हा सर्वोत्तम उपाय, या पदार्थांसह मध खाल्ल्याने लठ्ठपणा होईल नाहीसा
- Immunity Booster | व्हिटॅमिन 'सी' आणि 'डी'च नव्हे, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी 'हे' व्हिटॅमिन्सही महत्त्वाचे!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha