Immunity Booster | व्हिटॅमिन 'सी' आणि 'डी'च नव्हे, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी 'हे' व्हिटॅमिन्सही महत्त्वाचे!
Vitamins For Immunity: व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी खूप महत्वाचे आहेत. परंतु, इतर अनेक जीवनसत्त्वे आहेत ज्यांच्या कमतरतेमुळे प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते.
Immunity In Corona: कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनचा (Omicron) संसर्ग टाळण्यासाठी, प्रतिकारशक्ती मजबूत असणे खूप महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत लोक मल्टी-व्हिटॅमिन्सचे (Multi Vitamins) सेवन करत आहेत. व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी खूप महत्वाचे आहे. परंतु, तुम्हाला माहित आहे का की, इतर अनेक जीवनसत्त्वे आहेत ज्यांच्या कमतरतेमुळे तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते.
जर, तुम्हाला दीर्घकाळ निरोगी राहायचे असेल, तर शरीरात सर्व जीवनसत्त्वे आणि खनिजे योग्य प्रमाणात असणे गरजेचे आहे. पोषक तत्वांनी युक्त असा आहार घेतल्याने शरीर मजबूत होते आणि रोगप्रतिकार शक्ती देखील मजबूत होते. प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन सी आणि डी व्यतिरिक्त इतर कोणते जीवनसत्त्वे आवश्यक आहेत ते जाणून घेऊया...
व्हिटॅमिन ए : व्हिटॅमिन एचा आपल्या आरोग्यावर अतिशय चांगला परिणाम होतो. निरोगी राहण्यासाठी, आपण आपल्या आहारात व्हिटॅमिन ए समृद्ध पदार्थांचा समावेश केला पाहिजे. व्हिटॅमिन ए रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतो . डोळे निरोगी ठेवण्यासाठी, संसर्ग टाळण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी व्हिटॅमिन ए खूप महत्वाचे आहे. व्हिटॅमिन ए मिळवण्यासाठी हिरव्या भाज्या, पालक, शिमला मिरची, रताळे, गाजर, पपई, आंबा, दूध, दही आणि चीज यांचा आहारात समावेश करा.
व्हिटॅमिन के : प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन के देखील आवश्यक आहे. व्हिटॅमिन के शरीराला शक्ती देते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. हृदय तसेच फुफ्फुसाच्या स्नायूंची लवचिकता राखण्यासाठी व्हिटॅमिन के देखील आवश्यक आहे. व्हिटॅमिन केचा समृद्ध स्रोत म्हणून, तुम्ही तुमच्या आहारात ब्रोकोली, केळी, एवोकॅडो, नट्स, अंडी आणि बेरी यांचा समावेश करू शकता.
व्हिटॅमिन बी : शरीरात व्हिटॅमिन बीची कमतरता असल्यास रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ लागते. व्हिटॅमिन बी मेंदूला निरोगी ठेवते. डोळे, त्वचा आणि केसांची समस्या दूर करते. व्हिटॅमिन बी चेतासंस्था अर्थात नर्व्हस सिस्टम निरोगी ठेवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावते. व्हिटॅमिन बी मिळवण्यासाठी आहारात अंडी, सोयाबीन, टोमॅटो, अक्रोड, बदाम, गहू, ओट्स, चिकन, मासे, दूध यांसारख्या पदार्थांचा समावेश करा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
हे ही वाचा :
- Rashmika Mandana : नॅशनल क्रश रश्मिका मंदना सारखा फिटनेस हवाय? फॉलो करा हा वर्क आऊट प्लॅन अन् डाएट
- Health Tips : हिवाळ्यात रोज रात्री गरम पाणी प्यायल्याने होतात 'हे' फायदे
- Coronavirus : चहा ऐवजी 'या' तीन काढ्यांचे करा सेवन, संसर्गापासून होईल संरक्षण, चवही राहील कायम
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )