Health Tips : उन्हाळ्यात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी समृद्ध 'या' फळभाज्या खा; फिट राहा
Vitamin C Benefits : उन्हाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी, आपण आहारात व्हिटॅमिन सी समृद्ध भाज्या समाविष्ट करणे गरजेचे आहे.
Vitamin C Benefits : सध्याच्या धकाधकीच्या जीवनामुळे आपल्या आरोग्यकडे लक्ष देणं अनेकांना कठीण होतं. याचाच मोठा परिणाम आपल्या शरीरावर होतो. अशातच संसर्ग आणि असंसर्गजन्य आजार (NCDs) रोखण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. भारतात असंसर्गजन्य आजार अत्यंत तीव्र गतीने वाढत आहे. आपल्या देशात कार्डिओव्हॅस्क्युलर आजार, कर्करोग, श्वसनाचे आजार आणि मधुमेह आजार खूप तीव्र गतीने वाढत आहे.
उन्हाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी, आपण आहारात व्हिटॅमिन सी समृद्ध भाज्या समाविष्ट करणे गरजेचे आहे. व्हिटॅमिन सी शरीराला संसर्गापासून वाचवण्यास मदत करते. वृद्धत्व टाळण्यासाठी आणि तरुण ठेवण्यासाठी व्हिटॅमिन सी देखील आवश्यक आहे. चला जाणून घेऊया कोणत्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन सी आढळते.
व्हिटॅमिन सी युक्त फळ भाज्या :
1. टोमॅटो - टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. टोमॅटोची भाजी किंवा सॅलडमध्ये वापर करून तुम्ही दररोज व्हिटॅमिन सीची कमतरता पूर्ण करू शकता.
2. आवळा - आवळा भाज्यांमध्ये व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत मानला जातो. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आढळते. मध्यम आकाराच्या आवळ्यामध्ये 600 मिलीग्राम व्हिटॅमिन सी असते.
3. लिंबू - लिंबाचा वापर रोज जेवणात जरूर करावा. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. याच्या सेवनाने तुम्ही तुमच्या दैनंदिन व्हिटॅमिन सीच्या गरजा पूर्ण करू शकता.
4. ब्रोकोली - हिरव्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन सी देखील आढळते. ब्रोकोली व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे. व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त, फोलेट, लोह आणि व्हिटॅमिन ए देखील ब्रोकोलीमध्ये चांगल्या प्रमाणात आढळतात.
5. बटाटा - बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सी देखील आढळते. बटाटे सर्व घरांमध्ये वापरले जातात. बटाट्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाणही जास्त असते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :