Hug Day 2021: सांग तिला, तुझ्या मिठीत आहे जग सारा.....
Valentine week 2021: प्रेमाने आपल्या आवडत्या व्यक्तीच्या कुशीत सामावून जाणे यासारखे सुख ते काय असेल. त्याच संबंधीचा वॅलेंटाईन वीक मधील सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे 'हग डे' (Hug Day).
Hug Day: प्रेमात पडलेल्यांसाठी गुलाबी महिना म्हणजे फेब्रुवारी. कारण तरुणांचा आवडता आंतरराष्ट्रीय सन म्हणजे वॅलेंटाईन डे याच महिन्यात असतो. त्यासाठी आठवडाभर वॅलेंटाईन वीकचा भरगच्च कार्यक्रम आखला गेला आहे. या वॅलेंटाईन वीक मध्ये आतापर्यंत रोज डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे आणि प्रॉमिस डे पार पडले आहेत. आता याच्या पुढचा अंक म्हणजे 'हग डे', अर्थात मिठी दिवस...
प्रेमाने आपल्या आवडत्या व्यक्तीच्या कुशीत सामावून जाणे यासारखे सुख ते काय असेल. कुणाला मिठी मारणे किंवा कुणाला मिठीत घेण्यानं प्रेम आणि विश्वास वाढतो. तसंही प्रेमानं मिठी मारण्यासाठी कोणत्याही एका विशिष्ट दिवसांची गरज नसते, पण आजचा दिवस खासच आहे.
वॅलेंटाईन वीक मधील सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे 'हग डे', जो सर्व प्रकारच्या नात्यात गोडवा निर्माण करू शकतो. प्रत्येक वर्षाच्या 12 फेब्रुवारीला 'हग डे' साजरा करण्यात येतो.
मुन्ना भाई एमबीबीएस या चित्रपटातील जादूची झप्पी आपण पाहिलीच आहे. त्यावरुन एका मिठीत किती ताकत असते याची प्रचिती येते. मिठी मारल्यामुळे समोरच्या व्यक्तीचा रागही कमी होतो, प्रेमही वाढते.
काही वेळा आपण आपल्या भावना शब्दातून व्यक्त करू शकत नाही. त्या भावना आनंदाच्या किंवा दुःखाच्याही असू शकतात. मग एखाद्याला मिठी मारुन त्या भावनांना आपण वाट मोकळी करुन देऊ शकतो.
Teddy Day 2021: प्रेमीयुगलांसाठी खास आहे टेडी-डे, आपल्या जोडीदाराला असं करा इम्प्रेस
एखाद्याला मिठी मारल्याने समोरच्या व्यक्तीचा तणाव कमी होण्यास मदत होते. एखादा व्यक्ती मानसिक तणावात असेल आणि त्याला कोणीतरी मिठी मारली तर त्याच्या शरीरात ऑक्सिटॉक्सिन नावाचे हार्मोन तयार होते आणि ते रक्तात मिसळते असं विज्ञान सांगतंय. त्यामुळे त्या व्यक्तीचा ताण निवळण्यास मदत होते. तसेच या हार्मोनमुळे रक्त दाब कमी होतो, हृदयासंबंधी आजारही कमी होतात. रक्ताभिसरनाची प्रक्रिया वाढते, मूड फ्रेश होतो आणि मनात आपलेपणाची भावना निर्माण होते ती वेगळीच
मिठी मारणे म्हणजे काळजी, प्रेम व्यक्त करणे. एखाद्या व्यक्तीला एकाकीपणा वाटत असेल तर तो मिठी मारल्याने दूर होतो, त्याचं नैराश्य कमी होतं. मिठी मारल्याने नात्यातील गोडवा वाढतो. प्रेमाची अप्रतिम भावना म्हणजे मिठी होय. त्यामुळे आपले प्रेम, मित्र, परिवार आणि इतर लाडक्या लोकांना आजच्या दिवशी मिठी मारा आणि आपुलकीची भावना वाढावा.
प्रेमाविरांसाठी आजचा दिवस खास. आजच्या दिवसाच्या माध्यमातून त्याने किंवा तिने आपल्या प्रेमाला आपण आयुष्यभर तुला साथ देणार, तुझ्या प्रत्येक सुख-दुःखात सामील असणार, आपल्या या कोवळ्या नात्याला आयुष्यभर जपणार असा दृढविश्वास दिला पाहिजे. अशी एक संधी 'हग डे' च्या माध्यमातून चालून आली आहे. तर प्रेमाविरानो, ही संधी गमावू नका.
सांग तिला... तुझ्या मिठीत आहे जग सारा..... असं सांगत कवी कुसुमाग्रजानी आपल्या कवितेच्या माध्यमातून प्रेमविरांना आवाहन केलंच आहे
Propose Day 2021: आज प्रपोज डे...अशा पद्धतीने व्यक्त करु शकता आपल्या प्रेमाच्या भावना