Travel Tips : प्रवासाचं नियोजन करताय? तर, 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका; अन्यथा तुमचा प्रवासाचा प्लॅन बिघडू शकतो
Travel Tips : जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती कुठेतरी जाण्याचा विचार करते तेव्हा त्याला तिथे जाऊन आपल्या कुटुंबासह आणि मित्रांसह आनंद घ्यायचा असतो.
![Travel Tips : प्रवासाचं नियोजन करताय? तर, 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका; अन्यथा तुमचा प्रवासाचा प्लॅन बिघडू शकतो Travel Tips avoid these mistakes when you plan trip marathi news Travel Tips : प्रवासाचं नियोजन करताय? तर, 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका; अन्यथा तुमचा प्रवासाचा प्लॅन बिघडू शकतो](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/14/b1de9ae9b4294b9bc542727050814d0e1705232993280358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Travel Tips : आपल्यापैकी अनेक जण असे असताता ज्या फिरण्याची (Travel Tips) फार आवड असते. असे लोक सुट्टीची फक्त वाट पाहत असतात. कामाच्या दरम्यान ती ते चार दिवसांची सुट्टी मिळाली की हे ट्रॅव्हल प्रेमी बॅग उचलतात आणि फिरण्यचा बेत करतात. फिरायला जाताना आपल्या कुटुंबीयांचा, मित्र-परिवाराचा आनंद आपल्यासाठी फार महत्त्वाचा असतो. पण, जर तुम्ही तुमचा प्रवासाचा आराखडा हुशारीने आणि नीट बनवला नाही तर तुम्हाला प्रवासांना विविध समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
अशा वेळी, जर तुम्हाला तुमचे प्रवासाचे बजेट बिघडवायचे नसेल किंवा कुटुंबियांबरोबर फिरण्याचा चांगला आनंद घ्यायचा असेल तर या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
उशिरा बुकिंग करू नका
जर तुम्ही अशा ठिकाणी फिरायला जात आहात जिथे तुम्ही स्वत:चं वाहन नेऊ शकत नाही आणि त्यासाठी तुम्हाला ट्रेन किंवा फ्लाईट बुक करावी लागेल. तर, अशा वेळी सर्वात आधी बुकिंगची माहिती घेतल्यानंतरच गाडी बुक करा. तुमच्या सोयीनुसार आणि बजेटनुसार तुम्ही ती बुक करू शकता. वेटिंग तिकिटांवर आधारित तुमच्या प्रवासाचे प्लॅन ठरवू नका. कारण तिकीट कन्फर्म न झाल्यास तुमचा संपूर्ण प्लॅन बिघडू शकतो. जर तुम्ही फ्लाईटमधील शेवटचे तिकीट बुक केले असेल तर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील.
बजेटमध्ये शॉपिंग करा
प्रत्येकाला प्रवासाचा आनंद घ्यायचा असतो. अशा वेळी अनेकदा लोक बजेट विसरून खरेदीला जातात. पण, आपण बजेटची विशेष काळजी घेतली पाहिजे. आवश्यक वस्तू घरून घेऊन आल्यास पैशांची देखील बचत होईल. कारण पर्यटनस्थळी जाणं आणि खरेदी करणं अधिक महागात पडू शकतं. तुम्ही एखाद्या पर्यटन स्थळी जाऊन काही अनोख्या गोष्टी किंवा तुमच्या सहलीची आठवण करून देणार्या गोष्टींची खरेदी करू शकता.
हॉटेलच्या खोलीबाबत चूक करू नका
तुम्ही कुठेही प्रवास करण्याचा विचार करत असाल तर हॉटेल रूम बुक करायला विसरू नका. पर्यटन स्थळाला भेट दिल्यानंतर हॉटेल बुक करू असा अनेकांचा समज असतो. मात्र अशा परिस्थितीत गर्दीमुळे तिथे हॉटेल बुकिंग मिळणे कठीण होऊ शकते. म्हणून, आधीच तुमची खोली ऑनलाईन बुक करा.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Health Tips : हिवाळ्यात वाढलेला कोलेस्ट्रॉल कमी करायचाय? 'या' 5 गोष्टींचा आहारात समावेश करा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)