Travel : साईबाबांचे भक्त आहात? तर आज जगातील 'या' मंदिरांबद्दल एकदा जाणून घ्या..! मन:शांती लाभेल, टेन्शन होईल दूर
Travel : साईबाबांचे भक्त केवळ भारतातच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात आहेत. जर तुम्हीही साईबाबांचे भक्त असाल, तर तुम्ही जगातील या प्रमुख मंदिरांना भेट देऊ शकता.
Travel : साईबाबांचे भक्त केवळ भारतातच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात आहेत. साईबाबा हे संत आणि देवाचे अवतार असल्याचे म्हटले जाते. त्यांचा कोणत्याही धर्माशी संबंध नाही. ते नेहमी म्हणायचे की 'सबका मालिक एक' म्हणजेच सर्वांचा देव एकच आहे. त्यामुळे विविध धर्माचे लोक त्यांची पूजा करतात. साईबाबांना समर्पित अनेक मंदिरं जगात आहेत. आज केवळ भारतातच नाही, तर जगातील विविध देशांमध्ये अशी मंदिरे आहेत, जिथे लोकांना भेट देतात. साईबाबांच्या या मंदिरांना भेट दिल्यानंतर भक्तांना एक विलक्षण मन:शांती लाभते, अशी भाविकांची धारणा आहे. तर आज आम्ही तुम्हाला जगभरातील साईबाबांच्या काही प्रमुख मंदिरांबद्दल सांगणार आहोत. जी कदाचित काही लोकांना माहित नसावीत.
निःस्वार्थ सेवेच्या शिकवणीतून जगभरातील लोकांना प्रेरणा
शिर्डी साईबाबांचे असंख्य भक्त जगाच्या कानाकोपऱ्यात राहतात. साई बाबा हे भारतातील आणि परदेशातील लाखो लोकांद्वारे पूजलेले सर्वात आदरणीय आध्यात्मिक संत आहेत. साईबाबांनी दिलेल्या निःस्वार्थ सेवेच्या शिकवणीतून ते जगभरातील लोकांना प्रेरणा देत आहेत. यामुळेच साईबाबांवर लोकांची अतूट श्रद्धा आहे.
साईबाबा मंदिर, शिर्डी, महाराष्ट्र
जेव्हा जेव्हा साईबाबांची चर्चा होते तेव्हा सर्वात पहिले नाव येते ते शिर्डीचे. शिर्डी हे असे ठिकाण आहे जिथे साईबाबांनी आपले बहुतेक आयुष्य व्यतीत केले. त्यांच्या भक्तांनी त्यांचे चमत्कार त्यांच्या डोळ्यांनी पाहिले, अशी भाविकांची धारणा आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील शिर्डी येथील साईबाबा मंदिर हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे मंदिर मानले जाते. त्यांच्या भक्तांसाठी हे सर्वात महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे. या मंदिराची स्थापना साई बाबांनी ज्या ठिकाणी केली, त्या ठिकाणी त्यांची समाधी बांधण्यात आली आहे.
शिर्डी साई परिवार, कॅलिफोर्निया
शिर्डी साई कुटुंब फ्रॅमोंट, कॅलिफोर्निया येथे आहे. शिर्डी साई परिवार हे अमेरिकेतील सर्वात मोठ्या साईबाबा मंदिरांपैकी एक आहे. येथे साईबाबांची आरती आणि भजन सोबतच उत्सवही मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. साईबाबांना मानणारे भक्त अमेरिकेतील शिर्डी साई परिवाराला नक्कीच भेट देतात.
श्री शिर्डी साईबाबा मंदिर, सिडनी
ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे असलेले हे मंदिर साई बाबांना समर्पित आहे. ऑस्ट्रेलियात राहणारे भारतीय बाबांचे दर्शन घेण्यासाठी येथे मोठ्या संख्येने येतात. साईबाबांच्या शिकवणी आणि तत्त्वांचा प्रचार करण्यासाठी येथे अनेक प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि उत्सव आयोजित केले जातात.
शिर्डी साईबाबा मंदिर, चेन्नई
शिर्डी साईबाबा मंदिर हे भारतातील सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या साईबाबा मंदिरांपैकी एक आहे. हे साईबाबा मंदिर मैलापूर येथे आहे आणि 1952 मध्ये बांधले गेले. या मंदिराचा मुख्य उद्देश साईबाबांचे जीवन, शिकवण आणि तत्त्वांचा प्रचार करणे आहे. येथे असलेली साईबाबांची मोठ्या आकाराची मूर्ती उत्कृष्ट पांढऱ्या संगमरवरी वापरून बनवली आहे.
हेही वाचा>>>
Travel : स्वर्गाप्रमाणे भासणारा 'हिमाचल'...जोडीदाराची साथ...सुख आणखी काय असतं! भारतीय रेल्वेतर्फे कमी बजेटमध्ये फिरण्याची संधी, त्वरित जाणून घ्या...
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )