Travel : डोंगर..झाडी..सर्वकाही अनुभवाल! सिक्कीम असो.. मेघालय किंवा आसाम, भारतीय रेल्वेकडून भारतातील स्वर्ग पाहण्याची संधी
Travel : भारताच्या ईशान्य भागातील जवळपास सर्वच ठिकाणांना निसर्गाचं वरदान लाभलंय. इथल्या वातावरणात एक वेगळीच शांतता जाणवते, आता तुम्ही तुमच्या बजेटमध्ये येथे भेट देऊ शकता.
Travel : सिक्कीम असो.. मेघालय असो... नागालॅंड असो किंवा आसाम! भारतातील नॉर्थ ईस्ट म्हणजेच ईशान्य भागातील जवळपास सर्वच ठिकाणांना निसर्गसौंदर्य लाभलंय. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून तुम्हाला एकांतपणा किंवा निवांतपणा हवा असेल, तर तुम्ही या ठिकाणांना एकदा भेट दिलीच पाहिजे. कारण इथल्या वातावरणात एक वेगळीच शांतता जाणवते, लोक अनेकदा सुट्टीत खास निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी परदेशात जायचा प्लॅन करतात, पण भारत देशही याबाबतीत कमी नाही, भारतातील अशी ठिकाणं जिथे निसर्गसौंदर्य भरभरून आहे, तिथे तुम्ही भेट दिल्यास तुम्ही कदाचित परदेशात जायचा प्लॅन रद्द करू शकता. पर्यटकांचा हाच मुद्दा लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने एक अशी सुवर्णसंधी आणली आहे. ज्याच्या माध्यमातून IRCTC नॉर्थ ईस्ट एक्सप्लोर करू शकता, या ठिकाणी तुम्ही तुमच्या बजेटमध्ये येथे प्रवास करू शकता.
अगदी कमी बजेटमध्ये अनुभवा स्वर्गसुख!
भारतीय रेल्वे म्हणजेच IRCTC ने ईशान्येतील अनेक सुंदर ठिकाणं पाहण्याची योजना आणली आहे. ही ट्रीप तुम्ही अगदी कमी बजेटमध्ये पूर्ण करू शकता. IRCTC ने आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे त्याची संपूर्ण माहिती शेअर केली आहे. ज्यामध्ये राहण्यापासून ते जेवणापर्यंत प्रवास विम्यापर्यंतच्या सुविधा उपलब्ध आहेत. तुम्ही IRCTC च्या वेबसाइटवरून बुक करू शकता. ईशान्येतील जवळपास सर्वच ठिकाणे नैसर्गिक सौंदर्याने भरलेली आहेत. तुम्ही अजून इथले कुठलेही ठिकाण एक्सप्लोर केले नसेल, तर आत्ताच प्लॅन करा. IRCTC तुमच्यासाठी एक उत्तम संधी घेऊन आले आहे. पॅकेजशी संबंधित सर्व महत्त्वाचे तपशील जाणून घ्या.
पॅकेजचे नाव- Jewel of North East
पॅकेज कालावधी- 10 रात्री आणि 11 दिवस
प्रवास मोड- ट्रेन
कव्हर केलेले डेस्टिनेशन- चेरापुंजी, गुवाहाटी, कामाख्या, शिलाँग
From the sacred Kamakhya to the misty Cherrapunji – North East India’s wonders await. Book your #IRCTCTour today!
— IRCTC (@IRCTCofficial) August 7, 2024
Click on https://t.co/F5pT5l5iXn to learn more.#FreedomToExplore #IRCTCForYou #ThinkTravelThinkIRCTC #Assam #Meghalaya #VisitNorthEast #TourPackage #VisitIndia… pic.twitter.com/lsulGAW0iM
या सुविधा उपलब्ध होणार
ये-जा करण्यासाठी ट्रेनची तिकिटे उपलब्ध असतील.
राहण्यासाठी हॉटेल सुविधा उपलब्ध असतील.
टूर पॅकेजमध्ये नाश्ता समाविष्ट आहे.
तुम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्सची सुविधाही मिळेल.
प्रवासासाठी एवढी रक्कम आकारली जाईल
या ट्रिपमध्ये तुम्ही एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला 73,295 रुपये मोजावे लागतील.
तर दोन लोकांना प्रति व्यक्ती 42,215 रुपये मोजावे लागतील.
मुलांसाठी वेगळे शुल्क भरावे लागेल. बेडसाठी (5-11 वर्षे) तुम्हाला 19,030 रुपये द्यावे लागतील
बेडशिवाय तुम्हाला 14,755 रुपये द्यावे लागतील.
IRCTC ने ट्विट करून माहिती दिली
IRCTC ने या टूर पॅकेजची माहिती देणारे ट्विट शेअर केले आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, जर तुम्हाला ईशान्येचे सुंदर नजारे बघायचे असतील तर तुम्ही IRCTC च्या या अप्रतिम टूर पॅकेजचा लाभ घेऊ शकता.
अशी बुकींग करू शकता
तुम्ही या टूर पॅकेजसाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकता. याशिवाय, आयआरसीटीसी पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि प्रादेशिक कार्यालयांमधूनही बुकिंग करता येते. पॅकेजशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही IRCTC अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
हेही वाचा>>>
Travel : 15 ऑगस्टच्या लाँग वीकेंडला फिरायचा केलाय प्लॅन? भारतीय रेल्वेकडून सुवर्णसंधी.. खाणं-राहणं सर्व सुविधा..सोबत नैनितालचं सौंदर्य अनुभवा
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )