Travel : केरळचे निसर्ग सौंदर्य तुम्हाला टेन्शन विसरायला लावेल! ऑक्टोबरमध्ये भारतीय रेल्वे देतेय संधी
Travel : ऑक्टोबरमध्ये केरळचे नैसर्गिक सौंदर्य पाहायचंय? तर IRCTC तुम्हाला बजेटमध्ये प्रवास करण्याची संधी देत आहे.
Travel : पृथ्वीवरील स्वर्ग काश्मीरला, तर केरळला भारताची देवभूमी म्हणतात... जर तुम्हालाही ही देवभूमी जवळून अनुभवायची असेल, तर भारतीय रेल्वे तुम्हाला ऑक्टोबरमध्ये खास संधी देत आहे. जिथे तुम्ही कमी बजेटमध्ये एक मनाला शांती देणाऱ्या पिकनिकचा आनंद घेऊ शकता. आणि तुम्हालाही केरळचे निसर्ग सौंदर्य जवळून पाहायचे असेल तर ऑक्टोबरमध्ये येथे येण्याचा प्लॅन करू शकता, कारण IRCTC ने बजेटमध्ये येथे अनेक अद्भुत ठिकाणांना भेट देण्याची संधी आणली आहे. सहलीच्या नियोजनापासून, राहणे, खाण्यापर्यंत ही पिकनिक एन्जॉय करण्याची हमी भारतीय रेल्वेकडून दिली जाते. पॅकेजची किंमत, सुविधा आणि कशी बुक कराल? ते जाणून घ्या.
केरळला भेट देण्यासाठी कोणता ऋतू सर्वोत्तम?
केरळला भेट देण्यासाठी हिवाळ्याची सुरुवात हा सर्वोत्तम ऋतू मानला जातो. या काळात येथील हवामान अतिशय आल्हाददायक असते. या काळात तुम्ही आरामात प्रवासाचा आनंद घेऊ शकता. तुम्ही केरळचे सौंदर्य अजून एक्सप्लोर केले नसेल, तर IRCTC ने एक उत्तम संधी आणली आहे. तुम्ही ऑक्टोबरमध्ये येथे भेट देऊ शकता.
पॅकेजचे नाव- Kerala Vistas
पॅकेज कालावधी- 7 रात्री आणि 8 दिवस
प्रवास मोड- फ्लाइट
कव्हर केलेले डेस्टिनेशन- कोची, कुमारकोम, मुन्नार, थेक्कडी, त्रिवेंद्रम
तुम्ही कधी प्रवास करू शकाल - 9 ऑक्टोबर 2024 पासून
Get ready to be captivated by the magic of Kerala with #IRCTC Tourism. This 8-day adventure promises a kaleidoscope of experiences, from calm backwaters to lush hill stations and rich heritage sites.
— IRCTC (@IRCTCofficial) June 5, 2024
Destinations: #Kochi, #Munnar, #Thekkady, #Kumarakom, #Thiruvananthapuram… pic.twitter.com/DAw99xFbbc
IRCTC ने ट्विट करून माहिती दिली
IRCTC ने या टूर पॅकेजची माहिती देणारे ट्विट शेअर केले आहे. ज्यामध्ये तुम्हाला केरळचे सुंदर नजारे पाहायचे असतील तर तुम्ही IRCTC च्या या अप्रतिम टूर पॅकेजचा लाभ घेऊ शकता.
तुम्हाला ही सुविधा मिळेल
तुम्हाला राउंड ट्रिपसाठी इकॉनॉमी क्लासचे फ्लाइट तिकीट मिळेल.
राहण्यासाठी हॉटेल सुविधा उपलब्ध असतील.
या टूर पॅकेजमध्ये नाश्ता आणि रात्रीचे जेवण उपलब्ध असेल.
प्रवासासाठी इतके शुल्क आकारले जाईल
या ट्रिपमध्ये तुम्ही एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला 97,050 रुपये मोजावे लागतील.
दोन लोकांना प्रति व्यक्ती 76,450 रुपये द्यावे लागतील.
तीन लोकांना प्रति व्यक्ती 72,500 रुपये शुल्क भरावे लागेल.
तुम्हाला मुलांसाठी वेगळे पैसे भरावी लागेल.
बेडसाठी (5-11 वर्षे) तुम्हाला 64,600 रुपये द्यावे लागतील आणि बेडशिवाय तुम्हाला 59,200 रुपये द्यावे लागतील.
तुम्ही अशी बुकिंग करू शकता
तुम्ही या टूर पॅकेजसाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकता. याशिवाय, IRCTC पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि प्रादेशिक कार्यालयांमधूनही बुकिंग करता येते. पॅकेजशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही IRCTC अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
हेही वाचा>>>
Travel : भारतातील एक दैवी शक्तीपीठ! 'येथे' पडला होता देवी सतीच्या स्तनाचा तुकडा? 'अशी' करा ट्रीप प्लॅन
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )