Monsoon Trek : टेन्शन विसराल.. मूड होईल फ्रेश... मान्सून ट्रेकिंगची मजा होईल दुप्पट! फक्त 'या' सेफ्टी टिप्स फॉलो करा
Travel : या पावसाळ्यात व्यस्त जीवनातून वेळ काढत निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेतला, तर काही काळासाठी का होईना, तुम्ही तुमचं सगळं टेन्शन विसराल, सोबत तुमचा मूडही फ्रेश होईल.
Monsoon Trek Tips : रोज कंटाळवाणा प्रवास, धकाधकीचं जीवन आणि कामाचा ताण.. यामुळे अनेक लोक स्वत:ला वेळ देत नाही. पण या पावसाळ्यात तुम्ही तुमच्या व्यस्त जीवनातून वेळ काढला आणि निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेतला तर काही काळासाठी का होईना, तुम्ही तुमचं सगळ टेन्शन विसराल, सोबत तुमचा मूडही फ्रेश होईल, जर तुम्ही पावसाळ्यात ट्रेकिंगचा आनंद घेण्यासाठी बाहेर जात असाल, तर काही गोष्टी अशा आहेत, ज्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मान्सून ट्रेकिंग सुरक्षित आणि संस्मरणीय बनवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत, ज्या तुम्ही फॉलो केल्या, तर मान्सून ट्रेकिंगची मजा दुप्पट होईल...
मान्सून ट्रेकिंगची मजा होईल दुप्पट! फक्त अशी काळजी घ्या
मान्सूनचे आगमन होताच सर्वत्र वातावरण अगदी आल्हाददायक होते, पावसाळ्यात जवळपास सगळ्यांनाच प्रवास करायला आवडतो. त्यामुळे, जेव्हा जेव्हा कोणाला वेळ मिळेल तेव्हा ते प्रत्येक ऋतूत आपल्या आवडत्या ठिकाणी भेट देण्यासाठी बाहेर पडतात. काहींना प्रवासासोबतच अनेकांना साहसी उपक्रमही करायला आवडतात. म्हणूनच रिव्हर राफ्टिंग, स्कायडायव्हिंग, पॅराग्लायडिंग, हायकिंग आणि रॉक क्लाइंबिंगसाठी बरेच लोक डोंगरावर जात असतात. जेव्हा साहसी अॅक्टीव्हिटीजचा विचार केला जातो, तेव्हा अनेकांना ट्रेकिंग आवडते. ट्रेकिंग ही एक गोष्ट आहे, जर तुम्हीही पावसाळ्यात ट्रेकिंगचा आनंद घेण्यासाठी डोंगरावर जात असाल, तर आम्ही तुम्हाला काही उत्तम टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहोत, ज्या फॉलो करून तुम्ही मान्सून ट्रेकिंग सुरक्षित आणि संस्मरणीय बनवू शकता.
योग्य जागा निवडा
जर तुम्हाला पावसाळ्यात ट्रेकिंगचा आनंद घ्यायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला योग्य ठिकाण निवडावे लागेल. जर तुम्ही पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी उंच डोंगरावर जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी योग्य ठिकाण निवडले पाहिजे. तसेच पूर किंवा भूस्खलनाचा धोका असलेल्या ठिकाणी कधीही ट्रेकिंगला जाऊ नये. याशिवाय मुसळधार पावसातही घराबाहेर पडू नका.
ग्रुपमध्ये ट्रेकला जा..
ट्रेकिंगसाठी बाहेरगावी जात असाल तर ग्रुपने बाहेर जावे. विशेषतः पावसाळ्यात तर ग्रुपसोबत बाहेर पडायलाच हवे. जर तुम्ही एखाद्या ग्रुपसोबत पावसाळ्यात ट्रेकिंगला गेलात तर तुम्हाला मजा येईल आणि ते तुम्हाला कोणत्याही अडचणीत मदतही करू शकतात. ग्रुपमध्ये ट्रेकिंगला जाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे एकमेकांचा हात धरून आपण सर्वात कठीण ट्रेक सहज पार करू शकतो. याशिवाय ट्रेकिंगदरम्यान मित्रमंडळीही एकमेकांना मार्गदर्शन करत असतात.
वॉटरप्रूफ पिशवी घेऊन जा
जर तुम्ही पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी बाहेर जात असाल तर 100% वॉटर प्रूफ बॅग आवश्यक आहे. त्याशिवाय जर तुम्ही ट्रेकिंगला बाहेर गेलात तर तुमच्या सामानाचे नुकसान तर होतेच पण ट्रेकिंगची मजाही बिघडते. जर तुमच्याकडे वॉटर प्रूफ पिशवी नसेल, तर तुम्ही प्लास्टिकचे आवरण असलेली सामान्य पिशवी घेऊन जाऊ शकता आणि पाऊस पडल्यावर पिशवी प्लास्टिकने झाकून ठेवू शकता.
स्पाइक शूज आणि रेनकोट घालण्यास विसरू नका
जर तुम्ही पावसाळ्यात डोंगरात ट्रेकिंगला जात असाल तर तुमच्यासोबत रेन कोट असणे खूप गरजेचे आहे. जर तुमच्याकडे रेन कोट असेल तर तुम्ही ओले होण्यापासून आणि आजारी पडण्यापासून स्वतःचे संरक्षण करू शकता. रेन कोट व्यतिरिक्त, तुमच्यासाठी स्पाइक शूज असणे खूप महत्वाचे आहे. पावसाळ्यात ट्रेकिंग करताना पाय खूप घसरतात, अशा परिस्थितीत स्पाइक शूज घातले तर घसरण्याची भीती नसते. आजकाल स्पाइक शूज स्वस्त दरात बाजारात सहज मिळतात.
फक्त या टिप्स लक्षात ठेवा
जर तुम्ही पावसाळ्यात ट्रेकिंगला जात असाल तर तुम्ही इतर अनेक टिप्सकडेही लक्ष देऊ शकता. जसे-
ट्रेकिंगला निघण्यापूर्वी काही आवश्यक औषधे पॅक करायला विसरू नका.
तुम्ही प्रवासासाठी काही फास्ट फूड देखील पॅक करू शकता.
पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी कॅम्पिंग टेंट सोबत ठेवावा.
ट्रेकिंगसाठी तुम्ही टोपी देखील घालू शकता, जेणेकरून डोळ्यात पाणी येणार नाही.
हेही वाचा>>>
Travel : 'मुंज्या' चित्रपटात दिसणारं महाराष्ट्रातील 'ते' सुंदर गाव! मान्सून पिकनिकसाठी Best ऑप्शन, कलाकरांनाही भुरळ
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )