(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Travel : बर्फाचे डोंगर..पांढऱ्याशुभ्र नद्या..हिरवा निसर्ग..! बॉलीवूड चित्रपटांतील 'या' एकापेक्षा एक ठिकाणांना बनवा हनिमून डेस्टिनेशन, फोटो येतील सुंदर
Travel : बॉलीवूड चित्रपटांची शूटिंग लोकेशन्स केवळ चित्रपटांमध्येच सुंदर दिसत नाहीत, तर ती खऱ्या आयुष्यात हनिमून डेस्टिनेशन म्हणूनही परिपूर्ण आहेत.
Travel : हिरवागार निसर्ग.. एक सुंदर गाणं, त्या गाण्यावर हिरो-हिरोईन्स नाचत आहेत, त्यांच्या पाठीमागे दिसणारा बर्फाचा डोंगर असे एखादे स्वप्नवत भासणारे दृश्य प्रत्यक्षात पाहायला कोणाला आवडणार नाही, तुमचे नुकतेच लग्न झाले असेल, आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराला घेऊन ..हनिमूनला जायचंय, पण कोणत्या ठिकाणी जावं, जिथे एकांत मिळेल, तसेच ते ठिकाणही सुंदर आणि सुरक्षित हवं, असे विविध प्रश्न जर तुमच्याही मनात असतील तर चिंता करू नका, आज आम्ही तुम्हाला चित्रपटात दाखवलेल्या काही प्रसिद्ध ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे गेल्यानंतर तुम्ही हिरो-हिरोईन असाल. आणि तुमच्या आयुष्यातील बेस्ट हनिमून ठरेल.. जाणून घ्या..
या ठिकाणांना भेट देऊ शकता
बर्फाच्छादित पर्वत, धुकं आणि थंड हवामान यासारखी सुंदर ठिकाणे तुम्ही बॉलिवूड चित्रपटांमध्ये पाहिली असतीलच. अनेकांना असे वाटते की चित्रपटांमध्ये दाखवण्यात आलेली शूटिंग लोकेशन्स देशाबाहेर शूट केली गेली असावीत, पण तुम्ही चुकीचे आहात. त्यामुळे जवळपास सर्वच बॉलीवूड चित्रपटांमध्ये दाखवण्यात आलेली दृश्ये केवळ भारतातील आहेत. जर तुम्ही हनिमूनसाठी भारतात कुठेतरी जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या ठिकाणांना भेट देऊ शकता. हे सर्व जोडप्यांसाठी रोमँटिक ठिकाणांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो जोडपी या ठिकाणी भेट देण्यासाठी येतात. तुम्हाला तुमचा हनिमून खास आणि संस्मरणीय बनवायचा असेल, तर तुमच्या ट्रॅव्हल लिस्टमध्ये बॉलीवूड चित्रपटांची ही शूटिंग लोकेशन्स समाविष्ट करा.
शिमला - जब वी मेट'मधील 'आओगे जब तुम' हे गाणं येथे शूट झालं
जर बजेट कमी असेल आणि तुम्हाला भारतातील स्वस्त ठिकाणी हनिमून साजरा करायचा असेल, तर तुम्ही शिमल्याला जाऊ शकता. हिमाचल प्रदेशची राजधानी, शिमला हे थंड हवामान, हिरव्यागार टेकड्या आणि ब्रिटीशकालीन वास्तुकलेसाठी ओळखले जाते. अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचे शूटिंग येथे झाले आहे, ज्यामध्ये 'जब वी मेट'मधील 'आओगे जब तुम' हे गाणेही येथे शूट करण्यात आले आहे. हे गाणे शिमल्याच्या मॉल रोडवर शूट करण्यात आले आहे. याशिवाय 3 इडियट्स, बँग बँग, तमाशा आणि ब्लॅक या चित्रपटांचे शूटिंगही शिमल्यात झाले आहे.
केरळ - 'काश्मीर में... तू कन्याकुमारी' गाण्याचे शूटिंगही मुन्नारजवळ झाले
शिमल्याशिवाय तुम्ही हनिमूनसाठी केरळलाही जाऊ शकता. केरळ हे रोमँटिक ठिकाणांच्या यादीत येते. कारण इथले हवामान वर्षभर लोकांना आकर्षित करते. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हे ठिकाण आणखीनच सुंदर बनते, त्यामुळे या काळात तुम्ही भेट देत असाल तर तुमच्या सहलीचे पैसे मोजावे लागतील. "देवाचा देश" म्हणून ओळखले जाणारे केरळ हे नैसर्गिक सौंदर्य, बॅकवॉटर आणि हिरव्यागार दऱ्यांसाठी ओळखले जाते. त्यामुळे जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर इथे नक्की जा. "बाहुबली: द कन्क्लुजन" चा सीन केरळमधील अथिरापल्ली वॉटरफॉल्स येथे शूट करण्यात आला. याशिवाय 'काश्मीर में... तू कन्याकुमारी' गाण्याचे शूटिंगही मुन्नारजवळ झाले आहे.
उदयपूर - बाजीराव मस्तानी, जोधा अकबर, भूल भुलैया या चित्रपटांचे चित्रीकरण येथे झाले
‘सिटी ऑफ लेक्स’ उदयपूरचे दृश्य तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये पाहिले आहे. हे ठिकाण जोडप्यांना भेट देण्यासाठी देखील सर्वोत्तम आहे. दूरदूरवरून पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात. याठिकाणी तुम्हाला देश-विदेशातील पर्यटकांची गर्दी पाहायला मिळेल. उदयपूर हे भव्य राजवाडे आणि शांत तलावांसाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही सिटी पॅलेस, लेक पिचोला, जग मंदिर आणि बागोर की हवेली सारख्या ठिकाणांना भेट दिली पाहिजे. गोलियों की रासलीला राम-लीला, बाजीराव मस्तानी, जोधा अकबर, भूल भुलैया या चित्रपटांचे चित्रीकरण येथे झाले आहे.
हेही वाचा>>>
Monsoon Travel : मुंबई-पुण्यापासून जवळ.. छोट्या पायवाटेने 'या' सुंदर धबधब्याकडे पोहचा, पण काळजी घेऊनच! मोजक्या लोकांनाच माहित...
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )