Travel : पावसाळ्यात 'इथे' जणू स्वर्गच अवतरतो! महाराष्ट्रातील भगवान शंकराचे 'असे' ठिकाण, जे सह्याद्रीच्या कुशीत वसलंय
Travel : आज आम्ही तुम्हाला भगवान शंकराच्या अशा एका ठिकाणाबद्दल सांगणार आहोत. जे सह्याद्रीच्या रांगेत हिरव्यागार पर्जन्यवनांनी वेढलेले आहे. इथे तुम्हाला स्वर्ग पृथ्वीवर अवतरल्याचा भास होईल.
Travel : अनेक पर्यटक असे असतात, ज्यांना निसर्गाचा आनंद लुटायला आवडतो, मातीच्या सुगंधाने भरलेल्या हवेत, निसर्गाचा आस्वाद घेत, पावसाचे थेंब अंगावर झेलत स्वत:ला हरवून बसतात, आता मान्सून जवळ आलाय, अशात महाराष्ट्रात पावसाळ्यात भेट देण्याच्या काही उत्तम ठिकाणं आहेत, जी तुमच्या बकेट लिस्टमध्ये निश्चितच असली पाहिजे. हे एक असे ठिकाण आहे, जिथे भेट देण्यासाठी पावसाळा सर्वोत्तम काळ आहे. कारण हीच वेळ असते जेव्हा निसर्गाचे सौंदर्य प्रत्येक ठिकाणाला अधिक मोहक बनवते. आज आम्ही तुम्हाला भगवान शंकराचे अशा एका ठिकाणाबद्दल सांगणार आहोत. जिथे गेल्यानंतर तुम्हाला जणू स्वर्ग पृथ्वीवर अवतरल्याचा भास होईल.
ट्रेकर्स, निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफी प्रेमींमध्येही प्रसिद्ध ठिकाण - भीमाशंकर ज्योतिर्लिंग
आम्ही ज्या ठिकाणाबद्दल बोलत आहोत ते ठिकाण म्हणजे भीमाशंकर ज्योतिर्लिंग.... महाराष्ट्रातील पुण्याजवळील सह्याद्रीच्या रांगेत हिरव्यागार पर्जन्यवनांनी वेढलेले आहे. भगवान शंकराचे स्थान भीमाशंकर हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी हे एक आहे. तिथले हवामान आणि स्थान यामुळे भीमाशंकर केवळ धार्मिक यात्रेकरूंमध्येच नाही तर ट्रेकर्स, निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफी प्रेमींमध्येही प्रसिद्ध आहे. तसेच, मुंबई-पुणे जवळ असल्यामुळे, शहरांमध्ये राहणाऱ्या अनेक लोकांसाठी हे वीकेंड ट्रिपचे सर्वोत्तम ठिकाण मानले जाते.
सह्याद्री पर्वताच्या कुशीत वसलेले भगवान शंकराचे स्थान
महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वताच्या कुशीत वसलेले भीमाशंकर मंदिर हे प्रतिष्ठित ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे प्राचीन मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. पौराणिक कथेनुसार, इथली भीमा नदी, ज्याला चंद्रभागा म्हणूनही ओळखले जाते, तिचा जन्म भगवान शिव आणि राक्षस त्रिपुरासुर यांच्यातील युद्धात झाला. या महत्त्वपूर्ण घटनेमुळे मंदिराचे नाव आणि पवित्र स्थान वाढले. मंदिराचा ऐतिहासिक वारसा शतकानुशतके पसरलेला आहे, हे ठिकाण यात्रेकरू आणि भक्तांना आकर्षित करतो. भीमाशंकर ज्योतिर्लिंगाशिवाय इतरही अनेक ठिकाणे आहेत, जिथे तुम्ही भेट देऊ शकता. भीमाशंकर सहल तुमचा जोडीदार, कुटुंब आणि मित्रांसोबत करता येईल.
भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिराला भेट देण्याची वेळ
हे मंदिर पहाटे 4:30 ते दुपारी 3:00 आणि पुन्हा दुपारी 4:00 ते रात्री 9:30 पर्यंत खुले असते. हे प्रसिद्ध मंदिर नगर शैलीत बांधलेले आहे. मंदिराची रथासारखी दिसणारी अनोखी रचना हे वास्तुशिल्प रचनेचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य
मंदिराला भेट दिल्यानंतर, आपण भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य सारख्या इतर अनेक ठिकाणी भेट देऊ शकता. येथे खळखळणारे धबधबे, हिरवीगार जंगलं आणि डोंगराचे सुंदर दृश्य पाहायला मिळते. वनस्पती आणि प्राण्यांच्या समृद्ध विविधतेसह, हे ठिकाण वन्यजीव आणि छायाचित्रण प्रेमींसाठी आवडते ठिकाण आहे. अनेक दुर्मिळ प्रजातींच्या खारी आणि पक्षी तुम्हाला येथे पाहायला मिळतील. हे ठिकाण बर्डलाइफ इंटरनॅशनलने महत्त्वाचे पक्षी क्षेत्र (IBA) म्हणून याला ओळख प्राप्त झाली आहे.
ट्रेकिंगसाठी पावसाळा हा उत्तम काळ
भीमाशंकरमध्ये ट्रेकिंगसाठी पावसाळा हा उत्तम काळ आहे. जर तुम्हाला पर्वत आवडत असतील आणि तुम्ही ट्रेकिंग करत असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. नैसर्गिक सौंदर्य आणि चित्तथरारक दृश्यांनी भरलेल्या डोंगरावर तुम्ही ट्रेकिंगला जाऊ शकता. येथे तुम्ही घनदाट जंगलात ट्रेक करू शकता, जिथे पक्ष्यांचा किलबिलाट तुमच्या सोबत असेल. इथे दोन लोकप्रिय ट्रेकिंग मार्ग आहेत: गणेश घाट, जो 8 किमीचा सोपा ट्रेक आहे आणि सिद्धी घाट, जो पायऱ्यांनी थोडा अवघड आहे.
हनुमान तलाव, गुप्त भीमाशंकरला भेट द्या.
या ठिकाणी असलेला हनुमान तलाव हा शांत आणि स्वच्छ तलाव आहे, चारही बाजूंनी हिरवाईने वेढलेला आहे. त्याच्या तीरावर बसून निसर्गाच्या कुशीत बसल्याचा भास होईल. इथल्या ताज्या हवेत श्वास घेतल्यास तुम्हाला शांतता मिळेल. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी जवळच्या भोरगिरी गावात शेकोटी महोत्सव भरवला जातो, जिथे हजारो शेकोटी गावाला उजळून टाकतात. हे ठिकाण पवित्र स्थान भीमा नदीचे उगमस्थान मानले जाते, हे स्थान असे आहे, जिथे नैसर्गिक झऱ्यांचा प्रवाह शिवलिंगावर पडतो. या पवित्र स्थळाला मोठ्या संख्येने भाविक भेट देतात. भीमाशंकरला जाण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा सर्वोत्तम काळ आहे. यावेळी पावसाळा कमी असल्याने येथे हिरवळ आणि अतिशय आल्हाददायक वातावरण आहे. वन्यजीव अभयारण्य पाहण्यासाठी आणि ट्रेकिंगसाठी देखील हा योग्य हंगाम आहे. तुम्ही पुण्याहून बस, ट्रेन किंवा कारने इथे येऊ शकता.
कसे पोहचाल?
मुंबई ते भीमाशंकर अंतर आणि वेळ : 220 किमी आणि 5 तास
पुणे ते भीमाशंकर अंतर आणि वेळ : 110 किमी आणि 3 तास
मंचर फाटा - भीमाशंकरला रस्त्याने जायला पुणे-नगर रस्त्यावरच्या मंचरला फाटा आहे.
महाराष्ट्राच्या इतर भागांशी कनेक्टिव्हिटी : महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून भीमाशंकरला रस्त्याने सहज पोहोचता येते, सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन पुण्यातील शिवाजी नगर 127 किमी अंतरावर आहे.
हेही वाचा>>
Hidden Gems Travel : समुद्रावरील शांततेची अनुभूती.. सोबत गणपती बाप्पाचे सानिध्य! कोकणातील 'हे' अप्रतिम ठिकाण पाहताच भान हरपेल
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )