(Source: Poll of Polls)
Travel : ट्रॅव्हल प्रेमींसाठी खुशखबर! मुंबई-गुजरातहून भारतीय रेल्वेचे स्वस्त टूर पॅकेज सुरू होतायत, आता कुटुंबासह बिनधास्त फिरा, जाणून घ्या..
Travel : जर तुम्ही कुटुंबासोबत ट्रीपचा प्लॅन करत असाल, त्यासाठी वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाचवायची असेल, तर तुम्ही भारतीय रेल्वेच्या या स्वस्त टूर पॅकेजसह तुमच्या सहलीचे नियोजन करा. जाणून घ्या..
Travel : आजकालच्या धकाधकीच्या जीवनातून दोन क्षण निवांत जगता येईल, यासाठी अनेक जण आपल्या कुटुंबासह किंवा जोडीदारासोबत एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी ट्रीप प्लॅन करत असतात. ज्या ठिकाणी कसलाही कामाचा ताण, जबाबदाऱ्यांचं ओझं नसेल अशा ठिकाणी आठवडाभर राहायला कोणाला आवडणार नाही? पण काही वेळेस बजेट आणि वेळेअभावी हा प्लॅन बनता बनता रद्द होतो. मात्र जर तुम्ही कुटुंबासोबत ट्रीपचा प्लॅन करत असाल, त्यासाठी वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाचवायची असेल, तर तुम्ही भारतीय रेल्वेच्या या स्वस्त टूर पॅकेजसह तुमच्या सहलीचे नियोजन करा. जाणून घ्या..
भारतीय रेल्वेच्या टूर पॅकेजने प्रवास करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकेल
जर तुम्ही कुटुंबासोबत सहलीची योजना आखत असाल तर भारतीय रेल्वेच्या टूर पॅकेजसह प्रवास करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. पण प्रवास करण्यापूर्वी पॅकेजमध्ये उपलब्ध सुविधांकडे लक्ष दिले पाहिजे. याच्या मदतीने तुम्ही पॅकेजची फी आणि सुविधा पाहून खर्च जाणून घेऊ शकता. भारतीय रेल्वे वेळोवेळी देशातील विविध ठिकाणांहून प्रवास सुरू करते. या टूर पॅकेजच्या माध्यमातून कुटुंबातील सर्व सदस्यांच्या गरजांची काळजी घेतली जाते, मुलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी सोयीस्कर निवास, उत्तम जेवण आणि इतर अॅक्टिव्हिटी... आजच्या लेखात, आम्ही तुम्हाला मुंबई आणि गुजरातपासून सुरू होणाऱ्या टूर पॅकेजची सविस्तर माहिती देणार आहोत.
मुंबई ते अहमदाबाद टूर पॅकेज
हे पॅकेज 14 ऑगस्टपासून सुरू होत आहे.
हे 4 रात्री आणि 5 दिवसांचे टूर पॅकेज आहे.
या टूर पॅकेजची सुरुवात मुंबईपासून होत आहे.
पॅकेज फी - दोन लोकांसोबत प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज फी रु 25,235 आहे.
तीन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 20,685 रुपये आहे.
मुलांसाठी पॅकेज फी - 19,575 रुपये.
सुवर्ण मंदिर/श्री कालहस्ती/तिरुपती/वेल्लोर टूर पॅकेज
हे पॅकेज 20 ऑगस्टपासून सुरू होत आहे.
हे 6 रात्री आणि 7 दिवसांचे टूर पॅकेज आहे.
हे टूर पॅकेज अहमदाबाद, राजकोट आणि सुरत येथून सुरू होत आहे.
पॅकेज फी- दोन लोकांसोबत प्रवास करत असल्यास प्रति व्यक्ती पॅकेज फी 22900 रुपये आहे.
तीन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 20500 रुपये आहे.
मुलांसाठी पॅकेज फी - 16200 रु.
यामध्ये तुम्हाला स्लीपर कोचमध्ये प्रवास करण्याची संधी मिळेल.
हैदराबाद/श्रीशैलम टूर पॅकेज
हे पॅकेज 15 ऑगस्टपासून सुरू होत आहे.
हे 4 रात्री आणि 5 दिवसांचे टूर पॅकेज आहे.
हे टूर पॅकेज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई, पुणे आणि सोलापूर येथून सुरू होत आहे.
पॅकेज फी- दोन लोकांसोबत प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज फी 22,700 रुपये आहे.
तीन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 21,900 रुपये आहे.
मुलांसाठी पॅकेज फी - रु. 17,400.
तुम्ही भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरून बुकिंग करता, तेव्हा पॅकेजमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा लक्षात ठेवा.
हेही वाचा>>>
Travel : डोंगर..झाडी..सर्वकाही अनुभवाल! सिक्कीम असो.. मेघालय किंवा आसाम, भारतीय रेल्वेकडून भारतातील स्वर्ग पाहण्याची संधी
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )