(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Travel : अप्रतिम निसर्गसौंदर्य.. स्वर्ग त्यापुढे फिका! भारतातील 'देवभूमी' पाहण्याची भारतीय रेल्वेकडून सुवर्णसंधी, प्लॅन करू शकता.
Travel : IRCTC देवभूमी उत्तराखंडचे सौंदर्य एक्सप्लोर करण्याची संधी घेऊन येत आहे, तुम्ही जुलैमध्ये योजना बनवू शकता
Travel : अप्रतिम निसर्गसौंदर्य, बर्फाने वेढलेले पर्वत, हवेत गारवा आणि कानावर पडणारे देवाचे मंत्र.. अशा वातावरणात राहणं म्हणजे भाग्यशालीच म्हणावं लागेल. कारण शहरातील गजबजाट, कामाचा ताण, ट्राफिकमुळे आपण स्वत:ला अशा वातावरणात एवढे गुंतवून घेतले आहे की आपल्याला स्व:ताला सुद्धा मन:शांतीची गरज आहे, हे जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणूनच व्यस्त जीवनातून थोड्या काळासाठी ब्रेक घेऊन एकदातरी भारतातील या देवभूमीला भेट दिली पाहिजे. कारण तिथे गेल्यानंतर तुम्ही जे अनुभवणार आहात, त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही, आणि याचसाठी भारतीय रेल्वे भारतातील देवभूमी म्हणजे उत्तराखंड येथे भेट देण्याच्या सुवर्णसंधी देत आहे. जुलैमध्ये तुम्ही ट्रीप प्लॅन करू शकता...
सुंदर आणि आश्चर्याने भरलेले एक अद्भुत ठिकाण
भारतातील देवभूमी म्हणवले जाणारे उत्तराखंड हे सुंदर आणि आश्चर्याने भरलेले एक अद्भुत ठिकाण आहे. तुम्ही निसर्गप्रेमी किंवा साहस प्रेमी असाल, उत्तराखंडमध्ये प्रत्येक प्रकारच्या प्रवाशासाठी पर्याय उपलब्ध आहेत. जर तुम्ही आत्तापर्यंत उत्तराखंड फक्त चित्रांमध्ये पाहिले असेल, तर आता IRCTC तुम्हाला ते जवळून पाहण्याची संधी देत आहे. अगदी कमी बजेटमध्ये तुम्ही अनेक ठिकाणांना भेट देऊ शकता. पॅकेजशी संबंधित सर्व महत्त्वाचे तपशील जाणून घ्या...
देवभूमी उत्तराखंडचे सौंदर्य अजून पाहिले नसेल तर...
IRCTC देवभूमी उत्तराखंडचे सौंदर्य एक्सप्लोर करण्याची संधी घेऊन येत आहे, तुम्ही जुलैमध्ये योजना बनवू शकता. तुम्ही देवभूमी उत्तराखंडचे सौंदर्य अजून एक्सप्लोर केले नसेल, तर IRCTC तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन आली आहे. जुलैमध्ये तुम्ही उत्तराखंडमधील अनेक सुंदर ठिकाणांना एकत्र भेट देऊ शकता. IRCTC चे हे टूर पॅकेज 11 दिवसांसाठी आहे. अगदी कमी बजेटमध्ये तुम्ही या सहलीचे नियोजन करू शकता. तुम्ही देवभूमी उत्तराखंडचे सौंदर्य अजून एक्सप्लोर केले नसेल, तर IRCTC तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन आली आहे. जुलैमध्ये तुम्ही उत्तराखंडमधील अनेक सुंदर ठिकाणांना एकत्र भेट देऊ शकता. IRCTC चे हे टूर पॅकेज 11 दिवसांसाठी आहे. अगदी कमी बजेटमध्ये तुम्ही या सहलीचे नियोजन करू शकता.
IRCTC ने ट्विट करून माहिती दिली
IRCTC ने या टूर पॅकेजची माहिती देणारे ट्विट शेअर केले आहे. ज्यामध्ये तुम्हाला देवभूमी उत्तराखंडचा सुंदर नजारा पाहायचा असेल तर तुम्ही IRCTC च्या या अप्रतिम टूर पॅकेजचा लाभ घेऊ शकता.
DEV BHOOMI UTTARAKHAND YATRA BY BHARAT GAURAV MANASKHAND EXPRESS
— IRCTC (@IRCTCofficial) June 21, 2024
Ex Kochuveli
11 Nights/12 Days
Destinations Covered – Kathgodam – Bhimtal – Almora – Kausani – Ranikhet
Departure Date: 12.07.2024
Package Price: ₹ 28,020/- onwards per person*
Book Now :… pic.twitter.com/5ROyN35hey
पॅकेजचे नाव- देवभूमी उत्तराखंड यात्रा
पॅकेज कालावधी- 10 रात्री आणि 11 दिवस
प्रवास- ट्रेन (भारत गौरव मानसखंड एक्सप्रेस)
कव्हर केलेले स्थानकं- अल्मोडा, बैजनाथ, भीमताल, कौसानी, नैनिताल, रानीखेत
या सुविधा तुम्हाला मिळतील
राहण्यासाठी हॉटेल सुविधा उपलब्ध असतील.
ब्रेकफास्ट आणि रात्रीचे जेवण पॅकेजमध्ये उपलब्ध असेल.
तुम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्सची सुविधाही मिळेल.
या प्रवासासाठी इतके शुल्क आकारले जाईल
यामध्ये तुम्ही स्टँडर्ड पॅकेज घेतल्यास तुम्हाला 28,020 रुपये द्यावे लागतील.
तर डिलक्स पॅकेजसाठी प्रति व्यक्ती 35,340 रुपये शुल्क भरावे लागेल.
मुलांसाठी वेगळे शुल्क भरावे लागेल.