Travel : भारतीय रेल्वेकडून पृथ्वीवरील स्वर्गसुख अनुभवण्याची सुवर्णसंधी! खास काश्मीर टूर पॅकेज, चहू बाजूला निसर्गच निसर्ग!
Travel : तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये काश्मीरचे सौंदर्य एक्सप्लोर करायचे असेल, तर जूनमध्ये भारतीय रेल्वे म्हणजेच IRCTC सोबत प्लॅन करा.
Travel : ते म्हणतात ना.. पृथ्वीवर कुठे स्वर्ग अनुभवायचा असेल तर एकदा काश्मीरला भेट द्यायला पाहिजे. पण काश्मिरला पृथ्वीवरचा स्वर्ग का म्हणतात हे तिथे गेल्यावरच तुम्हाला याची कल्पना येईल. जिथे नजर टाकाल तिथे फक्त निसर्गच निसर्ग.. पर्वतांनी बर्फाची ओढलेली चादर, आणि शहराच्या गजबजाटापासून दूर शांतता आणि सुखद गारवा.. हे क्षण तुमच्या जीवनातील अमूल्य क्षण असतील. कारण तुमच्या डोळ्यांनी तुम्ही हे अनुभवू शकाल. आणि त्यासाठीच भारतीय रेल्वे हेच पृथ्वीवरील स्वर्गसुख अनुभवण्याची सुवर्णसंधी देत आहे. IRCTC चे खास पॅकेजबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत.
प्रत्येक ऋतूत काश्मीरचे रुप वेगळे!
प्रत्येक ऋतूत काश्मीरचे दृश्य वेगळे असते, त्यामुळे जर तुम्हाला इथल्या हिरवीगार दऱ्या पाहायच्या असतील तर उन्हाळ्यात फिरण्याचा बेत करा. मात्र, काश्मीरला जाण्यासाठी खिशात पुरेसे पैसे असावेत. जर तुम्हाला या ठिकाणाचे सौंदर्य तुमच्या बजेटमध्ये एक्सप्लोर करायचे असेल तर तुम्ही IRCTC सोबत प्लॅन बनवू शकता. IRCTC ने अलीकडेच या टूर पॅकेजचे तपशील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याबद्दल येथे जाणून घ्या.
IRCTC ची माहिती, कमी खर्चात सुंदर ठिकाणांना भेट द्या
जूनमध्ये पिकनिकचा प्लॅन करत असाल तर काश्मीर हा एक उत्तम पर्याय आहे. काश्मीरला भेट देण्यासाठी उन्हाळा हा सर्वोत्तम ऋतू आहे आणि जर तुम्हाला बजेटमध्ये येथील सुंदर ठिकाणे एक्सप्लोर करायची असतील तर IRCTC सोबत प्लॅन करा. कमी खर्चात तुम्ही अनेक सुंदर ठिकाणांना भेट देऊ शकता. IRCTC ने या टूर पॅकेजची माहिती देणारे ट्विट शेअर केले आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, जर तुम्हाला काश्मीरचे सुंदर नजारे बघायचे असतील तर तुम्ही IRCTC च्या या अप्रतिम टूर पॅकेजचा लाभ घेऊ शकता.
You don't know what you're missing if you haven't been on a shikara ride over Dal Lake. Explore the region's beauty on the Venice Of The East #Kashmir Tour Package Ex #Jaipur (NJA14) starting on 10.06.2024.
— IRCTC (@IRCTCofficial) May 10, 2024
Book now on https://t.co/kyL4bd4ajU#DekhoApnaDesh #Travel #tour… pic.twitter.com/jccGwpA69H
असे बुक करू शकता
तुम्ही या टूर पॅकेजसाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकता. याशिवाय, आयआरसीटीसी पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि क्षेत्रीय कार्यालयांमधूनही बुकिंग करता येते. पॅकेजशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही IRCTC अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
पॅकेज कालावधी- 5 रात्री आणि 6 दिवस
प्रवास मोड- फ्लाइट
ठिकाण- गुलमर्ग, पहलगाम, श्रीनगर, सोनमर्ग
तुम्ही कुठून प्रवास करू शकता - जयपूर
या सुविधा उपलब्ध होणार आहेत
1. राउंड ट्रिप इकॉनॉमी क्लास फ्लाइट तिकिटांचा पॅकेजमध्ये समावेश आहे.
2. राहण्यासाठी डिलक्स हॉटेलची सुविधा उपलब्ध असेल.
3. या टूर पॅकेजमध्ये नाश्ता आणि रात्रीचे जेवण समाविष्ट केले जाईल.
4. भेट देण्याच्या ठिकाणांचे प्रवेश शुल्क देखील पॅकेजमध्ये समाविष्ट केले आहे.
या प्रवासासाठी इतके शुल्क आकारले जाईल
1. या ट्रिपमध्ये तुम्ही एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला 44,950 रुपये मोजावे लागतील.
2. दोन लोकांना प्रति व्यक्ती 40,255 रुपये द्यावे लागतील.
3. तीन लोकांना प्रति व्यक्ती 38,900 रुपये शुल्क भरावे लागेल.
4. तुम्हाला मुलांसाठी वेगळी फी भरावी लागेल. बेडसाठी (5-11 वर्षे) तुम्हाला 30,490 रुपये द्यावे लागतील आणि बेडशिवाय तुम्हाला 27,805 रुपये द्यावे लागतील.
हेही वाचा>>>
Travel : एका अथांग समुद्राचे अद्भुत सौंदर्य.. निसर्गाची साद अन् जोडीदाराची साथ.. महाराष्ट्रातील स्वर्ग म्हणतात 'या' ठिकाणाला
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )