(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Travel : हर हर महादेव.. भारतीय रेल्वेकडून ज्योतिर्लिंग दक्षिण यात्रेची सुवर्णसंधी! कमी बजेटमध्ये IRCTC चे खास पॅकेज
Travel : तुमच्या धकाधकीच्या जीवनातून ब्रेक घ्या अन् शांततेची अनुभूती मिळवा, भारतीय रेल्वेकडून (IRCTC) ने ज्योतिर्लिंगाला भेट देण्याची संधी, जाणून घ्या सविस्तर...
Travel : रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा काळ विश्रांती घेऊन भगवंताच्या सानिध्यात गेलो, तर निश्चितच आपल्याला सुखद अनुभूती मिळते. परमेश्वराच्या चरणी लीन होतो तेव्हा मनाला शांतता लाभते. असंच पुण्य कमावण्याची संधी भारतीय रेल्वेकडून देण्यात येत आहे. तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही ज्योतिर्लिंगाला गेल्या अनेक वर्षांपासून भेट देण्याची इच्छा असेल, तर IRCTC ने एक चांगली संधी आणली आहे. ज्यामध्ये तुम्हाला भारतात दक्षिणेकडील ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेता येणार आहे. अगदी कमी बजेटमध्ये तुम्ही या टूर पॅकेजचा लाभ घेऊ शकता. या 9 दिवसांच्या दौऱ्यासाठी किती खर्च करावा लागेल? जाणून घ्या..
IRCTC कडून पुण्य कमावण्याची संधी
तुम्हाला दक्षिणेकडील ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यायचे असल्यास, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) ने एक नवीन पॅकेज लॉन्च केले आहे. याअंतर्गत भारत गौरव टुरिस्ट ट्रेनच्या माध्यमातून तुम्ही दक्षिणेकडील ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊ शकता. 25 मेपासून हा प्रवास सुरू होणार आहे. प्रवासाला किती दिवस लागतील आणि त्यात कोणत्या सुविधा उपलब्ध असतील? त्याची संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या.
पॅकेजचे नाव- ज्योतिर्लिंगासह दिव्य दक्षिण यात्रा
पॅकेज कालावधी- 8 रात्री आणि 9 दिवस
प्रवास - ट्रेन
कव्हर केलेले डेस्टिनेशन- अरुणाचल, कन्याकुमारी, मदुराई, रामेश्वरम, तंजावर, त्रिची, त्रिवेंद्रम
तुम्ही कधी प्रवास करू शकाल - 25 मे 2024
Embark on an Unforgettable Journey of Spiritual Discovery with the Divya Dakshin Yatra with #Jyotirlinga by Bharat Gaurav Tourist Train!
— IRCTC (@IRCTCofficial) May 2, 2024
Join us on an enriching 8 Nights and 9 Days expedition as we traverse through the mystical landscapes of South India, exploring its… pic.twitter.com/Gx5Io7SOP0
या सुविधा उपलब्ध असतील
- राहण्यासाठी हॉटेलची सोय असेल.
- या टूर पॅकेजमध्ये सकाळच्या चहापासून नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणापर्यंतच्या सुविधा उपलब्ध असतील.
- तुम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्सची सुविधाही मिळेल.
- प्रवासादरम्यान एक टूर गाईडही तुमच्यासोबत असेल.
या सुविधा समाविष्ट नसतील
स्मारकं, नौकाविहार, साहसी खेळांचे प्रवेश शुल्क या पॅकेजमध्ये समाविष्ट नाही.
जेवणाचा मेनू आगाऊ ठरवला जाईल.
कोणत्याही प्रकारचे रुम सर्व्हिस चार्ज प्रवाशाला स्वतः भरावे लागेल.
प्रवासासाठी एवढी रक्कम आकारली जाईल
इकॉनॉमी क्लास (स्लीपर क्लास)
एकत्र राहणाऱ्या एक ते तीन व्यक्तींसाठी प्रत्येकी - रु. 14,250
प्रति बालक (5-11 वर्षे) - 13,250 रु
स्टॅंडर्ड श्रेणी (3 AC)
सोबत राहणाऱ्या एक ते तीन व्यक्तींसाठी प्रत्येकी - रु 21,900
प्रति बालक (5-11 वर्षे) - रु. 20,700
आराम श्रेणी (2 AC)
सोबत राहणाऱ्या एक ते तीन व्यक्तींसाठी प्रत्येकी - रु 28,450
प्रति बालक (5-11 वर्षे) - रु. 27,010
IRCTC ने ट्विट करून माहिती दिली
IRCTC ने या टूर पॅकेजची माहिती देणारे ट्विट शेअर केले आहे. ज्यामध्ये तुम्हाला ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यायचे असेल तर तुम्ही IRCTC च्या या अप्रतिम टूर पॅकेजचा लाभ घेऊ शकता.
हेही वाचा>>>
Travel : पृथ्वीवरील स्वर्ग 'काश्मीर' ला उगाच नाही म्हणत..! भारतीय रेल्वेकडून जूनमध्ये फिरण्याची उत्तम संधी, जाणून घ्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )