Travel : 'स्वित्झर्लंड, पॅरिस विसरा..लाखो पैसे वाचवा..भारतातच हनिमून एन्जॉय करा..!' 'ही' ठिकाणं इतर देशांपेक्षाही Best!
Travel : आपल्या प्रिय व्यक्तीसोबत प्रवास करणे हा एक सुंदर अनुभव असतो. जोडीदाराला हनिमूनला घेऊन जायचे असेल, तर आम्ही तुम्हाला अशी अनेक ठिकाणं सांगणार आहोत, जी हनिमून साजरा करण्यासाठी सर्वोत्तम आहेत.
Travel : तुमचंही नवीन लग्न झालंय? लग्नाच्या गडबडीत आलेला थकवा दूर करायचाय? जोडीदारासोबत अमूल्य, रोमॅंटिक वेळ घालवायचाय? पण बजेट सुद्धा पाहायचाय.. अशा विविध प्रश्नांवर तुम्हाला उत्तरं आम्ही देणार आहोत. लग्न झाल्यावर जो़डपे सुखी संसाराची स्वप्न रंगवतात.. त्यामुळे लग्नानंतर जोडीदारासोबत वेळ घालवायला कोणाला आवडणार नाही? आपल्या प्रिय व्यक्तीसोबत प्रवास करणे हा एक सुंदर अनुभव असतो. तुमचे नुकतेच लग्न झाले आहे, आणि जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराला हनिमूनला घेऊन जायचे असेल, तर आम्ही तुम्हाला अशी अनेक ठिकाणं सांगणार आहोत, जी हनिमून साजरा करण्यासाठी सर्वोत्तम आहेत. एकूणच, आपला भारत देशच वैविध्यतेने इतका संपन्न आहे की, इथल्या निसर्ग सौंदर्यापुढे परदेशही फिका ठरतो. आम्ही तुम्हाला भारतातील सुंदर हनिमून डेस्टिनेशनबद्दल सांगत आहोत. जी तुमच्या बजेटमध्येही असावीत..
अलेप्पी - लक्षद्वीप समुद्रावर वसलेले शहर
जर तुम्ही नवीन जोडपे असाल तर तुमच्यासाठी अलेप्पीबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे. अलेप्पी हे लक्षद्वीप समुद्रावर वसलेले शहर आहे. केरळमधील हे एक सुंदर ठिकाण आहे, ज्याला जोडप्यांसाठी हनिमून डेस्टिनेशन म्हटले जाते. पाण्यात तरंगणारी हिरवळ, खजुरीची झाडे आणि हाऊसबोट तुमचा दिवस खास होईल. त्याच्या सौंदर्यामुळे त्याला व्हेनिस म्हटले जाते. हनिमून खास करण्यासाठी तुम्ही जोडीदारासोबत येथे जाऊ शकता. अलेप्पीला सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन कोचीन आहे. येथून तुम्ही सहज बस पकडू शकता.
वाराणसी - बोट राइड करताना जोडीदाराला प्रपोज करा
तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत काही धार्मिक स्थळांना भेट द्यायची असेल, तर उत्तर प्रदेशातील वाराणसी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. हे भारतातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक आहे. याला मंदिरे आणि घाटांचे शहर असेही म्हणतात. गंगेच्या पवित्र पाण्यात डुबकी घेण्यापासून तुम्ही येथे बोट राइडचा आनंद घेऊ शकता. बोट राइड दरम्यान आपल्या जोडीदाराला प्रपोज करणे ही एक चांगली कल्पना आहे. वाराणसीला जायचे असेल तर येथून ट्रेन आणि बस सहज उपलब्ध आहेत.
दमण आणि दीवसमोर गोवा, अंदमान देखील फिके
दमण दीव हे एक ठिकाण आहे ज्याच्या समोर गोवा आणि अंदमान देखील फिके पडतात. तुमच्या जोडीदारासोबत एकांतात वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण स्वच्छ आणि सुरक्षित आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी इथे येत असाल तर दमणमधील मोती दमण किल्ला, बॉम जीसस चर्च, नानी दमण आणि जंपोर बीचला भेट द्या. इथे आल्यावर निसर्गसौंदर्याबरोबरच शांतताही मिळते. येथील नागोवा बीच पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. देवका बीचचे सौंदर्यही पाहण्यासारखे आहे.
उदयपूर - तलावांचे शहर
राजस्थानमधील उदयपूर शहर हे राजेशाही जीवनशैली आणि रोमँटिसिझमचे मिश्रण आहे. येथे भरपूर तलाव असल्याने याला तलावांचे शहर असेही म्हणतात. याशिवाय याला आशियाचे व्हेनिस असेही म्हणतात. असे अनेक रॉयल पॅलेस आणि रेस्टॉरंट्स आहेत, जिथे तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत कॅन्डल लाईट डिनर घेऊ शकता. हे ठिकाण वर्षभर पर्यटकांनी भरलेले असल्याने येथे येण्यापूर्वी बुकिंग करा.
कच्छ - सौंदर्याच्या बाबतीत सर्वोत्तम
गुजरातचे कच्छ दिल्लीपासून फार दूर नाही. सौंदर्याच्या बाबतीत हे ठिकाण परदेशात अनेक ठिकाणी अपयशी ठरते. हे ठिकाण म्हणजे संस्कृतीच्या रंगात बुडालेले शहर म्हटले जाते. एकूणच, हे ठिकाण सौंदर्याचे एक अद्वितीय उदाहरण आहे, जे जगभरातील लोकांचे आवडते ठिकाण आहे. येथे तुम्ही उंट सवारीसह इथल्या स्थानिक जेवणाचा आनंद घेऊ शकता. जिकडे पाहताच तिथे सगळीकडे पसरलेल्या वाळूवर आपल्या जोडीदारासोबत अनवाणी चालण्याचा यापेक्षा चांगला अनुभव कोणता असू शकतो.
सुला व्हाइनयार्ड्स - वाईन चाखण्याचा अनुभव
हनिमूनच्या काळात तुम्ही तुमच्या जोडीदाराला नाशिकच्या सुला व्हाइनयार्ड्समध्ये घेऊन जाऊ शकता. हे ठिकाण चवीनुसार विविध प्रकारच्या वाइनसाठी प्रसिद्ध आहे. तुमचा वाईन चाखण्याचा अनुभव आणखी वाढवण्यासाठी, चीज आणि चॉकलेटचा मेनूमध्ये समावेश करण्यात आला आहे. येथील गंगापूर तलावातील बोटींगमुळे तुमची सुट्टी आणखी रोमँटिक बनते.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
हेही वाचा>>>
Travel : अनेकांच्या नजरेपासून दूर..! महाराष्ट्रात काश्मीरचा आनंद अनुभवायचाय? शांत, सुंदर गुप्त ठिकाणं जाणून घ्या