Travel : ही गुलाबी हवा..! पावसातील निसर्गसौंदर्य अन् जोडीदाराची साथ, भारतीय रेल्वेचे सर्वात स्वस्त हनिमून टूर पॅकेज माहित आहेत?
Travel : हनिमून ट्रिप प्लॅन करण्यापूर्वी जोडप्यांना अनेकदा बजेटची चिंता असते. बऱ्याच वेळा तुम्ही अशा ठिकाणी जाता जिथे तुमचा खर्च तुमच्या विचारापेक्षा जास्त होतो.
Travel : ही गुलाबी हवा...वेड लावी जीवा... हे मराठी चित्रपटातील गाणं सर्वांनाच माहित आहे. हे गाणं जसं अंगावर शहारे आणणारे आहे, त्याचप्रमाणे हनिमून म्हटलं की अनेक जोडपं मनात गुलाबी स्वप्न रंगवत असतात. आयुष्यातील पहिला हनिमून हा स्वप्नवत वाटावा यासाठी ठिकाणही तितकंच रोमॅंटीक हवं, सध्या पावसाळा असल्याने देशात निसर्गसौंदर्य अगदी फुलून आला आहे. अशा या गुलाबी वातावरणात जोडीदाराचा हातात हात असेल तर मग आणखी काय हवं..? पण हनिमून ट्रिप प्लॅन करण्यापूर्वी जोडप्यांना अनेकदा बजेटची चिंता असते. पण आता चिंता करण्याचं कारण नाही, कारण भारतीय रेल्वे (IRCTC) तुमच्यासाठी खास सर्वात स्वस्त हनिमून टूर पॅकेज घेऊन आले आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या बजेटमध्ये प्रवास करून आनंद घेऊ शकता..
हनिमून ट्रिप प्लॅन करण्यापूर्वी एकदा हे जाणून घ्या..
हनिमून ट्रिप प्लॅन करण्यापूर्वी जोडप्यांना अनेकदा बजेटची चिंता असते. बऱ्याच वेळा असं होतं की, तुम्ही अशा ठिकाणी जाता, जिथे तुमचा खर्च तुमच्या ठरवलेल्या खर्चापेक्षाही जास्त होतो. त्यामुळे, एक सहल इतकी महाग पडते की काहीजण आपल्या जोडीदारासोबत बरेच दिवस बाहेर जात नाही. मात्र जर तुम्ही टूर पॅकेजसह पिकनिकचा प्लॅन केला असेल तर तुम्हाला प्रवासापूर्वीच खर्चाची माहिती मिळेल.
'या' समस्येचा सामना करावा लागतो
अनेकदा पॅकेजशिवाय सहलीचे नियोजन करणाऱ्या लोकांना विविध समस्येचा सामना करावा लागतो. कारण त्यांना त्यांच्या सहलीशी संबंधित सर्व तयारी स्वतःच करावी लागते. जरी तुम्ही सहलीचे नियोजन करण्यापूर्वी तुमच्या खर्चाची यादी तयार केली असेल, आणि प्रत्यक्षात पाहिल्यानंतर तुम्ही जे नियोजन केले होते त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त खर्च होतो. त्यासाठीच आम्ही आज तुम्हाला भारतीय रेल्वेच्या अशा पॅकेजबद्दल सांगणार आहोत, जे तुमच्या बजेटमध्ये असेल, सोबत पिकनिक तर एन्जॉय करालच, पण अवास्तव खर्च होणार नाही.
चेरापुंजी, डावकी, मावलिनॉन्ग आणि शिलाँग टूर पॅकेज
हे पॅकेज 6 जुलैपासून सुरू होणार आहे.
यामध्ये तुम्हाला 6 रात्री 7 दिवस फिरण्याची संधी मिळणार आहे.
पॅकेजमध्ये तुम्हाला चेरापुंजी, डवकी, मावलिनाँग आणि शिलाँग या चार ठिकाणी नेले जाईल.
पॅकेज फी - 2 लोकांसोबत प्रवास करणाऱ्या प्रति व्यक्ती पॅकेज फी 27,850 रुपये आहे.
अशा प्रकारे तुम्ही 60 हजार रुपयांपेक्षा कमी खर्चात तुमची हनिमून ट्रिप प्लॅन करू शकता.
या पॅकेजमध्ये हॉटेल, पर्यटनासाठी कॅब आणि खाण्याच्या सुविधांचा समावेश असेल.
गुलमर्ग, पहलगाम, सोनमर्ग आणि श्रीनगर टूर पॅकेज
हे पॅकेज 3 ऑगस्टपासून सुरू होत आहे.
हे 5 रात्री आणि 6 दिवसांचे टूर पॅकेज आहे.
पॅकेज फी - 2 लोकांसोबत प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज फी 31,200 रुपये आहे.
या पॅकेजमध्ये तुम्हाला फ्लाइटने प्रवास करण्याची संधी मिळेल.
या पॅकेजमध्ये हॉटेल आणि खाण्याच्या सुविधांचा समावेश आहे.
अशा प्रकारे तुम्ही 60000 रुपयांच्या बजेटमध्ये 4 ठिकाणांना एकाच वेळी भेट देऊ शकता.
तुम्ही भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरून तिकीट बुक करू शकता.
अमृतसर, चंदीगड, धर्मशाला आणि शिमला टूर पॅकेज
हे 6 रात्री आणि 7 दिवसांचे टूर पॅकेज आहे.
यामध्ये तुम्ही कधीही तिकीट बुक करू शकता.
पॅकेज फी - दोन लोकांसोबत प्रवास करत असल्यास, तुम्हाला प्रति व्यक्ती 28245 रुपये द्यावे लागतील.
पॅकेजमध्ये कॅब, हॉटेल आणि खाण्याच्या सुविधा उपलब्ध असतील.
अशा प्रकारे तुम्ही 60000 रुपयांच्या बजेटमध्ये सहज प्रवास करू शकाल.
हेही वाचा>>>
Travel : 'मुंज्या' चित्रपटात दिसणारं महाराष्ट्रातील 'ते' सुंदर गाव! मान्सून पिकनिकसाठी Best ऑप्शन, कलाकरांनाही भुरळ
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )