Travel : एक अथांग समुद्र.. निळंशार पाणी.. नीरव शांतता..! महाराष्ट्रात लपलेलं 'हे' अप्रतिम ठिकाण; जिथलं सौंदर्य पाहून मालदीव, थायलंड विसराल
Travel : महाराष्ट्राचं सौंदर्य सर्वांनाच माहिती आहे. या राज्यात अशी अनेक सुंदर ठिकाणे आहेत, जिथे गेल्यावर तुम्ही परदेश विसरू शकता. जाणून घ्या..
Travel : डोळ्यासमोर एक अथांग समुद्र...निळंशार पाणी..आणि नीरव शांतता, सोबत लाटांचा आवाज... असं दृश्य असेल तर माणसाला या ठिकाणाची भुरळ का पडणार नाही... आजकालच्या धकाधकीच्या जीवनात माणूस केवळ भविष्यासाठी जीवाची ओढाताण करत नुसता धावतोय.. पण या सर्वांतून कुठेतरी ब्रेक घेऊन किमान एक क्षण जरी निवांत जगता आला तर जीवनाचं सार्थक झाल्यासारखे वाटेल. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील अशा एका ठिकाणाबद्दल सांगत आहोत. जिथे गेल्यानंतर तुम्ही परदेश विसराल..
महाराष्ट्रात लपलेला निसर्गाचा खजिना..!
महाराष्ट्र राज्य आपली संस्कृती, ऐतिहासिक आणि सुंदर ठिकाणांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. गेटवे ऑफ इंडिया, लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर आणि पाचगणी अशी महाराष्ट्रातील सर्वोत्तम स्थळं पाहण्यासाठी दररोज हजारो देशी-विदेशी पर्यटक येतात. पण या प्रसिद्ध ठिकाणांव्यतिरिक्त महाराष्ट्रात अशी काही छुपी ठिकाणे आहेत, जिथे एकदा गेल्यावर पर्यटक हिमाचल किंवा उत्तराखंड विसरू शकतो. श्रीवर्धन (Shrivardhan Beach) हा सुद्धा महाराष्ट्राचा लपलेला निसर्गाचा खजिना आहे. या लेखात आम्ही तुम्हाला अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या अशाच काही सुंदर ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे एकदा भेट दिली की तुम्ही परदेश विसरून जाल...
श्रीवर्धन बीच - सौंदर्यात मालदीव, थायलंडपेक्षा कमी नाही..!
श्रीवर्धनमधील प्रेक्षणीय स्थळांबाबत बोलायचं झालं तर श्रीवर्धन बीचचे नाव नक्कीच प्रथम घेतले जाते. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला श्रीवर्धन समुद्र सौंदर्याच्या बाबतीत मालदीव किंवा थायलंडपेक्षा कमी नाही. पांढरी वाळू आणि वाहणारं निळंशार पाणी हे अप्रतिम दृश्य पाहिल्यानंतर तुम्हीही काही काळ मंत्रमुग्ध व्हाल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत किंवा मित्रासोबत बीचवर शांततेत वेळ घालवू शकता. श्रीवर्धन बीचवरून तुम्ही सूर्योदय आणि सूर्यास्ताचे अद्भुत दृश्य देखील पाहू शकता.
पेशवे स्मारक - समुद्रकिना-यावर वसलेले एक प्रेक्षणीय स्थळ
श्रीवर्धनमध्ये पेशव्यांची प्रसिद्ध स्मारकं आहेत. हे स्मारक पहिले पेशवे विश्वनाथ भट्ट यांच्या जन्मस्थानी बांधण्यात आल्याचे सांगितले जाते. हे स्मारक समुद्रकिना-यावर वसलेले असल्याने येथे पर्यटकही मोठ्या संख्येने भेट देण्यासाठी येतात. सकाळ संध्याकाळ पेशवे स्मारकाच्या आजूबाजूचे सुंदर दृश्य पाहण्यात एक वेगळाच आनंद आहे.
लक्ष्मी नारायण मंदिर - प्राचीन आणि धार्मिक स्थळ
जर तुम्ही श्रीवर्धनला जाणार असाल आणि प्रवासादरम्यान कोणत्याही प्राचीन आणि धार्मिक स्थळाला भेट द्यायची असेल तर तुम्ही लक्ष्मी नारायण मंदिरात अवश्य पोहोचावे. लक्ष्मी नारायण मंदिर भगवान विष्णूला समर्पित आहे. हे मंदिर सुमारे 200 वर्षे जुने आहे. मंदिरात असलेली भगवान विष्णूची मूर्ती पर्यटकांना खूप आकर्षित करते. समुद्रकिना-यावर वसलेल्या या मंदिरातून समुद्राच्या निळ्या पाण्याची प्रशंसा करता येते.
वेळास बीच - सूर्योदय आणि सूर्यास्तासाठीही प्रसिद्ध
वेळास बीच हा श्रीवर्धनचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे. समुद्रकिनाऱ्यालगत असलेली पांढरी वाळू, निळे पाणी आणि नारळाची झाडे या बीचच्या सौंदर्यात भर घालतात. वेळास बीच सूर्योदय आणि सूर्यास्तासाठीही प्रसिद्ध आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, प्रत्येक वीकेंडला अनेक कुटुंबे येथे पिकनिकसाठी येतात. येथे तुम्ही निवांत क्षण घालवू शकता.
श्रीवर्धन मध्ये भेट देण्यासाठी इतर ठिकाणे
श्रीवर्धनच्या आसपास इतरही अनेक उत्तम ठिकाणे आहेत जिथे तुम्ही कुटुंब, मित्र आणि जोडीदारासोबत भेट देऊ शकता. श्रीवर्धनपासून थोड्या अंतरावर असलेल्या दिवेगर बीच आणि हरिेश्वर सारखी अद्भुत ठिकाणे तुम्ही पाहू शकता. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, श्रीवर्धनमध्ये सुपारीची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. येथे तुम्ही सुपारीच्या शेतातही फिरू शकता.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
हेही वाचा>>>
Hidden Gem Travel : कोकण किनारपट्टीतील एक लपलेलं रत्न! 'कर्दे' - एक प्राचीन, शांत समुद्रकिनारा; सर्व काही जाणून घ्या..