Travel : 15 ऑगस्टचं निमित्त...अन् भारतीय रेल्वेतर्फे कमी बजेटमध्ये फिरण्याची संधी! स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाचा इतिहास, संस्कृती जाणून घ्या
Travel : कुटुंबासोबत अमूल्य वेळ घालवण्यासाठी तसेच दैनंदिन जीवनातून विश्रांती घेण्यासाठी 15 ऑगस्टचा वीकेंड एक उत्तम वेळ आहे. या निमित्त भारतीय रेल्वेचे खास टूर पॅकेज एकदा पाहाच...
Travel : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात रोजचा कामाचा ताण, धावपळीचा प्रवास, इतर जबाबदाऱ्या यासारख्या गोष्टींमुळे माणूस आजकाल स्वत:साठी जगायला विसरत चालला आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे व्यक्तीला स्वत:च्या कुटुंबालाही वेळ देता येत नाही. पण चिंता करू नका, यंदाचा ऑगस्ट तुमच्यासाठी ही खास संधी घेऊन येत आहे, जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबाला आणि स्वत:ला वेळ देऊ शकाल. कारण 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनापासून ते 19 ऑगस्ट रक्षाबंधनपर्यंत लॉंग वीकेंडचा सुवर्णकाळ तुमच्याकडे आहे, याचंच निमित्त साधून भारतीय रेल्वे तुमच्यासाठी अगदी कमी बजेटमध्ये काही खास टूर पॅकेजेस घेऊन आली आहे. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर..
कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी उत्तम काळ
15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो, असं म्हणतात या दिवशी कुटुंबासाह प्रवास केल्याने देशभक्तीची भावना वाढीस लागते. स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित ऐतिहासिक स्थळं किंवा ठिकाणांना भेट देऊन भारताचा इतिहास आणि संस्कृती अधिक खोलवर समजून घेता येतो. 15 ऑगस्ट हा कुटुंबासोबत अमूल्य वेळ घालवण्यासाठी तसेच दैनंदिन जीवनातून विश्रांती घेण्यासाठी उत्तम वेळ आहे. ऑगस्ट महिना हा पावसाळ्याचा काळ असतो, त्यामुळे ठिकाठिकाणी नैसर्गिक सौंदर्य आणि हिरवळ भरभरून असते. म्हणूनच या खास प्रसंगी लोक काही चांगल्या ठिकाणी भेट देण्याचा विचार करत असाल, तर 15 ऑगस्टच्या निमित्ताने अनेक टूर ऑपरेटर विविध प्रकारची टूर पॅकेज घेऊन येतात. पण लोकांना या टूर पॅकेजवर विश्वास ठेवणे कठीण जाते. अशा लोकांसाठी भारतीय रेल्वेकडून काही खास योजना आखल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला IRCTC भारतीय रेल्वेच्या काही स्वस्त टूर पॅकेजेसबद्दल तपशीलवार माहिती देत आहोत. जाणून घ्या..
उटी टूर पॅकेज
तुम्ही भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरून तिकीट बुक करू शकता.
हे पॅकेज 15 ऑगस्टपासून सुरू होत आहे.
या पॅकेजमध्ये तुम्हाला चेन्नई, इरोड आणि काटपाडी येथे जाण्याची संधी मिळेल.
पॅकेज 4 रात्री आणि 5 दिवसांसाठी आहे.
पॅकेजमध्ये तुम्ही ट्रेन आणि बसने प्रवास करू शकाल.
पॅकेज फी - दोन लोकांसोबत प्रवास करत असल्यास प्रति व्यक्ती पॅकेज फी 11,350 रुपये आहे.
तीन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 8700 रुपये आहे.
दक्षिण भारत दौरा
हे पॅकेज 15 ऑगस्टपासून सुरू होत आहे.
या पॅकेजमध्ये तुम्हाला चेन्नई, इरोड आणि काटपाडी येथे जाण्याची संधी मिळेल.
हे पॅकेज 11 रात्री आणि 12 दिवसांसाठी आहे.
पॅकेजमध्ये तुम्हाला तिरुपती, रामेश्वरम, मदुराई, कन्याकुमारी आणि मल्लिकार्जुनला भेट देण्याची संधी मिळेल.
पॅकेजमध्ये तुम्ही ट्रेन आणि बसने प्रवास करू शकाल.
पॅकेज फी - दोन लोकांसोबत प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज फी 32,565 रुपये आहे.
मुलांसाठी पॅकेज फी 29,305 रुपये आहे.
हे पॅकेज फी तुम्हाला जास्त वाटू शकते, परंतु तुम्ही पाहू शकता की, यामध्ये तुम्हाला जास्त दिवस प्रवास करण्याची संधी मिळत आहे.
जम्मू टूर पॅकेज
हे पॅकेजही 15 ऑगस्टपासून सुरू होत आहे.
या पॅकेजमध्ये तुम्हाला चेन्नई, इरोड आणि काटपाडी येथे जाण्याची संधी मिळेल.
पॅकेज 4 रात्री आणि 5 दिवसांसाठी आहे.
पॅकेजमध्ये तुम्हाला तिरुपती, रामेश्वरम, मदुराई, कन्याकुमारी आणि मल्लिकार्जुनला भेट देण्याची संधी मिळेल.
पॅकेजमध्ये तुम्ही ट्रेन आणि बसने प्रवास करू शकाल.
पॅकेज फी - दोन लोकांसोबत प्रवास करत असल्यास प्रति व्यक्ती पॅकेज फी 9810 रुपये आहे.
तीन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 8650 रुपये आहे.
मुलांसाठी पॅकेज फी 7650 रुपये आहे.
अधिक माहितीसाठी तुम्ही भारतीय रेल्वेच्या https://www.irctctourism.com/ वेबसाईटवरून माहिती घेऊ शकता.
हेही वाचा>>>
Travel : ट्रॅव्हल प्रेमींसाठी खुशखबर! मुंबई-गुजरातहून भारतीय रेल्वेचे स्वस्त टूर पॅकेज सुरू होतायत, आता कुटुंबासह बिनधास्त फिरा, जाणून घ्या..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )