Health Tips : सकाळी उठून भरपूर पाणी पिताय? याचा पोटावर काय परिणाम होतो..आयुर्वेदानुसार जाणून घ्या खरं कारण
Health Tips : सकाळी रिकाम्या पोटी जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी नुकसानकारक आहे.

Health Tips : अनेकदा आपण आरोग्य तज्ज्ञांकडून तसेच ज्येष्ठ व्यक्तींकडून सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याचा सल्ला देताना ऐकलं आहे. कारण ते आपल्या आरोग्यासाठी (Health) चांगलं असतं. यामुळे आपले चयापचय चांगले राहते. तसेच, पचनशक्तीही मजबूत होते. त्यानुसार अनेकजण सकाळी रिकाम्या पोटी पाणी पितात. यामध्ये काही जण 2 ग्लास कोमट पाणी पितात तर काही जण सकाळी 1 लीटर पाणी पितात. मात्र, सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिणे पोटासाठी खरोखर फायदेशीर आहे का? आयुर्वेदानुसार सकाळ्या वेळेस एकाच वेळी भरपूर पाणी पिणे योग्य नाही. आयुर्वेदानुसार असे करणे मानवी पोटासाठी योग्य नाही.
रिकाम्या पोटी पिणे चांगले की वाईट?
आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे जेव्हा तुम्ही सकाळी उठून भरपूर पाणी पिता तेव्हा त्याचा तुमच्या पचनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. सकाळी आपली पचन प्रक्रिया मंद असते आणि जेव्हा तुम्ही पाणी पिता तेव्हा ती अधिक मंद होते. हे एक प्रकारचे अग्निशामक म्हणून काम करते. त्यामुळे सकाळी जास्त प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीराला फायद्याऐवजी नुकसान होते.
साधे पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायक का आहे?
सकाळी उठून पाणी पिणे म्हणजे पाण्याने पोटाची आग विझवण्यासारखे आहे. जेव्हा तुम्ही कोमट पाणी पिता तेव्हा ते तुमच्या चयापचय आणि पचनासाठी खूप चांगले असते. पण जेव्हा तुम्ही थंड किंवा साधं पाणी भरपूर पिता ते चयापचयासाठी हानिकारक असते. हे तुमच्या पचनासाठी चांगले नसते. तसेच, ते यकृत, मूत्रपिंड आणि मेंदूच्या ऊतींवर दबाव आणते आणि त्यांचे नुकसान करते.
आयुर्वेदात काय म्हटलंय?
आयुर्वेदानुसार, एकाच वेळी भरपूर पाणी पिण्याऐवजी, एका ग्लासमधून कोमट पाणी प्या. आयुर्वेदानुसार सकाळी फक्त एक ग्लास कोमट पाणी प्यावे. सकाळी उठून रिकाम्या पोटी एक लिटर पाणी प्यायल्याने शरीराला नुकसान होते. त्यामुळे जर तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक असाल जे सकाळी लवकर उठून भरपूर पाणी पिता तर या सवयींवर वेळीच नियंत्रण ठेवा. नेहमी एक किंवा दोन ग्लास कोमट पाणी प्या.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Health Tips : बदलत्या ऋतूत बॅक्टेरिया किडनीला नुकसान पोहोचवू शकतात; टाळायचे असल्यास 'हे' उपाय करा























