Health Tips : उन्हाळ्यात अंगाला घामाचा वास येतोय? फॉलो करा या घरगुती टिप्स
तुमच्या अंगाला देखील घामाच्या वासाची समस्या जाणवत असेल तर तुम्ही या टिप्स फॉलो करू शकता.
Health Tips : उन्हाळ्यामध्ये घाम खूप येतो. अनेकांना अंडर आर्ममध्ये किंवा मानेच्या खालच्या बाजूला घाम येतो. घामाचाअंगाला वास येतो. जर तुमच्या अंगाला देखील घामाच्या वासाची समस्या जाणवत असेल तर तुम्ही या टिप्स फॉलो करू शकता.
या कारणामुळे येतो घामाचा वास
शरीरामध्ये पाण्यापेक्षा जास्त कॅफीनच्या इंटेकचे प्रमाण वाढते आणि जेव्हा तुम्ही आंघेळ करत नाही तेव्हा शरीराला घामाचा वास येतो. जेव्हा स्ट्रेस किंवा उन्हामुळे घाम शरीराच्या बाहेर पडतो तेव्हा तो स्किनवर असणाऱ्या बॅक्टेरियामध्ये मिक्स होतो. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये दररोज अंघोळ करणे आवश्यक आहे.
टिप्स-
गुलाब पाणी-
जर तुम्हाला अंडर आर्ममध्ये घाम येत असेल तर तुम्ही त्या भागात गुलाब पाण्याचा स्प्रे मारू शकता. तसेच ज्या पाण्याचा तुम्ही आंघोळीसाठी वापर करता त्या पाण्यामध्ये देखील तुम्ही गुलाब पाणी मिक्स करू शकता.
लिंबू-
शरीराच्या ज्या भागाला जास्त घाम येतो अशा भागावर लिंबूची फोड चिरून फिरवा. दहा मिनीट लिंबूची फोटो फिरवल्यानं घामाचा वास येणार नाही.
कोरफड जेल
रात्री झोपण्याआधी अंडर आर्मला किंवा मानेच्या खालच्या बाजुला कोरफड जेल लावा. त्यानंतर सकाळी थंड पाण्यानं थुवा.
तुरटी
तुरटीमध्ये अँटिसेप्टिक गुण असतात. आंघोळ झाल्यानंतर तीन किंवा चार मिनीटांनी शरीराच्या ज्या भागात घाम येतो अशा भागात तुरटी फिरवा. त्यामुळे शरीरावरील बॅक्टेरिया नष्ट होतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
- Health Tips : टरबूजाच्या बियांमध्ये आहेत अनेक गुणधर्म, जाणून घ्या याचे फायदे
- Health Care: प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी 'व्हिटॅमिन सी' आहे आवश्यक, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे
- Health Tips : चुकूनही केळी आणि पपई एकत्र खाऊ नका, तब्येतीवर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha