एक्स्प्लोर

Summer : आला उन्हाळा, प्रकृती सांभाळा! उन्हाळ्यात स्वत:ला एनर्जेटिक ठेवा; आपल्या शरीराची अशी घ्या काळजी!

Summer Health Care Tips  : उन्हाच्या प्रचंड तडाख्यानं लोकांचे हाल होत आहेत. उन्हाळ्यामध्ये प्रकृतीकडे लक्ष देणं विशेष गरजेचं असतं.  

Summer Health Care Tips  : देशभरात उन्हाचे चटके बसू लागले आहेत. राज्यात देखील काही ठिकाणी विक्रमी तापमानाच्या नोंदी होत आहेत. उन्हाच्या प्रचंड तडाख्यानं लोकांचे हाल होत आहेत. उन्हाळ्यामध्ये प्रकृतीकडे लक्ष देणं विशेष गरजेचं असतं.  उन्हाळा येताच ऊन आणि उष्णतेपासून बचाव करण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. कोणी आपल्या आरोग्यावर लक्षं देतं, तर कोणी आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक उपाय करतं. कारण वाढत्या उष्णतेमुळे त्वचेपासून ते शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. 

आज आम्ही तुम्हाला उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काही घरगुती उपाय सागंणार आहोत.

उन्हाळ्यात आरोग्य राखण्यासाठी घरगुती उपाय :

जास्त प्रमाणात पाणी प्या

उन्हाळ्यात शरीराला जास्त पाणी पिण्याची गरज असते. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त पाणी पिण्याची सवय लावली पाहिजे. त्वचा तजेलदार राहण्यासोबतच आरोग्य राखण्यासही मदत होते. उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. त्यामुळे उन्हाळ्यात अशक्तपणा जाणवत नाही.

लिंबू सरबत ठरतं फायदेशीर

उन्हाळ्यात लोक लिंबू सरबताचं सेवन करणं पसंत करतात. ज्यामुळे शरीराला थंडावा मिळण्यासोबतच आरोग्यही उत्तम राखण्यास मदत होते. यामुळे शरीरातील पाण्याची कमतरताही पूर्ण होते. तसेच शरीराला उर्जा देण्यासही मदत करते.

कैरीचं पन्हं

फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंब्याचं आगमन उन्हाळ्यात होतं. अशातच उन्हाळ्यात कैरीचं पन्हं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. कैरी, काळं मीठ आणि मिरची यांच्या मदतीने तयार केलं जाणारं कैरीचं पन्हं अनेकजणांना आवडतं. शरीराला उर्जा मिळवण्यासाठी कैरीचं पन्हं अत्यंत फायदेशीर ठरतं.

सुती कपडे परिधान करा

उन्हाळ्यात सुती कपडे परिधान करणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. त्वचेसाठी सुती कपडे उत्तम ठरतात. उन्हाळ्यात सतत येणारा घाम सुती कपड्यांमुळे लवकर सुकण्यास मदत होते.

त्वचेला उष्णतेपासून बचाव करण्यासाठी उपाय :

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं. अनेकदा उन्हाळ्या त्वचेचा रंगं काळवंडणे किंवा अॅलर्जी यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. चेहऱ्याच्या त्वचेला थंडावा देण्यासाठी काकडीचा रसं अत्यंत फायदेशीर ठरतो. तसेच काळवंडलेल्या त्वचेचा रंग उजळवण्यासाठीही काकडीचा रंस अत्यंत फायदेशीर ठरतो.

उन्हातून आल्यानंतर काही तासांनी चेहऱ्यावर मुलतानी माती आणि चंदनाची पावडर लावा. त्यामुळे त्वचेला थंडावा मिळतो. याचसोबत चंदन, तुळस आणि गुलाब यांसारख्या नैसर्गिक गोष्टीही चेहऱ्यासाठी फायदेशीर ठरतात.

गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात भिजवून त्या पाण्याने चेहरा धुतल्याने उन्हाळ्यात त्वचा मुलायम होण्यास मदत होते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
त्वचादानासाठी संपूर्ण देशात व्यापक यंत्रणा उभारा: खासदार विनोद तावडे यांची राज्यसभेत मागणी
त्वचादानासाठी संपूर्ण देशात व्यापक यंत्रणा उभारा: खासदार विनोद तावडे यांची राज्यसभेत मागणी
World Breastfeeding Week: महिलांनो.. सिझेरियननंतरही यशस्वी स्तनपान शक्य! नवमातांच्या प्रश्नांचं उत्तर, 'ही' 7 लक्षणं, तज्ज्ञांनी सांगितले महत्त्व
महिलांनो.. सिझेरियननंतरही यशस्वी स्तनपान शक्य! नवमातांच्या प्रश्नांचं उत्तर, 'ही' 7 लक्षणं, तज्ज्ञांनी सांगितले महत्त्व
Breastfeeding Awareness week: स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?
स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget