एक्स्प्लोर

Diabetes Diet Tips : डायबिटीजमध्ये लोणचे, पापड अन् चटणी खाणे योग्य की अयोग्य? रक्तातील साखरेवर काय परिणाम? 

Diabetes Care & Diet : भात, पोळी आणि गोड पदार्थांसोबतच ताटात असणाऱ्या लोणचे, पापड अन् चटणीचा रक्तातील साखरेवर (Blood Sugar) काय परिणाम होतो? वाचा सविस्तर माहिती.

नवी दिल्ली : मधुमेहाचा (Diabetes) विषय निघाल्याबरोबर बहुतेक सर्व जण भात, पोळी, ब्रेड आणि गोड पदार्थांवर लक्ष केंद्रित करतात. परंतु, दररोजच्या जेवणाच्या ताटात तोंडी लावण्यासाठी असणाऱ्या लोणचे, पापड आणि चटणीकडे सहसा कोणाचे लक्ष जात नाही. हे पदार्थ जेवणाची चव तर नक्कीच वाढवतात, पण त्यांचा रक्तातील साखरेवर (Blood Sugar) थेट काय परिणाम होतो?

आहारतज्ज्ञ आणि मधुमेह तज्ज्ञांच्या (Dietitian & Diabetes Expert) मते, या तिन्ही गोष्टी थेट चांगल्या किंवा वाईट ठरवता येत नाहीत. त्यांचा आरोग्यावर होणारा परिणाम ते कशापासून बनवले आहेत, बनवण्याची पद्धत कोणती आहे आणि ते किती प्रमाणात खाल्ले जातात यावर अवलंबून असतो.

Pickles Papads Impact On Blood Sugar : लोणचे, पापड आणि चटणीचा रक्तातील साखरेवर काय परिणाम?

लोणचे (Pickle) : मोहरीचे तेल किंवा व्हिनेगरमध्ये (Vinegar) पारंपरिक पद्धतीने बनवलेले लिंबू अथवा आंब्याचे लोणचे जेवणानंतर रक्तातील साखर वेगाने वाढण्याऐवजी हळूहळू नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकते. मात्र, बाजारात मिळणाऱ्या पॅकबंद लोणच्यामध्ये अतिप्रमाणात मीठ आणि प्रिझर्व्हेटिव्ह्ज असतात, जे हानिकारक ठरू शकतात.

चटणी (Chutney) : दह्यासोबत बनवलेली कोथिंबीर किंवा पुदिन्याची चटणी, खोबरे, तीळ आणि हिरव्या भाज्यांची ताजी चटणी यामध्ये कार्बोहायड्रेट्स अत्यंत कमी असतात. यात फायबर आणि प्रोटीन असल्याने ते रक्तातील साखरेचे शोषण मंद करतात. परंतु, साखरेचा अतिवापर करून बनवलेली टोमॅटोची चटणी किंवा सॉस रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढवू शकतात.

पापड (Papad) : उडीद किंवा मुगाच्या डाळीपासून बनवलेला पापड तळून (Fried) खाल्ल्यास त्यातील तेलाचे प्रमाण वाढते, ज्यामुळे रक्तातील साखर वेगाने वाढू शकते. त्याऐवजी भाजलेला पापड (Roasted Papad) खाणे अधिक सुरक्षित ठरते.

Diabetes Key Scientific Reasons : रक्तातील साखरेवर होणाऱ्या परिणामाची प्रमुख कारणे

1. पचनक्रिया मंदावणे : व्हिनेगर आणि आंबवलेले (Fermented) पदार्थ अन्न पचण्याची गती मंदावतात, ज्यामुळे रक्तातील साखर एकदम न वाढता हळूहळू वाढते.
2. मसाल्यांचे फायदे : लोणचे आणि चटणीमध्ये वापरले जाणारे मोहरी, मेथी आणि ओवा हे मसाले शरीरात इन्सुलिनची (Insulin) कार्यक्षमता सुधारण्यास मदत करतात.
3. दही अन् फायबर : चटणीत वापरले जाणारे दही, फायबर आणि निरोगी फॅट्स कार्बोहायड्रेट्सचे शोषण धीमे करतात.

Dos & Don'ts for Diabetics : मधुमेहींनी कोणती काळजी घ्यावी?

प्रमाण मर्यादित ठेवा : लोणचे, पापड आणि चटणी मुख्य अन्नाप्रमाणे न खाता ताटात केवळ तोंडी लावण्यापुरतीच अत्यंत कमी प्रमाणात घ्या.

ताजी चटणी वापरा : बाजारातील पॅकबंद चटण्यांऐवजी घरात बनवलेली ताजी कोथिंबीर-पुदिना चटणी वापरा.

भाजलेला पापड निवडा : तळलेल्या पापडाऐवजी नेहमी भाजलेला पापड खावा.

मीठ आणि साखरेवर नियंत्रण : बाजारातील पॅकबंद उत्पादनांमध्ये लपलेली साखर (Hidden Sugar) आणि जास्त मीठ असल्याने ती टाळलेलीच बरी.

(टीप : सदर माहिती सामान्य वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित आहे. आपल्या आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Neck Cancer News : मानेच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील सुजलेल्या लिम्फ नोड्स म्हणजे काय?
मानेच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील सुजलेल्या लिम्फ नोड्स म्हणजे काय?
Mumbai News: बर्किट्स लिम्फोमाशी झुंज यशस्वी; इरिट्रियातील 14 वर्षीय मुलाचा मुंबईतील डॉक्टरांनी वाचवला जीव
बर्किट्स लिम्फोमाशी झुंज यशस्वी; इरिट्रियातील 14 वर्षीय मुलाचा मुंबईतील डॉक्टरांनी वाचवला जीव
20 ते 30 वयातही कर्करोगाचा धोका! 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या
20 ते 30 वयातही कर्करोगाचा धोका! 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या
Back Itching Remedies : पाठीवरील खाजेने त्रासले आहात? न खाजवता त्वरित आराम मिळवण्यासाठी वापरा 'या' सोप्या ट्रिक्स
पाठीवरील खाजेने त्रासले आहात? न खाजवता त्वरित आराम मिळवण्यासाठी वापरा 'या' सोप्या ट्रिक्स
Advertisement

व्हिडीओ

Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha
Jarange Chalo Mumbai : जरांगे मुंबई गाठणार की तोडगा निघणार? Special Report
Uniform Civil Code 2029 : 2029 आधी यूसीसी लागू करण्याचा प्रयत्न | Special Report ABP Majha
Disha Salian FIR : सतीश सालियन यांच्या जबाबानंतर जोरदार राजकारण Special Report
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Lodhi : आंधळा असल्याने गावकऱ्यांनी 'पनवती' मानलं, बहिष्कृत केलं, पण पठ्ठ्याने नाव गाजवलं; 'हनुमान अंश' फेम गायक सुनील लोधीची संघर्षकथा
आंधळा असल्याने गावकऱ्यांनी 'पनवती' मानलं, बहिष्कृत केलं, पण पठ्ठ्याने नाव गाजवलं; 'हनुमान अंश' फेम गायक सुनील लोधीची संघर्षकथा
Manoj Jarange : जरांगेंची भाषा अयोग्यच; कॅबिनेट बैठकीत सर्वच मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांसमोर नाराजीचा सूर, सूत्रांची माहिती
जरांगेंची भाषा अयोग्यच; कॅबिनेट बैठकीत सर्वच मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांसमोर नाराजीचा सूर, सूत्रांची माहिती
मनोज जरांगे पाटलांसोबत मोठा ताफा; पाडळशिंगी टोल नाक्यावर गाड्याच गाड्या, मराठा बांधवांकडून घोषणाबाजी
मनोज जरांगे पाटलांसोबत मोठा ताफा; पाडळशिंगी टोल नाक्यावर गाड्याच गाड्या, मराठा बांधवांकडून घोषणाबाजी
ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना एकनाथ शिंदे; राज ठाकरेंच्या घरी बाप्पांच्या दर्शनाला जाणे टाळले, राजकीय वर्तुळात चर्चा
ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना एकनाथ शिंदे; राज ठाकरेंच्या घरी बाप्पांच्या दर्शनाला जाणे टाळले, राजकीय वर्तुळात चर्चा
Lalbaugcha Raja: सोनं,चांदी, डॉलर... लालबागचा राजा चरणी, पहिल्याच दिवशी भरभरुन दान; स्टेज पेटीमध्ये 27 लाख 50 हजार
सोनं,चांदी,डॉलर... लालबागचा राजा चरणी, पहिल्याच दिवशी भरभरुन दान; स्टेज पेटीमध्ये 27 लाख 50 हजार
पुढच्या वर्षी लवकर या... कोकणात दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप, वाजत गाजत मिरवणूक, चिमुकल्यांसह भक्तगण भावुक
पुढच्या वर्षी लवकर या... कोकणात दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप, वाजत गाजत मिरवणूक, चिमुकल्यांसह भक्तगण भावुक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 सप्टेंबर 2026 | मंगळवार
Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या मागण्या नेमकं काय? मुंबईकडे निघालेल्या पाटलांचे आत्तापर्यंतचे 11 वे उपोषण, नेमकं कुठ अडलय?
मनोज जरांगेंच्या मागण्या नेमकं काय? मुंबईकडे निघालेल्या पाटलांचे आत्तापर्यंतचे 11 वे उपोषण, नेमकं कुठ अडलय?
Embed widget