Vitamin C Food : उन्हाळ्यात 'ही' फळे खा; व्हिटॅमिन सी ची कमतरता भासणार नाही
Vitamin C Food : संत्र्यांव्यतिरिक्त आंबा, किवी, स्ट्रॉबेरी या फळांमध्येही व्हिटॅमिन सी आढळते. या फळांपासून शरीराला फायबर आणि भरपूर अँटीऑक्सिडंट्स मिळतात.
Healthy Fruits Diet : उन्हाळ्यात स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी अधिकाधिक फळांचे सेवन करणे गरजेचे आहे. फळं खाल्ल्याने शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण होते. फळांपासून शरीराला भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात. फळे खाल्ल्याने शरीराला फायबर आणि भरपूर अँटीऑक्सिडंट्स मिळतात. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. उन्हाळ्यात अशी फळे खावीत ज्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. जाणून घ्या व्हिटॅमिन सीची कमतरता भरून काढण्यासाठी कोणती फळे खावीत.
1. आंबा : आंब्याला फक्त फळांचा राजा म्हटले जात नाही तर चविष्ट आंबा तुमची रोगप्रतिकारशक्तीदेखील वाढविण्यास मदत करतो. आंब्यामध्ये जवळपास 122 मिलीग्राम व्हिटॅमिन सी असते. याशिवाय आंब्यामध्ये ‘अ’ जीवनसत्त्वही आढळते. जे डोळ्यांसाठी चांगले असते.
2. स्ट्रॉबेरी : स्ट्रॉबेरी देखील व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे. स्ट्रॉबेरीमध्ये भरपूर अँटिऑक्सिडंट्स आढळतात. याशिवाय स्ट्रॉबेरी हे व्हिटॅमिन सी आणि इतर अनेक पोषक तत्वांनी युक्त फळ आहे. हंगामी फळ असल्यामुळे ते कमी प्रमाणात उपलब्ध असले तरी, जर तुम्ही एक कप स्ट्रॉबेरी खाल्ले तर ते तुम्हाला 100 मिलीग्राम व्हिटॅमिन सी मिळते.
3. किवी : किवीमध्येसुद्धा व्हिटॅमिन सी समृद्ध अनेक घटक असतात. किवी हे खूप महाग फळ असले तरी एक किवी तुम्हाला 85 मिलीग्राम व्हिटॅमिन सी देते. याशिवाय व्हिटॅमिन के आणि ई देखील किवीमध्ये मुबलक प्रमाणात आढळते. किवीमध्ये इतरही अनेक पोषक घटक असतात जे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.
4. पपई : पपई हे सर्व ऋतूंमध्ये उपलब्ध फळ आहे. पपई पचनासाठी उत्तम मानली जाते. तसेच पपईमुळे वजनही कमी होते. पपईमध्ये व्हिटॅमिन सी देखील मुबलक प्रमाणात आढळते. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते. एक कप पपई खाल्ल्याने तुम्हाला 88 मिलीग्रॅम पोषक तत्त्वे मिळतात.
5. संत्री आणि लिंबू : उन्हाळ्यात तुम्ही संत्री आणि लिंबाचे सेवन अवश्य करा. हे लिंबूवर्गीय फळांमध्ये येतात आणि त्यात सर्वाधिक व्हिटॅमिन सी, फायबर असते. उन्हाळ्यात लिंबूपाणी आणि संत्र्याचा रस भरपूर प्यावा. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :