Homemade Tea : ही मसाला चहा तुमचा तणाव दूर करेल
Masala Tea : तुमचं मन शांत करण्यासाठी तुम्ही घरी मसाला चहा बनवून शकता. तणाव कमी करण्यासाठी हा चहा कसा बनवायचा जाणून घ्या.
Stress Free Tea : आजकालच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना तणावाला सामोरं जावं लागतं. सध्याचं जीवन हे अतिशय व्यस्त बवलं आहे. यामुळे बहुतेक लोकांना विविध समस्यांना सामोरं जावं लागतं. यामध्ये अनेक लोक तणावाला बळी पडतात. तसेच अनेकांना झोपे संदर्भातही समस्या उद्भवतात. या सर्वांपासून सुटका मिळण्यासाठी एक रामबाण उपाय आहे. यामुळे तुमचा तणाव दूर होईल आणि मनही शांत होईल. तुमचं मन शांत करण्यासाठी तुम्ही घरी मसाला चहा बनवून शकता. कसा ते जाणून घ्या.
तुळशी, पुदिना चहा
तुळशी आणि पुदिन्यापासून बनवलेला चहा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो. हा चहा अँटिऑक्सिडेंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. या चहामुळे तुमची पचनक्रियाही सुधारते. हा चहा बनवण्यासाठी तुम्ही उकळत्या पाण्यात तुळशीची पानं, पुदिन्याची पानं आणि आलं टाका. नंतर हे 3 ते 4 मिनिटे उकळू द्या. आता हा चहा गाळून एका कपमध्ये घ्या आणि यामध्ये एक चमचा मध मिसळून प्या.
केशर, बडीशेप चहा
शरीर डिटॉक्स करण्यासोबतच हा मसाला चहा पोट आणि मन दोन्ही शांत ठेवतो. चांगल्या झोपेसाठी हा एक चांगला पर्याय आहे. हा चहा रक्तदाब वाढवण्यास आणि चिंता वाढविण्यास मदत करतो. हा चहा बनवण्यासाठी एका भांड्यात एक कप पाणी उकळवा आणि त्यात ऋषीची पानं, केशर, बडीशेप आणि लिंबाचा रस मिसळा. आता हे 5 मिनिटे उकळवा. हा चहा गाळून एक चमचा मध टाकून प्या.
मसाला चहाचे फायदे
मसाला चहामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. यासोबतच तुमचा लठ्ठपणाही कमी होतो. ते बनवण्यासाठी पाणी गरम करून त्यात आलं, लवंगा, वेलची, काळी मिरी आणि मध टाकून उकळा. काही वेळाने गाळून प्या.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Orange Juice : लठ्ठपणा टाळायचा असेल तर संत्र्याचा रस पिणं बंद करा, 'हे' आहे कारण
- Dehydration : पुरेसं पाणी पिऊनही होतं डिहाइड्रेशन, जाणून घ्या लक्षणं
- Green Coffee : 'ब्लॅक कॉफी'नंतर आता 'ग्रीन कॉफी', जाणून घ्या फायदे
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
Calculate The Age Through Age Calculator
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )