(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Strong Bones : मजबूत हाडांसाठी रोजच्या आहारात 'या' तीन पदार्थांचा समावेश करा
Diet For Strong Bones : हाडे मजबूत करण्यासाठी काही पोष्टिक पदार्थ शरीराला मिळणे फार गरजेचे आहे.
Bones Health : वाढत्या वयानुसार हाडांची झीज होते. तसेच हाडांच्या कमकुवतपणामुळे शरीर पोकळ होते आणि हाडे मजबूत होण्यासाठी कॅल्शियमसोबतच इतर अनेक पोषक तत्वांचीही गरज असते. यासाठी योग्य वयात हाडांची काळजी घेणे गरजेचे आहे. या ठिकाणी आम्ही तुम्हाला तीन काही खास पदार्थांबद्दल सांगणार आहोत. जे पूर्णपणे शाकाहारी आहेत. तसेच तुमची हाडे मजबूत करण्यासाठी त्यांचा विशेष वापर केला जाऊ शकतो. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकजण ते आरामात घेऊ शकतात. याबरोबरच नवजात बाळाल ज्म देणाऱ्या महिलांमध्ये सुद्धा कॅल्शिअमची कमतरता जावते. ते देखील या पदार्थांचा वापर करू शकतात.
तीळ खा :
तिळाचा वापर आपल्या घरात खूप केला जातो. तीळ सहसा हिवाळ्यात वापरले जातात. सामान्यतः मिठाई, लाडू इत्यादींमध्ये तीळ खाल्ले जाते. तीळ खूप उष्ण असतात, त्यामुळे हिवाळ्यात ते जास्त खाल्ले जातात, परंतु, उन्हाळ्यात हाडे मजबूत करण्यासाठी आणि गरज पडल्यास मर्यादित प्रमाणात खाऊ शकता. जेव्हा तुम्ही तिळाचे सेवन करता तेव्हा रोजच्या आहारात दुधाचा अवश्य समावेश करा. तिळात कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतात.
हिरव्या शेंगा खा :
हिरव्या शेंगा, ड्रमस्टिक शेंगा, गवार शेंगा, सुंदरी शेंगा, शेव शेंगा इत्यादी अशा शेंगा आहेत. ज्यामध्ये हाडांना पुरवणारे अनुकूल पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. यामध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळतात. जे हाडांचे पोषण करतात आणि त्यांना आतून मजबूत करतात. दिवसाच्या एका जेवणात तुम्ही दररोज काही शेंगा खाल्ल्या तरी फायदा होईल.
नाचणी खा :
नाचणीच्या दाण्यांमध्ये कॅल्शियम भरपूर असते. ज्या महिला मुलांना दूध पाजत आहेत आणि ज्यांना पाठदुखीची समस्या आहे त्यांनी नाचणीचे सेवन केले पाहिजे. या दाण्यांचे नियमित सेवन केल्याने तुमच्या मुलाचे पोषणही होईल आणि हाडेही मजबूत होतील.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :