Health Tips : थंड पदार्थ खाल्ल्यानंतर गळ्यात खवखव होतेय? ‘या’ घरगुती उपायांनी मिळेल आराम!
Sore throat : उन्हाळ्यात जेव्हा थंड पदार्थ, कोल्ड्रिंक्स, लोणचे इत्यादींचे सेवन केले जाते, तेव्हा अनेकांना घसा दुखण्याची समस्या उद्भवते.

Health Tips : जसजसे हवामान बदलते, तसतसे रुग्णालयात रुग्णांची संख्या देखील वाढते. काही लोकांना घशात जळजळ, वेदना, खाज सुटणे, जडपणा आणि घसा खवखवणे यांसारख्या समस्यांचा अनुभव येतो. घसा खवखवणे, ताप, संसर्ग, व्हायरल किंवा बॅक्टेरियलच्या संसर्गाची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. उन्हाळ्यात जेव्हा थंड पदार्थ, कोल्ड्रिंक्स, लोणचे इत्यादींचे सेवन केले जाते, तेव्हा अनेकांना घसा दुखण्याची समस्या उद्भवते.
घसा खवखवण्याच्या समस्येवर घरी सहजपणे उपचार केले जाऊ शकतात. जर, तुम्हालाही घसा दुखण्याची किंवा जळजळ होण्याची समस्या असेल, तर तुम्ही काही सोप्या घरगुती पद्धतींनी घसा खवखवणे किंवा घशाची जळजळ दूर करू शकता. चला तर, मग घसादुखी किंवा घसा खवखवण्यापासून आराम मिळवण्याचे काही नैसर्गिक उपाय जाणून घेऊया...
मीठ
मीठाचे पाणी घसादुखीच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करू शकते. यासाठी कोमट पाणी घ्या आणि त्यात अर्धा चमचा मीठ घाला. यानंतर 1 घोट पाणी तोंडात घेऊन 10 सेकंद गुळण्या करा. ही प्रक्रिया दिवसातून 3-4 वेळा केल्यास 1-2 दिवसात तुम्हाला खूप आराम मिळेल.
मध
घशाची खवखव दूर करण्यासाठी मध खूप गुणकारी ठरू शकतो. यासाठी सकाळी लवकर उठून 1 चमचा मध खा. जर, तुम्ही थेट मध खाऊ शकत नसाल, तर तुम्ही एक ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा मध मिसळून पिऊ शकता. पण, लक्षात ठेवा की मध नैसर्गिक असावा, त्यात भेसळ नसावी.
आले
आल्याचा प्रभाव खूप गरम असतो, म्हणून त्याचे सेवन काळजीपूर्वक करा. वास्तविक, आल्यामध्ये जिंजरॉल असते, ज्यामध्ये शक्तिशाली औषधी गुणधर्म असतात. प्राचीन काळापासून आयुर्वेदात याचा वापर केला जात आहे. घरगुती उपायांमध्ये याचा खूप उपयोग होतो. घसादुखीपासून सुटका मिळवण्यासाठी आल्याचा तुकडा किसून एक ग्लास पाण्यात टाकून उकळा. साधारण 5 मिनिटे उकळल्यानंतर ते पाणी गाळून घ्या आणि नंतर ते सेवन करा. दिवसातून 2 वेळा याचे सेवन करा. याने घसा दुखी, खवखव यापासून आराम मिळेल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Health Tips : सैंधव मीठ आरोग्यासाठी गुणकारी, 'या' समस्यांपासून होईल सुटका
- Health Tips : सावधान! सकाळी रिकाम्या पोटी 'या' गोष्टी करू नका, शरीरासाठी ठरेल घातक
- Health Tips : रोज ओट्स खाल्ल्याने आरोग्याला मिळतील 'हे' आश्चर्यकारक फायदे, वजनही होईल कमी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )























