Pune traffic Update: थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; महात्मा गांधी, फर्ग्युसन, जंगली महाराज रस्ता बंद, या पर्यायी मार्गांचा करा वापर
Pune traffic Update: न्यु इयर सेलेब्रेशनसाठी पुण्यात लष्कर आणि डेक्कन भागात वाहतुकीत बदल करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. रात्री बारापर्यंत शहरात येणाऱ्या जड वाहनांना शहरात येण्यास मनाई करण्यात आली आहे.

पुणे: नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पुणे शहराच्या (Pune traffic Update) अनेक भागात मोठा जल्लोष साजरा केला जातो. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता, तसेच फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्त्यावर होणारी गर्दी विचारात घेऊन आज (बुधवारी ३१ डिसेंबर) सायंकाळी ५ वाजल्यानंतर लष्कर आणि डेक्कन जिमखाना भागात वाहतूक बदल (Pune traffic Update) करण्यात आले आहेत. मद्यप्राशन करुन वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाईचा इशारा वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिला आहे.(Pune traffic Update)
न्यु इयर सेलेब्रेशनसाठी पुण्यात लष्कर आणि डेक्कन भागात वाहतुकीत बदल करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. रात्री बारापर्यंत शहरात येणाऱ्या जड वाहनांना शहरात येण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवरती देखील कारवाई करण्यात येणार आहे. (Pune traffic Update)
Pune traffic Update: फर्ग्युसन रस्ता आणि जंगली महाराज रस्त्यावरील वाहतूकबदल पुढीलप्रमाणे:
- कोथरूड आणि कर्वे रस्त्याकडून येणारी वाहतूक खंडुजीबाबा चौक येथे थांबविण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक विधी महाविद्यालय रस्ता, प्रभात रस्ता, अलका चित्रपटगृहाकडे वळवण्यात येणार आहे.
- जंगली महाराज रस्त्यावर होणारी गर्दी विचारात घेऊन झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकातून वाहतूक बंद करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक गोखले स्मारक चौक, उपरस्ते, पुणे महापालिका भवन, ओंकारेश्वर मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज रस्तामार्गे वळविण्यात येणार आहे.
- वाय जंक्शनकडून महात्मा गांधी रस्त्याकडे येणारी वाहतूक १५ ऑगस्ट चौक येथे बंद करून ती कुरेशी मशीद आणि सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात येणार आहे. इस्कॉन मंदिराकडून डॉ. लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता परिसरात सायंकाळी पाचनंतर वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
- फर्ग्युसन रस्त्यावरील गोखले स्मारक चौक ते फर्ग्युसन महाविद्यालय प्रवेशद्वारापर्यंत वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. पहाटे पाचपर्यंत वाहनांना बंदी राहणार आहे.
- बाबासाहेब आंबेडकर रस्ता, तसेच अरोरा टॉवर्सकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. व्होल्गा चौकातून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक ईस्टस्ट्रीटवरून इंदिरा गांधी चौकाकडे वळविण्यात येणार आहे.
- इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक लष्कर पोलीस ठाण्याकडे वळविण्यात येणार आहे.सरबतवाला चौकातून महावी चौकाकडे जाणारी वाहतूक करण्यात येणार आहे.
Pune traffic Update: महात्मा गांधी, जंगली महाराज रस्ता राहणार बंद
लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता परिसरात बुधवारी (३१ डिसेंबर) सायंकाळी पाचनंतर वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. महात्मा गांधी रस्त्यावरील १५ ऑगस्ट चौक ते अराेरा टाॅवर्स चौकदरम्यान वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. फर्ग्युसन रस्त्यावरील गोखले स्मारक चौक ते फर्ग्युसन महाविद्यालय प्रवेशद्वारापर्यंत वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. पहाटे पाचपर्यंत वाहनांना बंदी राहणार आहे.























