Malaika Arora Ready For Second Marraige: अरबाजसोबतच्या घटस्फोटानंतर मलायका अरोरा दुसरं लग्न करणार? म्हणाली, 'यासाठी मी पूर्णपणे तयार...'
Malaika Arora Ready For Second Marraige: मलायकासोबतच्या घटस्फोटानंतर अरबाजनं तर दुसरं लग्न केलं. पण, मलायकानं अजूनही लग्न केलेलं नाही. पण, आता मलायकाही दुसरं लग्न करुन आपला नवा संसार थाटणार का? यावर आता खुद्द मलायकानं आपलं मौन सोडलं आहे.

Malaika Arora Ready For Second Marraige: मलायका अरोरा (Malaika Arora) ही बॉलिवूडची (Bollywood Actress) फिटनेस दिवा आहे. वयाच्या 52व्या वर्षीही, खूपच सुंदर दिसते. मलायका जेवढी तिच्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असते, तेवढीच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मलायकानं लग्नावरुन महिलांना, मुलींना एक सल्ला दिला आहे. तरुण वयात अजिबात लग्न करू नका, असं आवाहन मलायकानं मुलींना केलं आहे. दरम्यान, मलायका अरोरानं वयाच्या पंचवीशीत अरबाज खानसोबत लग्न केलेलं. काही वर्षांपूर्वी दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अरबाज खाननं त्याच्यापेक्षा 22 ते 25 वर्षांनी लहान मुलीसोबत लग्नगाठ बांधली. मलायकासोबतच्या घटस्फोटानंतर अरबाजनं तर दुसरं लग्न केलं. पण, मलायकानं अजूनही लग्न केलेलं नाही. पण, आता मलायकाही दुसरं लग्न करुन आपला नवा संसार थाटणार का? यावर आता खुद्द मलायकानं आपलं मौन सोडलं आहे.
कमी वयात लग्न करू नका; मलायकाचा तरुणींना सल्ला
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, मलायका अरोरानं लग्नाबद्दल आपलं मत व्यक्त केलं, ती म्हणाली की, महिलांनी लग्न करण्यापूर्वी "जीवनाचा अनुभव घ्यावा..." तिनं लवकर लग्न करणं ही 'चूक' असल्याचं म्हटलं आणि इतरांनाही तीच चूक टाळण्याचं आवाहन केलं. मलायका म्हणाली की, "प्लीज इतक्या लहान वयात लग्न करण्याची चूक करू नका. हो, वैवाहिक जीवनात अनेक सुंदर क्षण आले आहेत, त्यातील सर्वोत्तम क्षण म्हणजे, लहान वयातच मूल होणं. पण थोडंसं आयुष्य जगा आणि ते अनुभवा... मग लग्नाचा निर्णय घ्या. लग्नापूर्वी आर्थिक आणि भावनिकदृष्ट्या स्वतंत्र व्हा..."
View this post on Instagram
आता मलायका दुसरं लग्न करणार?
मलायकानं अरबाज खानसोबतच्या घटस्फोटाबाबत मनमोकळेपणानं सांगितलं. तसेच, तिनं अनेक गोष्टींचा खुलासाही केलाय. मलायका म्हणाली की, "मी लग्नावर विश्वास ठेवते, पण याचा अर्थ असा नाही की, ते माझ्यासाठीच आहे. जर ते घडलं तर ते खूप छान आहे. पण मी ते शोधत नाहीये. मी खूप समाधानी आहे. मी लग्न केलं होतं, नंतर मी त्यातून पुढे गेले. मी अनेक नात्यांमध्ये आहे. पण मला त्याचा कंटाळा आलेला नाही. मला अजूनही माझं आयुष्य आवडतं. मला प्रेमाची कल्पना आवडते. मला प्रेम मिळवणं आणि प्रेम वाटायला आवडतं. मला अशा स्थितीत असणं आवडतं, जिथे मी एक सुंदर नातं जोपासू शकते. म्हणून, मी त्यासाठी पूर्णपणे मोकळी आहे. पण त्याच वेळी, मी ते शोधत नाहीये. जर ते घडलं, जर ते माझ्या दारावर ठोठावलं तर मी ते नक्की स्वीकारेन."
मलायका अरोरा, अरबाज खानचा घटस्फोट
मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी 1998 मध्ये लग्न केलं. त्यांना अरहान खान नावाचा मुलगा आहे. पण कालांतरानं दोघांत मतभेद वाढले आणि 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. दरम्यान, दोघेही त्यांचा मुलगा अरहानचं एकत्र संगोपन करत आहेत. मलायका सध्या हर्ष मेहताला डेट करत असल्याची चर्चा आहे, तर अरबाज खान आता शूरा खानशी विवाहबद्ध झाला आहे. अरबाज आणि शूरानं अलिकडेच एका गोंडस मुलीला जन्म दिलाय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
पुरुष करतो ते चालतं..अरबाज खानसोबत घेतलेल्या घटस्फोटावर मलायका स्पष्टच म्हणाली, 'माझ्या आनंदासाठी..'























