(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Skin Care Tips : त्वचेच्या काळजीशी संबंधित 'हे' गैरसमज तुम्हालाही आहेत का? वेळीच लक्ष द्या, अन्यथा...
Skin Care Tips : सौंदर्य उत्पादने खरेदी करण्यापासून ते वापरण्यापर्यंत काही गैरसमज आहेत ज्यावर प्रत्येक मुली सहज विश्वास ठेवतात.
Skin Care Tips : मुली असो किंवा मुले, प्रत्येकालाच आपला चेहरा (Skin Care Tips) निरोगी आणि सुंदर दिसावा असे वाटते. पण, मुलांच्या तुलनेत मुलींना त्यांच्या त्वचेची आणि दिसण्याबद्दल जास्त काळजी असते. सुंदर राहण्यासाठी अनेक जण महागडी सौंदर्यप्रसाधने आणि कॉस्मेटिक उपचारांवर हजारो रुपये खर्च करतात. याशिवाय, लोक अनेकदा घरगुती उपायांचा देखील वापर करतात. मात्र, काही वेळा चेहऱ्यावर दुष्परिणामही होतात.
सौंदर्य उत्पादने खरेदी करण्यापासून ते वापरण्यापर्यंत काही गैरसमज आहेत ज्यावर प्रत्येक मुली सहज विश्वास ठेवतात. या कारणास्तव, आपल्याकडे माहिती नसल्यास, कधीकधी आपल्या त्वचेला इजा होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊयात त्वचेशी संबंधित असे कोणते गैरसमज आहेत, ज्यावर प्रत्येक मुलगी सहज विश्वास ठेवते.
तेलकट त्वचेसाठी मॉइश्चरायझर आवश्यक नाही
तेलकट त्वचा अनेकदा नैसर्गिक तेल तयार करते आणि म्हणूनच अनेकदा लोकांना वाटते की, तेलकट त्वचेला मॉइश्चरायझ करण्याची गरज नाही. जर तुम्ही तुमच्या त्वचेला मॉइश्चराइज केले नाही तर चेहऱ्यावर सुरकुत्या पडण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य मॉइश्चराइजर लावा.
थंडीत सनस्क्रीन लावण्याची गरज नाही
सनस्क्रीन लोशन किंवा क्रीम आपल्या त्वचेचे सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण करते. बर्याच वेळा लोकांचा असा विश्वास आहे की, ढगाळ वातावरणात सनस्क्रीन लावण्याची गरज नाही. मात्र, असे केल्याने तुमच्या त्वचेला नुकसान पोहोचू शकते. त्यामुळे सनस्किन लोशनचा तुमच्या दैनंदिन दिनचर्येत समावेश करणे आवश्यक आहे.
नैसर्गिक प्रोडक्ट्सने नुकसान होणार नाही
बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की, नैसर्गिक सेंद्रिय उत्पादनांमुळे कोणतेही नुकसान होत नाही आणि ते कोणत्याही जोखमीशिवाय त्वचेवर लावले जाऊ शकते. मात्र, नैसर्गिक घटकांपासून बनवलेले प्रोडक्ट्स आपल्यासाठी योग्य असेलच असे नाही. कोणतेही प्रोडक्ट खरेदी करताना, त्यावर दिलेले घटक नक्कीच वाचा. की सर्वकाही तुमच्या त्वचेच्या प्रकारासाठी योग्य आहे की नाही.
महाग प्रोडक्ट्स चांगले असतात
सामान्यतः प्रत्येकाचा असा विश्वास आहे की, स्वस्त ब्युटी प्रोडक्ट्सपेक्षा महागडे प्रोडक्ट्स नेहमीच चांगले असतात. मात्र, हा तुमचा गैरसमज असून स्किन केअर प्रोडक्ट्स तुमच्या त्वचेवर किती आणि काय परिणाम होईल हे त्यातील घटकांवर अवलंबून असते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Facial Yoga benefits : सुंदर आणि तरूण त्वचेचं रहस्य आहे फेशियल योगा; जाणून घ्या करण्याची योग्य पद्धत