(Source: Matrize)
Skin Care Tips : प्रदूषणामुळे त्वचेचं नुकसान होतंय? 'अशी' घ्या तुमच्या त्वचेची काळजी
Skin Care Tips : या दिवसांत मुरुम, पुरळ आणि चेहऱ्यावर खाज येण्यासारख्या समस्यांना बहुतांश लोकांना सामोरे जावे लागतेय.
Skin Care Tips : हिवाळ्याचे दिवस हळूहळू जवळ येऊ लागले आहेत. त्यानुसार वातावरणात देखील बदल होताना दिसतोय. अनेक ठिकाणी हवेचे प्रदूषण पसरू लागले आहे. हळूहळू हवेची गुणवत्ताही खालावू लागली आहे. काही दिवसांत हवेची गुणवत्ता आणखी बिघडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. खराब हवेमुळे आरोग्य तर बिघडतेच पण त्याचबरोबर त्वचेवर (Skin Care Tips) देखील बदलत्या हवामानाचा परिणाम होतो.
या दिवसांत मुरुम, पुरळ आणि चेहऱ्यावर खाज येण्यासारख्या समस्यांना बहुतांश लोकांना सामोरे जावे लागतेय. अशा वेळी त्वचेला हानिकारक हवा आणि प्रदूषकांपासून वाचवण्यासाठी प्रत्येकाने काही खास गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. यामुळे आज आम्ही तुम्हाला वाढत्या प्रदूषणात त्वचेची काळजी कशी घ्यायची ते सांगणार आहोत, जेणेकरून प्रदूषण आणि बदलत्या हवामानाचा तुमच्या त्वचेवर परिणाम होऊ नये.
वारंवार चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा
वाढत्या प्रदुषणात चेहऱ्यावर धूळ जमा होते. चेहरा तेलकट होतो. तसेच, चेहऱ्यावर इतर समस्या जाणवू लागतात. अशा वेळी आपला चेहरा वारंवार पाण्याने स्वच्छ धुणं गरजेचं आहे. दिवसातून किमान 2-3 वेळा चेहरा व्यवस्थित स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा. चेहरा व्यवस्थित स्वच्छ करण्यासाठी फेसवॉशने कमीतकमी 1 मिनिटं चेहऱ्याला मसाज करा. आणि नंतर चेहरा धुवा.
एन्टी पॉल्युशन फेस मास्क वापरा
वायू प्रदूषणामुळे हवेत अनेक हानिकारक घटक असतात, ज्यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत प्रदूषणविरोधी फेस मास्कचा वापर नक्की करा. यामुळे चेहऱ्याचा खडबडीतपणा दूर होईल आणि त्वचेलाही खूप आराम मिळेल.
मॉइश्चरायझर वापरणे थांबवू नका
बदलत्या ऋतूतही मॉइश्चरायझर वापरणे बंद करू नका. कारण या ऋतूत प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढू लागते. अशा परिस्थितीत त्वचेत कोरडेपणा येऊ शकतो. या कोरडेपणापासून तुमच्या त्वचेचे रक्षण करण्यासाठी मॉइश्चरायझरच तुम्हाला फार उपयोगी पडेल.
सनस्क्रीनचा वापर करा
प्रदूषण टाळण्यासाठी सनस्क्रीनचा वापर नक्कीच करा. तुम्ही घराबाहेर पडा किंवा पडू नका. पण चेहऱ्यावर सनस्क्रिन लावायला कधीही विसरू नका. यामुळे तुमची त्वचा हायड्रेटेड राहते.
चेहरा झाका
जर तुम्हाला प्रदूषणापासून तुमच्या चेहऱ्याचे संरक्षण करायचं असेल तर घराबाहेर पडताा नेहमी स्कार्फ बांधा.जर तुम्ही चेहरा झाकून बाहेर गेलात तर तुमच्या चेहऱ्यावर प्रदूषणाचा परिणाम होणार नाही तसेच त्वचेवर ओलावा कायम राहील.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :