Skin Care Tips : अँटी-एजिंग स्किन केअरसाठी कॉफी सर्वोत्तम पर्याय; घरच्या घरी कॉफीचा 'असा' वापर करा
Skin Care Tips : अँटी-एजिंग स्किन केअर रूटीनसाठी कॉफी देखील उत्तम आहे. कॉफीमध्ये तुम्ही अनेक प्रकारच्या नैसर्गिक गोष्टी मिसळून वापरू शकता.

Skin Care Tips : सुंदर (Skin) आणि नितळ त्वचा प्रत्येकालाच हवी असते. यासाठी अनेकजण अनेक पर्याय करतात. मात्र, हे उपाय फक्त तात्पुरते असतात. यापासून सुटका हवी असेल तर तुम्ही तुमच्या स्किनकेअर रुटीनमध्ये कॉफीचाही समावेश करू शकता. कॉफी (Coffee) तुमच्या त्वचेला स्क्रब करण्याचे काम करते. अँटी-एजिंग स्किन केअर रूटीनसाठी कॉफी देखील उत्तम आहे. कॉफीमध्ये तुम्ही अनेक प्रकारच्या नैसर्गिक गोष्टी मिसळून वापरू शकता. त्याच्या वापराने तुमची त्वचा निरोगी आणि तरुण दिसते. यामुळे तुमच्या त्वचेचे छिद्रही स्वच्छ राहतात. कॉफीमध्ये असलेले गुणधर्म तुम्हाला सुरकुत्या येण्याच्या समस्येपासून वाचवतात.
कॉफी डेड स्कीनच्या पेशी काढून टाकण्याचे काम करते. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो. तुमच्या त्वचेवर नैसर्गिक ग्लो आणण्यासाठी तुम्ही कॉफीमध्ये कोणत्या गोष्टी मिक्स करून वापरता येऊ शकतात या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
कोरफड आणि कॉफीची पेस्ट
तुम्ही कॉफी आणि कोरफड मिक्स करून पेस्ट बनवू शकता. ही पेस्ट मानेवर आणि चेहऱ्यावर लावू शकता. या पेस्टने काही वेळ त्वचेला मसाज करा. यानंतर तुमचा चेहरा स्वच्छ करा. कॉफी आणि कोरफडीची पेस्ट चेहऱ्यावर 20 मिनिटे राहू द्या. यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ करा. कॉफी आणि कोरफडीचा वापर 2 ते 3 वेळा चेहऱ्यासाठी करू शकता.
कॉफी आणि दुधाची पेस्ट
त्वचेसाठी तुम्ही कॉफी आणि दुधाची पेस्ट देखील वापरू शकता. ही पेस्ट काही वेळ चेहरा आणि मानेवर लावा आणि बोटांनी मसाज करा. यानंतर त्वचा एक्सफोलिएट करा. कॉफी आणि दुधाची पेस्ट त्वचेवर 20 मिनिटे राहू द्या. यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने स्वच्छ करा. हा पॅक तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो देखील आणेल.
कॉफी आणि केळीची पेस्ट
तुम्ही त्वचेसाठी कॉफी आणि केळीची पेस्ट देखील वापरू शकता. ही पेस्ट बनविण्यासाठी केळ्याच्या पेस्टमध्ये थोडी कॉफी पावडर घाला. ही कॉफी आणि केळीची पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. काही मिनिटे त्वचेवर मसाज करा. नंतर चेहरा स्वच्छ करा.
कॉफी आणि मधाची पेस्ट
तुम्ही कॉफी आणि मधाची पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावू शकता. ही पेस्ट थोडा वेळ चेहऱ्यावर लावा. मध आणि कोरफडच्या पेस्टमुळे त्वचेची छिद्रे खोलवर स्वच्छ होतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
