एक्स्प्लोर
Advertisement
सर्व्हे : ब्रेडमुळे कॅन्सरचा धोका!
मुंबई : आपल्या दैनंदिन खाण्यातील महत्त्वाचा घटक बनलेला ब्रेड जीवघेणा असल्याचं समोर आहे. ब्रेड, पिझ्झा हे पदार्थ कॅन्सरजन्स असल्याचा दावा सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेन्ट या संस्थेने केला आहे.
ब्रेड, पाव, बन पाव, पिझ्झा ब्रेड, बर्गर ब्रेड अशा सर्व घटकांमध्ये कॅन्सरजन्य केमिकल असल्याचा दावा सेंटर फॉर सायन्सने केला आहे. त्यासाठी संस्थेने दिल्लीतील विविध बेकरी आणि फास्ट फूट आऊटलेटमधील नमुने तपासले. धक्कादायक म्हणजे त्यापैकी 75 टक्के टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत.
पोटॅशियम ब्रोमेट, पोटॅशियम आयोडेट हे दोन्ही केमिकल कॅन्सरजन्य आहेत. या दोन्ही केमिकल्सचा वापर पीठ फुगवण्यासाठी केला जातो. पीठ फुगवल्यानंतर त्यात हे केमिकल उरत नाही असा दावा केला जात होता. पण उत्पादनांमध्ये त्याचं घातक प्रमाण आढळल्याचा संस्थेचा दावा आहे
केएफसी, पिझ्झा हट, डॉमिनोजमधील ब्रेडही धोकादायक
सीएसईने दिल्लीमध्ये 38 प्रकारचे ब्रेड तपासले, त्यातल्या 84 टक्के ब्रेडमध्ये ब्रोमेट आणि आयोडेट होतं. इतकंच नव्हे तर तुमचे फेव्हरेट डेस्टिनेशन असलेल्या केएफसी, पिझ्झा हट, डॉमिनोज, सब वे, मॅकडॉनल्ड्स या आऊटलेट्सच्या ब्रेडमध्येही हे दोन्ही केमिकल धोकादायक पातळीच्या वर असल्याचा दावा सीएसईचा आहे.
ब्रेड ही वस्तू आपल्या रोजच्या वापरातील आहे. घरी सँडविचसाठी किंवा अगदी मिसळीसोबतही ब्रेड हा हवाच. पण आता या संस्थेच्या अहवालाने आपण आजारांना निमंत्रण तर देत नाही ना? अशी शंका येणं स्वाभाविक आहे
केमिकलमुळे या रोगांना निमंत्रण
- या दोन्ही केमिकल्सच्या सेवनाने मूत्रपिंडाचे विकार होऊ शकतात.
- थायरॉईडसारख्या आजाराला आपण निमंत्रण देऊ शकतो.
- इतकंच नाही, तर केमिकलच्या अति सेवनाने कॅन्सरही होऊ शकतो.
परदेशात बंदी मात्र भारतात सर्रास वापर
अन्न प्रक्रिया सुरक्षित करण्यासाठी झटणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय संस्थेने 1989 साली ब्रोमेट हे घातक असल्याचा अहवाल दिला होता. त्यामुळे 1990 पासून कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, चीन, श्रीलंका, ब्राझील, नायजेरिया, पेरु, कोलंबिया अशा देशांमध्ये ही दोन्ही केमिकलवर बंदी आहे. पण आपल्या देशात अन्न प्रक्रियेला नियंत्रित करणारा कुचकामी कायदा हा आपल्याच जीवावर उठला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
अहमदनगर
भारत
नाशिक
Advertisement