Most Boring Person : जगातली सर्वात कंटाळवाणी व्यक्ती कोण? संशोधकांकडून यादी जाहीर
युनिव्हर्सिटी ऑफ इस्सेक्सच्या मानसशास्त्र विभागातील संशोधकांनी 500 लोकांच्या जीवनशैलीचा अभ्यास केला आहे. यामध्ये संशोधकांनी या लोकांच्या राहणीमानाचा आणि जीवनशैलीचा अभ्यास केला आहे.
Most Boring Person : जगातील सर्वात कंटाळवाणी व्यक्ती संशोधकांनी शोधून काढली आहे. प्रत्यक्षात ही एक व्यक्ती नसून इतरांना एखाद्या विशिष्ट प्रकारच्या कामाविषयी काय वाटतं? ते काम करणाऱ्या व्यक्तींविषयी काय वाटतं? या आधारावर युनिव्हर्सिटी ऑफ इस्सेक्सच्या मानसशास्त्र विभागाने हे संशोधन केलं आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ इस्सेक्सच्या मानसशास्त्र विभागातील संशोधकांनी 500 लोकांच्या जीवनशैलीचा अभ्यास केला आहे. या संशोधकांच्या अभ्यासानुसार, कंटाळवाण्या मानल्या जाणार्या वैशिष्ट्यांशी काय जुळते आणि कंटाळवाणे म्हणून पाहिल्यास एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर त्याचे कोणते परिणाम होऊ शकतात या गोष्टींचा अभ्यास करण्यात आला आहे.
हा अभ्यास करण्यासाठी 500 लोकांच्या काही सवयींचे निरीक्षण करण्यात आले आहे. यामध्ये त्यांचे राहणीमान, त्यांची विचारसरणी, वागणे, बोलणे, आवडी-निवडी यांचे निरीक्षण करून अभ्यास करण्यात आला आहे. याबरोबरच या व्यक्ती जे काम करतात त्या कामांविषयी इतर लोकांचं मत काय आहे? लोकांना कोणती कामं किंवा कोणती व्यक्ती कंटाळवाणी वाटते? याचा अभ्यास करण्यात आला आहे.
डॉ. विजेनंद व्हॅन टिलबर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यास करण्यात आला आहे. कंटाळवाण्या लोकांच्या एकाकीपणामुळे त्यांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्यामध्ये व्यसनाचा धोका अधिक असू शकतो. शिवाय मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात, असे डॉ. विजेनंद व्हॅन टिलबर्ग यांनी म्हटले आहे.
डॉ. विजेनंद व्हॅन दिलबर्ग सांगतात, "कंटाळवाणेपणाचा अभ्यास करणे खूप विनोदी गोष्ट आहे. परंतु, याचे वास्तविक जीवनावर खोलवर परिणाम होत आहेत. कंटाळवाणी कामं करत असलेल्या व्यक्तींकडे बघण्याचा किंवा त्यांच्यासोबत वागण्या आणि बोलण्याचा दृष्टीकोन इतरांनी बदलला पाहिजे. जेणेकरून आपल्या वागण्याचा त्यांच्यावर विपरित परिणाम होणार नाही."
संशोधनानुसार, जगातील सर्वात कंटाळवाणा व्यक्ती डेटा एंट्री कामगार आहे. याबरोबरच एखादा व्यक्ती दिवसभर टीव्ही पाहणे पसंद करतो. संशोधकांनी जाहीर केलेल्या यादीमध्ये अकाऊंटचं काम, विमा कंपनीचं काम, साफसफाई आणि बँकिंगची नोकरी कंटाळवाणी आहे. या उलट पत्रकारिता, आरोग्य, शिक्षण ही कामं खूप उत्साहात केली जातात.
महत्वाच्या बातम्या