एक्स्प्लोर

Republic Day 2025 Speech in Marathi: प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वात सोपं, उत्तम भाषण! तयारी करा पटापट, प्रेक्षकांकडून होईल टाळ्यांचा कडकडाट

Republic Day 2025 Speech in Marathi: यंदा प्रजासत्ताक दिनाच्या भाषणासाठी उत्तम भाषण शोधत असाल, तर आज आम्ही तुम्हाला काही निवडक, सर्वोत्तम भाषण सांगत आहोत

Republic Day 2025 Speech in Marathi: 26 जानेवारी म्हणजेच भारताचा प्रजासत्ताक दिन अवघ्या काही दिवसांवर आहे. यंदा भारत 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. 1950 साली याच दिवशी भारताची राज्यघटना लागू झाली. यासोबतच देशाचा विकास आणि प्रगतीसाठी कायदे लागू करण्यात आले होते. प्रजासत्ताक दिवस हा आपण सर्वांसाठी राष्ट्रीय उत्सव आहे. 26 जानेवारी रोजी दरवर्षी नवी दिल्लीतील इंडिया गेट येथे भव्य परेड समारंभ आयोजित करण्यात येतो. या दिवशी देशाच्या सांस्कृतिक विविधतेची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वाची झलक पाहायला मिळते, या दिवशी शाळा, कार्यालयांमध्येही अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक शाळांमध्ये वक्तृत्व स्पर्धाही आयोजित केल्या जातात. काही शाळांमध्ये नृत्य-संगीत, भाषण अशा स्पर्धांमध्ये मुले सहभागी होतात. यंदा प्रजासत्ताक दिनाच्या भाषणासाठी उत्तम भाषण शोधत असाल, तर आज आम्ही तुम्हाला काही निवडक, सर्वोत्तम भाषण सांगत आहोत. हे भाषण दिल्यानंतर सर्वजण तुम्हाला टाळ्यांचा कडकडाट करतील. तुमच्या भाषणाची सुरुवात अशी करा.

तुम्हीही या प्रजासत्ताक दिनी भाषण करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही खाली दिलेल्या भाषणाची मदत घेऊ शकता.

प्रजासत्ताक दिन मराठी भाषण

आदरणीय अतिथिगण, मुख्यध्यापक, शिक्षक व आजच्या या शुभ मुहूर्तावर जमलेल्या सर्व मित्र मैत्रिणीना माझा नमस्कार. मित्रानो आज आपण येथे भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत. प्रतिवर्ष 26 जानेवारीला साजरा केला जाणारा प्रजासत्ताक दिन, भारताच्या राष्ट्रीय उत्सवाप्रमानेच आहे. प्रत्यक भारतीय या सणाला पूर्ण जोश, उत्साह आणि सम्मानाने साजरा करतो. 

स्वातंत्र्याच्या जवळपास 2 वर्ष 11 महीने आणि 18 दिवसानंतर 26 जानेवारी 1950 ला भारताच्या संविधनाला संविधान सभेत पास करण्यात आले होते. या दिवसा नंतर प्रतिवर्ष भारतीय 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करतात. भारताचे प्रथम राष्ट्रपति डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी म्हटले होते की "आपल्या महान आणि विशाल देशाचे अधिकार या एक संविधानात सामावलेले आहेत. हे संविधान देशातील सर्व पुरुष आणि महिलांच्या कल्याणाची जवाबदारी घेत आहे. 

आजचा हा दिवस सर्वात श्रेष्ठ आहे, आज आपण आपल्या देशाची प्रतिष्ठा, स्थिति, धन आणि मानवतेच्या संरक्षण करण्याची जवाबदारी घ्यायला हवी. पुन्हा एकदा सर्वाना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. जय हिन्द जय भारत.  

प्रजासत्ताक दिन मराठी भाषण

आज आपण सर्व येथे भारताच्या 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमले आहेत. आजच्या शुभ दिवसाला सरकार, राज्य सरकार, सरकारी कार्यालय, औद्योगिक वर्ग, विविध संस्थांन इत्यादी आपापल्या पद्धतीने साजरा करतात. या दिवशी कुठे प्रजासत्ताक दिन परेड होते तर कुठ कुठे सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा होतात.

महान स्वातंत्र्यसैनिकांच्या अथक प्रयत्नानंतर 26 जानेवारी 1950 ला भारत स्वशासित झाला. म्हणजेच भारतीयांनी सत्ता इंग्रजांच्या हातून स्वतःच्या हाती घेतली. याच दिवशी आपले संविधान लागू झाले. 1950 पासून ते आजपर्यंत 76 वर्षात देशाची खूप प्रगती झाली. परंतु अजूनही खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्याना बदलवणे आवश्यक आहे. आपल्या देशात भ्रष्टाचार, जात-पात, निरक्षरता, प्रदूषण, रोगराई आणि गरीबी सारखे समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत. या सर्व समस्या दूर करणे आपले कर्तव्य आहे. जर आपल्याला या सर्व समस्या दूर करायच्या असतील तर त्यासाठी आधी आपण सर्वांना एकजूट व्हावे लागेल व सोबत मिळून कार्य करावे लागेल.

 प्रजासत्ताक दिन पूर्ण देशात साजरा केला जातो पण या दिवसाचे मुख्य आयोजन आपल्या देशाची राजधानी दिल्ली येथे केले जाते. या दिवशी सर्वात आधी देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती इंडिया गेट जवळ असलेल्या अमर जवान ज्योती येथे देशासाठी शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली देतात. यानंतर भव्य अशी सैन्य परेड काढली जाते, जी देशाची एकता अखंडता आणि सेनेची ताकत पूर्ण जगाला दाखवली जाते. प्रजासत्ताक दिन सर्व भारतीयांमध्ये आनंद, उल्ल्हास आणि नवीन चेतना भरतो. देशवासीयांना हा संकल्प घ्यायला पण प्रेरित करतो की ते शहीद जवानाच्या बलिदानाला व्यर्थ नाही जाऊ देणार आणि आपल्या देशाची सुरक्षा, गौरव आणि उत्थानासाठी सदैव कार्यरत राहतील.

प्रजासत्ताक दिन भाषण (शिक्षकांसाठी) 

व्यासपीठावर उपस्थित माननीय मुख्य अतिथी, आदरणीय मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व पालक वर्ग आणि माझे प्रिय मित्रांनो. या दिवशी आपण भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत. आज मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाबद्दल काही दोन शब्द सांगणार आहे. आपण शांतचित्ताने माझे भाषण एकावे ही नम्र विनंती.

आपला देश भारताचा प्रजासत्ताक दिवस 1950 पासून प्रति वर्ष 26 जानेवारी ला साजरा केला जातो. कारण याच दिवशी आपला देश भारत प्रजासत्ताक देश म्हणून घोषित करण्यात आला होता आणि याच दिवशी अनेक वर्षानंतर भारताची राज्यघटना अस्तित्वात आली होती. भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 ला मिळाले आणि जवळपास अडीच वर्षानंतर भारत प्रजासत्ताक देश म्हणून घोषित झाला. भारताच्या इतिहासात प्रजासत्ताक दिनाचे महत्व फार जास्त आहे कारण हाच दिवस आपल्याला स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करून देतो. 

प्रजासत्ताक म्हणजे देशातील प्रजेच्या हातात असलेली सत्ता आणि अश्या देशात आपला नेता निवडण्याचे अधिकार हे प्रजेलाच असतात. प्रति पाच वर्षात निवडणुका होतात व लोकांच्या आवडीचे उमेदवार निवडले जातात. प्रजासत्ताक राष्ट्राची ही विशेषता असते की तेथे प्रजेद्वारा निवडलेले सरकार राज्य करते. परंतु देशाला स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक करण्यासाठी आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी अथक परिश्रम केलेले आहेत. आपल्या देशासाठी दिलेले त्यांचे बलिदान आपण कधीही विसरू शकत नाही.

प्रजासत्ताक दिन भाषण 

मंचावर उपस्थित सर्व आदरणीय अतिथिगण, आपल्या विद्यालयाचे मुख्यध्यापक, सर्व पालक मंडळी व जमलेल्या सर्व विद्ययार्थयाना प्रजासत्ताक दिवसाच्या शुभेच्छा. 

सोबतच आपल्या देशासाठी, देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी ज्या ज्या वीरांनी प्राणांची आहुति दिली त्यांना शत शत नमन. 15 ऑगस्ट 1947 ला जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तो दिवस म्हणजेच दीडशे वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त झालेल्या भारतासाठी एक नवीन पहाट होती आणि ज्याप्रमाणे सकाळी लवकर उठल्यावर शरीरात नवीन ऊर्जा निर्माण झालेली असते त्याच पद्धतीने देशाचे सर्व नागरिक व नेते देशाला नवीन स्वरूप देण्यासाठी नव उर्जेने ओतप्रोत होते. 26 जानेवारी 1950 ला आपले संविधान लागू झाले, हा दिवस आपल्या देशाचा प्रथम प्रजासत्ताक दिन होता. 

'प्रजासत्ताक' हा शब्द दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे. 'प्रजा' अर्थात जनता व 'सत्ताक' म्हणजे सत्ता. याचा अर्थ होतो प्रजेद्वारे निवडलेली सत्ता. जेव्हा भारत प्रजासत्ताक झाला तेव्हा पश्चिमेकडील देशांनी यावर टीका करीत म्हटले की भारतात कधीही "लोकशाही" यशस्वी होणार नाही. ते असे मानत असत की भारतीयांना गुलामगिरी ची सवय झालेली आहे. परंतु त्यांना अजिबात कल्पना नव्हती की एकेकाळी विश्वगुरु असलेला भारत व भारतीय एकजूट होऊन कुठलेही कार्य पार पाडू शकतात. एवढेच नव्हे संपूर्ण जगाला आपल्या समोर नतमस्तक देखील करू शकतात. आणि याचाच परिणाम आहे की आज 76 वर्षानंतरही आपला देश प्रजासत्ताक आहे. व आपला देश आज जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळखला जातो. 

स्वातंत्र्या नंतरही आपल्या देशाने बऱ्याच संकटाचा सामना केला, ज्यातील सर्वात मोठे संकट म्हणजे आपल्या देशाचे विभाजन होय. या दरम्यान झालेल्या दंग्यामध्ये लाखों लोक मारले गेलेत. सोबतच विभाजनामुळे देशात गरीबी, बेरोजगारी या सारख्या समस्यामध्ये पण वाढ झाली. परंतु या सर्व संकटना दूर करत भारताने आज इतका विकास केला आहे की चंद्र आणि मंगळवार पोहोचणाऱ्या काही निवडक देशामध्ये भारत समाविष्ट आहे. आशिया खंडातील भारत दुसऱ्या क्रमांकाची व जगात पाचव्या आर्थिक महाशक्ती आहे. 

आज तुम्हाला सांगू इच्छितो कोणतेही राष्ट्र स्वतः महान नसते त्या राष्ट्रामध्ये राहणारे लोक त्यांचा प्रामाणिकपणा, कष्ट करण्याची इच्छा, सत्यनिष्ठा आणि नैतिकता इत्यादि गोष्टी देशाला महान बनवत असतात.  स्वामी विवेकानंद म्हणत असतं की तो व्यक्ति ज्याचे हृदय दुसऱ्याचे दुख पाहून दुखी होत नाही व जो व्यक्ति शिक्षित असूनही समाज व राष्ट्राबद्दल विचार करीत नाही तो दगडाप्रमाणे असतो. आणि दगडावर कधी फूल उगत नाही. म्हणून जर बनायचे असेल तर भारत माते प्रमाणे माती बना, मातीवर वेगवेगळे सुंदर फूल व पिके उगवतील व आपला आनंद इतराना वाटतील. 

आज मला इथे येऊन दोन शब्द बोलण्याची तुम्ही संधी दिली त्याबद्दल सर्वाचे धन्यवाद. मी सर्व विद्यार्थ्याच्या यशस्वी आयुष्यासाठी प्रार्थना करतो व एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद..

प्रजासत्ताक दिन भाषण - (सर्वांसाठी)

आदरणीय व्यासपीठ.. ईश्वरतुल्य गुरुजन वर्ग.. आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो.. मी...आज तुम्हाला प्रजासत्ताक दिनानिमित्त दोन शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. सर्व प्रथम आपण सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा मला या ठिकाणी भाषण करण्याची संधी आणि मार्गदर्शन केल्याबद्दल मी माझे वर्गशिक्षक आणि मुख्यद्यापक यांचा आभारी आहे. आज आपण येथे आपला प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. प्रजासत्ताक दिनाला गणराज्य दिन असेही म्हणतात. गणराज्य म्हणजे प्रजेचे राज्य होय. तसं पाहायला गेलं तर भारतीय लोक सण उत्सव साजरे करायला नेहमीच अग्रभागी असतात. पण सर्व भारतीयांना अभिमान वाटावा असे काही राष्ट्रीय सणही आपण साजरे करीत असतो. या राष्ट्रीय सणांना सर्व धर्मीयाद्वारे साजरे केले जाते. या सणापैकी एक म्हणजे प्रजासत्ताक दिन होय. 

आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. पण त्यावेळी आपल्याकडे स्वतःचे संविधान अर्थात राज्य घटना नव्हती. आपल्या देशाचे स्वतः चे संविधान तयार करण्यासाठी 28 ऑगस्ट 1947 रोजी एक समिती नेमण्यात आली. या समिती मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद इत्यादी प्रमुख सदस्य होते. या समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते तर संविधान निर्माण समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. हा देश कोणताही धर्मग्रंथावर चालत नसून तो सर्व धर्म समान असलेल्या संविधानावर चालतो असे विचार असणाऱ्या बाबासाहेबांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसात जगातील सर्वात मोठी राज्यघटना लिहून तयार केली. आणि यामुळेच डॉ. बाबासाहेबाना 'भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार' म्हटले जाते. 

23 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय घटक संघटनेने राज्यघटनेचा स्वीकार करून भारतीय संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी 26 जानेवारीची निवड केली. या मागील कारण असे होते की याच दिवशी 1930 साली स्वातंत्र्यपूर्व काळात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. या घटनेची आठवण म्हणून 26 जानेवारी हा दिवस राज्यघटना अमलात आणण्यासाठी निवडला गेला. आणि तेव्हापासून एका नव्या पर्वाची सुरुवात झाली व आपला भारत एक प्रजासत्ताक देश बनला आणि म्हणूनच आपण 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.

26 जानेवारी च्या दिवशी भारताची राजधानी दिल्ली येथे ध्वजारोहण करून देशाचे पंतप्रधान  लाल किल्ल्यावरून राष्ट्राला उद्देशून भाषण देतात. या समारंभाचा मुख्य कार्यक्रम दिल्ली येथे होतो. या कार्यक्रमात भारतातील सर्व घटक राज्य भाग घेतात. भारताच्या सर्व क्षेत्रातील वैभवाचे दर्शन घडवणारी एक मोठी मिरवणूक काढली जाते. याशिवाय प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात व गावागावात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा होतो. या दिवशी सर्व देश वासी आपले घर, ऑफिस व गाड्या यांना तिरंगी रंगाचे फुगे व झेंडे लावतात. काही लोक हा दिवस घरीच साजरा करतात तर काही सामाजिक कार्यक्रमामध्ये जातात. या दिवशी शासकीय तसेच खासगी दोघी क्षेत्रांना सुट्या असतात. या दिवशी शाळेमध्ये निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या जातात . देशभक्ती गीते वाजवली जातात. या दिवशी सर्व विद्यार्थी आनंदाने हातात तिरंगा धरून जयघोष करतात. 

या दिनी शाळेतील धाडसी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते केला जातो. शाळेतर्फे मुलांना चॉकलेट आणि खाऊ दिला जातो. अशा पद्धतीने हा दिवस देशभर साजरा केला जातो. पण फक्त उत्साहात हा दिवस साजरा केल्याने आपली जबाबदारी संपत नाही. तर आजच्या या दिवसाकडून व देशाच्या स्वतंत्र आणि प्रजासत्ताकासाठी कार्य करणाऱ्या सर्व महान नेत्यांकडून प्रेरणा घेऊन आपण आपल्या देशाला अधिक समृध्द बनवले पाहिजे व आपल्या देशाच्या प्रगतीसाठी कार्य केले पाहिजे. 

मित्रानो एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. तुम्ही माझे भाषण शांतचित्ताने ऐकून घेतले त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद जय भारत..

हेही वाचा>>>

Women Health: महिलांनो..पहाटेची 'ही' वेळ अत्यंत जीवघेणी, हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण अधिक, 'ही' लक्षणं तुम्हाला नाही ना? जाणून घ्या

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Budget 2025 : गुड न्यूज, 10 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होणार?  अर्थसंकल्पात मोठा निर्णय होण्याची शक्यता
पगारदारांना दिलासा मिळणार? 10 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होण्याची शक्यता, अर्थसंकल्पात निर्णय होणार?
Horoscope Today 24 January 2025 : आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
Maharashtra Cyber : महाराष्ट्र सायबरची दमदार कामगिरी, गुन्हेगारांना दणका, सर्वसामान्यांचे 119 कोटी रुपये वाचवले
महाराष्ट्र सायबरची दमदार कामगिरी, गुन्हेगारांना दणका, सर्वसामान्यांचे 119 कोटी रुपये वाचवले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 At 7AM 24 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्याSpecial Report  Saif Attacker : सैफचा सीसीटीव्हीतील आणि अटकेतील हल्लेखोर एक नाही?ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 24 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सWalmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Budget 2025 : गुड न्यूज, 10 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होणार?  अर्थसंकल्पात मोठा निर्णय होण्याची शक्यता
पगारदारांना दिलासा मिळणार? 10 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होण्याची शक्यता, अर्थसंकल्पात निर्णय होणार?
Horoscope Today 24 January 2025 : आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
Maharashtra Cyber : महाराष्ट्र सायबरची दमदार कामगिरी, गुन्हेगारांना दणका, सर्वसामान्यांचे 119 कोटी रुपये वाचवले
महाराष्ट्र सायबरची दमदार कामगिरी, गुन्हेगारांना दणका, सर्वसामान्यांचे 119 कोटी रुपये वाचवले
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Embed widget