Travel : जिथे पांडवांची सर्व पापं नष्ट झाली, एक प्राचीन शिव मंदिर! रंजक आख्यायिका जाणून व्हाल थक्क, ऑक्टोबरमध्ये करा प्लॅन!
Travel : हे शिवमंदिर हिमालयाच्या कुशीत वसलेले आहे, सप्टेंबर-ऑक्टोबरच्या आल्हाददायक वातावरणात जाण्याचा बेत आखू शकता.
Travel : जगभरात अशी मंदिरं आहेत. ज्याबद्दल अनेक पौराणिक आख्यायिका सांगितल्या जातात. ज्यापैकी अनेक मंदिरं तर रहस्यमयी असतात. आज आपण अशा एका भगवान शिव मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याचा संबंध रामायण-महाभारताशी जोडला जातो. तर अनेक पौराणिक कथेनुसार हे मंदिर पांडवांनी बांधल्याचं सांगण्यात येते. जर तुम्ही पर्यटनप्रेमी असाल तर सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये इथले हवामान आल्हाददायक असते, हिंदूंच्या श्रद्धेचे केंद्र असलेले हे ठिकाण पर्यटनाच्या दृष्टिकोनातूनही खूप खास आहे. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी या मंदिराशी संबधित प्रत्येक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत.
निसर्ग सौंदर्य जवळून अनुभवायचाय?
आम्ही ज्या मंदिराबद्दल बोलत आहोत, ते मंदिर म्हणजे हिमालयाच्या भव्य दऱ्यांमध्ये वसलेले तुंगनाथ मंदिर... हे भगवान शिवाला समर्पित असलेले अतिशय प्राचीन मंदिर आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 3680 मीटर उंचीवर असलेले हे मंदिर उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात आहे. हे शिवमंदिर पंच केदारांपैकी एक आहे. देवभूमी उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात असलेले तुंगनाथ मंदिर हे जगातील सर्वात उंच शिव मंदिर आहे. येथून तुम्ही हिमालयाच्या सुंदर दऱ्या पाहू शकता आणि शांत वातावरणात निसर्ग जवळून अनुभवू शकता. तुंगनाथ मंदिरापर्यंत ट्रेक करणे निश्चितच अवघड आहे, पण येथील दृश्य अतिशय सुंदर आहे. निसर्ग सौंदर्य जवळून पाहायचे असेल तर तुंगनाथ मंदिर हे सर्वोत्तम ठिकाण आहे.
जिथे पांडवांनी केले पापांचे प्रायश्चित्त
असे मानले जाते की, हे मंदिर पांडवांनी बांधले होते. एका पौराणिक कथेनुसार, महाभारत युद्धातील नरसंहारानंतर 5 पांडव त्यांच्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी हिमालयाच्या प्रवासाला निघाले आणि यावेळी त्यांनी तुंगनाथ येथे भगवान शंकराची तपश्चर्या केली आणि येथे शिवलिंगाची स्थापना केली. पंच केदार पैकी एक असलेल्या तुंगानाथला जाण्यासाठी तुम्हाला खडकाळ रस्त्यावरून जावे लागते. साधारणपणे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात येथील हवामान चांगले असते, अशा परिस्थितीत तुंगानाथ महादेवाच्या सहलीशी संबंधित प्रत्येक तपशील या लेखात आपण सविस्तरपणे सांगूया.
महाभारत काळात बांधले गेले मंदिर?
एका आख्यायिकेनुसार तुंगनाथ मंदिर महाभारत काळात बांधले गेले. या पवित्र मंदिराचा पाया पांडवांचा पराक्रमी योद्धा अर्जुन याने घातला होता. असे मानले जाते की हजारो वर्षांपूर्वी पांडवांनी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी हे मंदिर बांधले होते. महाभारताच्या भयंकर युद्धात आपले नातलग गमावल्यानंतर पांडव नर हत्येच्या ओझ्याखाली दाबले गेले. ऋषी व्यासांच्या सूचनेनुसार, पांडवांनी त्यांच्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी भगवान शिवाची पूजा केली आणि या पवित्र स्थानावर एक भव्य मंदिर बांधले. असे मानले जाते की भगवान शिवाच्या कृपेने पांडवांची सर्व पापं धुतली गेली.
तुंगानाथ मंदिरात कसे जायचे?
तुंगनाथ मंदिरात जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. तुम्ही येथे विमान, रेल्वे किंवा रस्त्याने प्रवास करू शकता.
विमान प्रवास
तुंगनाथला जाण्याचा सर्वात सोयीचा मार्ग म्हणजे हवाई मार्ग. डेहराडूनचे जॉली ग्रांट विमानतळ तुंगनाथसाठी सर्वात जवळचे विमानतळ आहे. विमानतळावरून चोपट्याजवळील पांगर गावात जावे लागते. हा प्रवास सुमारे 220 किलोमीटरचा असेल आणि तो पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सुमारे 9 तास लागतील.
रेल्वे प्रवास
जर तुम्हाला ट्रेनने प्रवास करायचा असेल तर तुम्ही डेहराडून, हरिद्वार किंवा ऋषिकेशला जाऊ शकता. तुंगनाथसाठी ही सर्वात जवळची रेल्वे स्थानके आहेत. या स्थानकांवरून तुम्ही बस किंवा टॅक्सीने चोपट्याला पोहोचू शकता.
रस्त्याने
जर तुम्ही तुमच्या कारने प्रवास करत असाल तर तुम्हाला दिल्लीहून डेहराडून किंवा हरिद्वार मार्गे पांगर गावात जावे लागेल. पांगरहून तुम्ही चोपट्यापर्यंत स्थानिक वाहतूक वापरू शकता. ऋषिकेश ते तुंगानाथ हे अंतर अंदाजे 209 किलोमीटर आहे.
तुंगनाथ मंदिराची आरती आणि दर्शनाची वेळ
- तुंगानाथ मंदिरात आरतीची निश्चित वेळ नाही. कारण मंदिर खूप उंचावर आहे आणि येथील हवामान अचानक बदलू शकते. याशिवाय येथे येणाऱ्या भाविकांची संख्या ऋतूनुसार आणि दिवसाच्या वेळेनुसार बदलते.
- सकाळची आरती पहायची असेल तर उघडण्याच्या वेळेनंतर कधीतरी मंदिरात पोहोचावे. साधारणपणे, मंदिर सकाळी 5:00 ते 6:00 दरम्यान उघडते.
- संध्याकाळची आरती मंदिर बंद होण्याच्या काही वेळापूर्वी होते. मंदिराच्या पुजाऱ्याला याबाबत विचारून तुम्ही नेमकी वेळ जाणून घेऊ शकता.
तुंगानाथ मंदिरात जाण्याचा प्लॅन कधी करावा?
जर तुम्हाला तुंगनाथ मंदिरात जायचे असेल तर मे ते जून आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान सर्वोत्तम वेळ आहे. या काळात हवामान आल्हाददायक राहते आणि तुम्ही सहज ट्रेकिंग करू शकता. नोव्हेंबरमध्ये देवतांच्या प्रस्थानाबरोबरच मंदिराचे दरवाजेही बंद होतात, तसेच हिमालयातील प्रचंड बर्फवृष्टीमुळे येथे जाणे कठीण होते, त्यामुळे मंदिर बंद होते.
या गोष्टी लक्षात ठेवा
- चोपटा ते तुंगानाथ येथे थांबण्यासाठी विशेष जागा नाही, त्यामुळे तुम्हाला पूर्ण तयारी करावी लागेल.
- पुरेसे पाणी, चांगले ट्रेकिंग शूज, उबदार कपडे, रेनकोट आणि एक लहान वैद्यकीय किट सोबत ठेवा.
- दुर्गम रस्त्यांमुळे तुमच्या शरीरातील ऊर्जाही कमी होऊ शकते,
- त्यामुळे चॉकलेट, बिस्किटे, ड्रायफ्रूट्स आणि ग्लुकोज यासारख्या काही आवश्यक गोष्टी सोबत ठेवा.
- हिमवर्षावात चालण्यासाठी वॉकिंग स्टिक आणि वॉटरप्रूफ ट्रेकिंग शूज देखील तुमच्यासोबत असावेत.
हेही वाचा>>>
Ganeshotsav Travel: कलियुगात गणेशाने घेतला अवतार? एक असं गणेश मंदिर, जिथे 'कल्की' अवतारात होते गणेशाची पूजा, 'या' गोष्टी जाणून आश्चर्यचकित व्हाल
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )