(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Navratri 2023 Live Updates : आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात, साडेतीन शक्तीपीठ मंदिरांसह घरोघरी घटस्थापना
Navratri 2023 Live Updates : शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील शक्तीपीठ असलेल्या देवीच्या मंदिरात तसेच घरोघरी घटस्थापना केली जाते. या नऊ दिवसांत भाविकांची मंदिरात गर्दी दिसून येते.
LIVE
Background
Shardiya Navratri 2023 Live Updates : आजपासून शारदीय नवरात्रीला (Navratri 2023) सुरूवात झाली आहे. दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत साजरी केली जाते. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील शक्तीपीठ असलेल्या देवीच्या मंदिरात तसेच घरोघरी घटस्थापना केली जाते आणि या नऊ दिवसांमध्ये भाविकांची या मंदिरात गर्दी दिसून येते. आपल्या देशात देवींना सर्वोच्च स्थान आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठ असलेल्या देवींच्या मंदिरांसोबतच इतर महत्त्वाच्या मंदिरात उत्सव कशाप्रकारे साजरा होत आहे, जाणून घ्या,
Navratri 2023 : तुळजाभवानी मंदीर संस्थानकडून व्हीआयपी दर्शनाचा गोंधळ, व्हीआयपी दर्शन बंद
धाराशिव - तुळजाभवानी मंदीर संस्थानकडून व्हीआयपी दर्शनाचा गोंधळ. व्हीआयपी दर्शन बंद
मंदीर कार्यालयात घोषणाबाजी करीत सुरु केले आंदोलन
गेल्या 3 तासापासून 500 रुपये सशुल्क दर्शन रांगेत भाविकांची गर्दी
स्थानिक पुजारी व काही खासगी लोकांनी पास रांग सोडून घेऊन जात असल्यामुळे गोंधळ उडाला
तुळजाभवानी मंदीर संस्थानने बंद केले व्हीआयपी दर्शन पास
Navratri 2023 : माहूरला रेणुकामातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, वाहनचालकांचा जीव मुठीत धरून प्रवास
Navratri 2023 : शारदीय नवरात्र उत्सवाला आज पासून सुरूवात झाली साडे तीन शक्तीपीठा पैकी मूळ पीठ असलेल्या माहूरच्या रेणुका मातेला भाविकांची गर्दी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सकाळी 11.30 वाजता देवीची घटस्थापना होणार आहे तसेच नवरात्र निमित्याने माहूरचे मंदिर हे रात्री 10 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेनवरात्र निमित्त माहूरला रेणुकामातेचा दर्शनासाठी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होते. माहूरला जाताना पैनगंगा नदी वरील पुलाचे दोन्ही बाजूचे कठडे नसल्याने अपघात होऊ शकते. तसेच या पुलावरून वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
Navratri 2023 : वणी सप्तशृंगी देवी मंदिर संस्थानच्या कार्यालयात आभूषणांच्या महापूजेला सुरुवात
Navratri 2023 : साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्य शक्तीपिठ असलेल्या नाशिकच्या वणी येथील सप्तशृंगी गडावर नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असतो. आज सकाळी 7 वाजता मंदिर संस्थानच्या कार्यालयात देवीच्या आभूषणांच्या महापूजेला सुरुवात झाली आहे, संस्थानचे अध्यक्ष बी व्ही वाघ यांच्या हस्ते सपत्निक ही पूजा पार पडते आहे. महापुजेनंतर थोड्याच वेळात संस्थानच्या कार्यालयापासून ते मंदिरापर्यंत या आभूषणांची ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढली जाणार आहे. त्यानंतर मंदिरात घट स्थापना केली जाऊन महाआरती पार पडेल. आज रविवार देखिल असल्याने पहिल्याच दिवशी भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतील असा अंदाज असून संस्थान तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
Navratri 2023 : श्री महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठ्या संख्येने हजेरी, मोठ्या रांगा
Navratri 2023 : आज नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस असून मोठ्या संख्येने भाविकांनी श्री महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावली आहे. भाविकांच्या प्रचंड संख्येमुळे दर्शनासाठी मोठी रांग आपल्याला पाहायला मिळत आहे. ठाणे, नवी मुंबईसह मुंबई आणि शहराच्या विविध भागातून लोक दर्शनासाठी आले आहेत. सकाळपासूनच भाविक रांगेत उभे असून नऊ दिवस याच रांगा पाहायला मिळणार आहेत. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.
Navratri 2023 : नवरात्रीनिमित्त सजले चंद्रपूरचे ऐतिहासिक देवी महाकाली मंदिर, घटस्थापना करून देवीच्या नवरात्राला प्रारंभ, हजारो भाविकांनी केली गर्दी
Navratri 2023 : चंद्रपूरचे आराध्य दैवत असलेल्या देवी महाकालीच्या अश्विन नवरात्र उत्सवाला आज घटस्थापनेने उत्साहात प्रारंभ झाला आहे. नवरात्राच्या पहिल्याच दिवशी चांदागडच्या आईचे दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येत भाविक मंदिरात पहाटे पासून दाखल झाले आहेत. नवरात्री निमित्त लोकांचा उत्साह देखील ओसंडून वाहत असून हजारो भाविकांच्या उपस्थितीने मंदिर परिसर फुलुन गेला आहे. आज सकाळी देवीची विशेष पूजा करून घटस्थापना करण्यात आली. चौदाव्या शतकात गोंड राणी 'हिरातनी' आणि पंधराव्या शतकात राणी 'हिराई' ने बांधलेल्या या मंदिरात दर्शनासाठी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या पाच राज्यातील भाविक गर्दी करतात. पुढचे 9 दिवस देवीच्या दर्शनाला हजारो भक्त हजेरी लावणार आहे.