(Source: ECI/ABP News/ABP Majha)
New Year 2024 : 1 जानेवारी 2024 दिवस खूप खास! नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत शुभ दिवसाने, शुभ मुहूर्त, योग जाणून घ्या.
New Year 2024 : नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत शुभ दिवसाने होत आहे, या दिवशी योग्य पूजा, काही विशेष कार्य केले तर वर्षभर धन, सुख आणि समृद्धीची कमतरता भासणार नाही. जाणून घ्या
New Year 2024 : 2024 नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत शुभ दिवसाने होत आहे. वर्षाचा पहिला दिवस खूप खास मानला जातो, या दिवशी लोक आपल्या देवतेची पूजा करून दिवसाची सुरुवात करतात जेणेकरून संपूर्ण वर्ष शुभ राहील. कॅलेंडरनुसार 2024 हे वर्ष एका खास दिवसापासून सुरू होत आहे. या दिवशी योग्य पूजा आणि काही विशेष कार्य केले तर वर्षभर धन, सुख आणि समृद्धीची कमतरता भासणार नाही. पहिल्या दिवशी तिथी आणि नक्षत्रांचा विशेष मिलाफ तुम्हाला दु:ख, संकट आणि गरिबीपासून दूर ठेवेल, फक्त काही खास नियम पाळा. जर तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर 1 जानेवारी 2024 चा शुभ मुहूर्त, पूजा पद्धत जाणून घ्या
1 जानेवारी 2024 तिथी
पंचांगानुसार, पंचमी तिथी 1 जानेवारी 2024 रोजी असेल. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी 31 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11.55 पासून सुरू होत आहे. 1 जानेवारी 2024 रोजी दुपारी 02:28 वाजता पंचमी तिथी समाप्त होईल. यानंतर षष्ठी तिथी सुरू होईल. सोमवारपासून नवीन वर्ष सुरू होत आहे. अशा परिस्थितीत या दिवशी भगवान शिवाची पूजा करणे आणि काही खरेदी करणे चांगले मानले जाते.
1 जानेवारी 2024 मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त - सकाळी 05.25 ते 06.19
अभिजित मुहूर्त - दुपारी 12.04 - 12.45
विजय मुहूर्त - दुपारी 02.08 - 02.49
संधिप्रकाश मुहूर्त - सायं 05.32 - 06.00
निशिता मुहूर्त - रात्री 11.57 - 12.52 मध्यरात्री, 2 जानेवारी
1 जानेवारी 2024 शुभ योग
आयुष्मान योग - 1 जानेवारी 2024, 03.31 पहाटे - 2 जानेवारी 2024, 04.36 पहाटे
गजकेसरी योग - मेष राशीमध्ये गुरू-चंद्र संयोगाने गजकेसरी योग तयार होईल.
लक्ष्मी नारायण योग - या दिवशी शुक्र-बुध वृश्चिक राशीत असतील, त्यामुळे हा योग तयार होतो.
आदित्य मंगल योग - या दिवशी धनु राशीमध्ये सूर्य-मंगळ एकत्र राहतील, ज्यामुळे हा योग तयार होईल.
वर्ष 2024 च्या पहिल्या दिवसासाठी पूजा पद्धत
1 जानेवारी 2024 रोजी सर्वप्रथम सूर्योदयापूर्वी स्नान करून सूर्यदेवाला जल अर्पण करावे. सूर्य उपासनेने जीवनात प्रगतीचा मार्ग खुला होतो.
आता घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर देवी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे लावा. शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी मुख्य दरवाजावर घोड्याची नाळ लावणे शुभ मानले जाते.
आता भगवान शंकराला जलाभिषेक किंवा रुद्राभिषेक करा. सोमवार हा अभिषेकसाठी खास मानला जातो.
बेलाच्या पानांवर आपली इच्छा सांगा किंवा लिहा, आणि ते शिवलिंगाला अर्पण करा. असे म्हणतात की या उपायाने शिव प्रार्थना लवकर स्वीकारतात आणि पूर्ण करतात.
पार्वतीला लाल चुनरी द्या. यामुळे सौभाग्य वाढते. वैवाहिक जीवन आनंदी होईल.
सोमवारी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तांदूळ, पांढरे कपडे, पांढरी फुले, साखर, नारळ इत्यादी पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचे दान करावे. यामुळे कुंडलीतील चंद्र बलवान होतो आणि दोषही दूर होतात. संध्याकाळी पुन्हा शिवाची पूजा करावी.
वर्षाच्या पहिल्या दिवशी घरामध्ये बेलाचे रोप लावणे शुभ राहील. काळजी घेण्याची प्रतिज्ञा घ्या आणि दररोज पूजा करा.
बेलपत्राच्या रोपामुळे घरात सुख, शांती, समृद्धी आणि संपत्ती येते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: