Kojagiri Pournima 2023 : कोजागिरी पौर्णिमेला चंद्राला दूध कधी दाखवू शकता? चंद्रग्रहणाचे सुतक वैध ठरेल का? उपाय जाणून घ्या
Kojagiri Pournima 2023 : कोजागिरी पौर्णिमा आणि चंद्रग्रहण एकाच दिवशी आहे. अशात चंद्राला दूध दाखवण्याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. जाणून घ्या कोजागिरी पौर्णिमेला दूध दाखवण्याची योग्य वेळ
![Kojagiri Pournima 2023 : कोजागिरी पौर्णिमेला चंद्राला दूध कधी दाखवू शकता? चंद्रग्रहणाचे सुतक वैध ठरेल का? उपाय जाणून घ्या Kojagiri Pournima 2023 marathi news 28 october kheer milk after chandra grahan sutak kaal time Kojagiri Pournima 2023 : कोजागिरी पौर्णिमेला चंद्राला दूध कधी दाखवू शकता? चंद्रग्रहणाचे सुतक वैध ठरेल का? उपाय जाणून घ्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/28/588a35128e0413734a9de293c2f2e9191698464087570381_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kojagiri Pournima 2023 : यंदा कोजागिरी पौर्णिमा 28 ऑक्टोबर 2023 रोजी चंद्रग्रहणाच्या (Chandra Grahan 2023) छायेत साजरी केली जाईल. अश्विन महिन्यातील पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा असेही म्हणतात. परंतु यावेळी शरद पौर्णिमेला चंद्रग्रहण आहे, अशा स्थितीत चंद्राला दूध दाखवण्याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कोजागिरी पौर्णिमेला दूध दाखवण्याची योग्य वेळ, ग्रहणाची वेळ जाणून घ्या.
पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते
असे मानले जाते की, शरद पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते. यादरम्यान देवी सर्वांना जागृतिविषयी विचारते, म्हणजे कोण जागे आहे? मान्यतेनुसार, रात्री लक्ष्मीची पूजा करणाऱ्यांवर धनाचा वर्षाव होतो. दुसरीकडे, या पौर्णिमेला जे चंद्राला अर्घ्य देतात, तसेच चंद्रप्रकाशात दूध दाखवतात, त्यांना अमृताची प्राप्ती होते. कारण या दिवशी चंद्राच्या किरणांनी अमृताचा वर्षाव केला जातो.
कोजागिरी पौर्णिमेला चंद्राला दूध कधी दाखवणार?
यंदा 28 ऑक्टोबरला शरद पौर्णिमा असून त्याच दिवशी रात्री उशीरा चंद्रग्रहणही होत आहे. चंद्रग्रहणाचे सुतक 9 तास आधी सुरू होत असल्याने दुपारी 02.52 नंतर धार्मिक कार्य, स्वयंपाक आणि खाणे निषिद्ध असेल. अशा परिस्थितीत चंद्रग्रहणाच्या मोक्षानंतर तुम्ही खुल्या आकाशाखाली दूध किंवा खीर ठेवू शकता. चंद्रग्रहण 29 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 01.05 ते 02.23 पर्यंत राहील.
'या' उपायाने खीरला ग्रहणाचा परिणाम होणार नाही.
धार्मिक मान्यतेनुसार, सुतक ते ग्रहण होईपर्यंत खीर बनवू नये किंवा चंद्रप्रकाशात दूध ठेवू नये. अशा स्थितीत खीर बनवण्यासाठी सुतक कालावधी सुरू होण्यापूर्वी गाईच्या दुधात कुशा मिसळा. नंतर झाकून ठेवा. यामुळे सुतक काळात दूध शुद्ध राहील. नंतर तुम्ही खीर बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकाल.
ग्रहण पूर्ण झाल्यावर आंघोळ वगैरे करून दूध किंवा खीर बनवून चांदण्या रात्री मोकळ्या आकाशात चंद्रप्रकाशात सोडावी. चंद्रास्तानंतर खीर कुटुंबात प्रसाद म्हणून वाटून घ्या आणि स्वतः सेवन करा. अशाप्रकारे, ग्रहणाचा दूध किंवा खीरेवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही आणि दैवी गुणधर्म असलेल्या खीरचा लाभ तुम्हीही घेऊ शकाल.
कोजागिरी पौर्णिमेला खीर का बनवली जाते?
पौराणिक मान्यतेनुसार, शरद पौर्णिमेचा चंद्र इतर दिवसांपेक्षा आकाराने मोठा आणि औषधी गुणधर्म असलेला मानला जातो. या दिवशी पारंपारिकपणे गाईच्या दुधाची आणि तांदळाची खीर बनवली जाते. ती खीर रात्रभर चंद्रप्रकाशात ठेवली जाते, त्यामुळे त्या खीरमध्ये चंद्राचे औषधी आणि दैवी गुणधर्म शोषले जातात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा
Kojagiri Pournima 2023 : 28 ऑक्टोबरला कोजागिरी पूजा, चंद्रग्रहण! लक्ष्मीपूजन केव्हा आणि कसे करावे? विशेष उपाय जाणून घ्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)