एक्स्प्लोर

Ashadhi Wari : पालखीसाठी नाथनगरी सज्ज, शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज पालखीचं आज प्रस्थान

Ashadhi Wari 2023: पालखी ओटा व परिसराचा विकास झाल्यानंतर प्रथमच येथून पालखी प्रस्थान करणार आहे. यामुळे यंदाचा वारकऱ्यांचा अनुभव वेगळा राहणार आहे.

Ashadhi Wari 2023: शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज (Sant Eknath Maharaj) पालखी सोहळा आज (10 जून) रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी व छोट्या दिंड्याचे शुक्रवारपासून शहरात आगमन सुरू झाले. वारीत जाण्यासाठी वारकऱ्यांची महिनाभरापासून तयारी सुरू आहे. त्यामुळे यंदा वारीतील वारकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पालखी सोहळ्याचे यंदा 425 वे वर्ष असून पालखी सोहळ्याच्या रथाचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. पालखी ओटा व परिसराचा विकास झाल्यानंतर प्रथमच येथून पालखी प्रस्थान करणार आहे. यामुळे यंदाचा वारकऱ्यांचा अनुभव वेगळा राहणार आहे.

छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद व सोलापूर अशा 5 जिल्ह्यातून पालखी मार्गक्रमण करणार आहे. पंढरपूरपर्यंत एकूण 18 मुक्काम करून पायी दिंडी सोहळा 28 जून रोजी आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपूरला पोहोचणार आहे. नाथांच्या वारकऱ्यांच्या जवळपास 90 दिंड्या नाथांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होतात. 20 हजारपेक्षा जास्त वारकरी महिला व पुरुष 260 किलोमीटरचे अंतर पायी पार करून पंढरपूरला पोहोचतात. 

असे होणार पाच रिंगण सोहळे

पैठण ते पंढरपूर पालखी मार्गावर पाच 'रिंगण सोहळे' होणार आहेत. 13 जून रोजी मिडसावंगी येथे 'पहिले रिंगण' पार पडणार आहे. पारगाव घुमरे येथे 17  जूनला दुसरे तर 20 जून रोजी नांगरडोह गावात तिसरे रिंगण होईल. तर चौथे रिंगण 23  जूनला कव्हेदंड व पाचवे रिंगण 28 रोजी पंढरपूर येथे होणार आहे. 27  जून रोजी होळे येथील भीमा नदी पात्रात नाथांच्या पादुकांचा स्नान सोहळा होणार आहे. तसेच 29 जून रोजी पंढरपूर शहरात नगर प्रदक्षिणा पूर्ण करण्यात येणार आहे. संत एकनाथ महाराज यांचे पणजोबा संत भानुदास महाराज यांची विठ्ठल मंदिरात समाधी आहे. 2 जुलै रोजी मंदिरात परंपरागत पद्धतीने भानुदास महाराज पुण्यतिथी साजरी करून पालखी सोहळा परतीच्या प्रवासास रवाना होणार असल्याचे पालखी प्रमुख रघुनाथबुआ गोसावी यांनी सांगितले.

सकाळपासून जोरदार तयारी सुरु...

पैठण येथिल शांतब्रम्ह संत एकनाथ महाराज यांची पालखीचे आज प्रस्थान होणार आहे. सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळेस पैठण येथून पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. तब्बल 19 मुक्काम करत नाथांची पालखी पंढरपुरात दाखल होणार आहे.या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी सकाळपासून सुरु झाली आहे. पालखी रथाला आकर्षक अशी फुलांची आरस करण्यात आली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Ashadhi Wari: पालखीसाठी देहूनगरी सज्ज! आज होणार संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान, कसा आहे दिनक्रम अन् कुठे आहे मुक्काम?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान पोहोचल्यास मॅच लाहोर की अन्य मैदानावर?
चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेलचा स्वीकार, भारत पाक अंतिम फेरीत आमने सामने आल्यास मॅच कुठं होणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 05 PM : 3 डिसेंबर 2024: ABP MajhaMaharashtra CM Oath Devendra Fadnavis : शपथविधीसाठी नागपुरातील गोपाळ चहावाला यांना निमंत्रणMNS vs Marwadi Mumbai Girgaon : मुंबई भाजपची..मारवाडीच बोलायचं, मनसैनिकांनी दुकानदाराला धुतलं!Uddhav Thackeray : तयारीला लागा...मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरेंचे माजी नगरसेवकांना आदेश

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान पोहोचल्यास मॅच लाहोर की अन्य मैदानावर?
चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेलचा स्वीकार, भारत पाक अंतिम फेरीत आमने सामने आल्यास मॅच कुठं होणार?
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह जादा मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
Gold Silver Price : सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
Embed widget