Anant Chaturdashi 2023: यंदाची अनंत चतुर्दशी खास! विष्णुपूजा, गणेश विसर्जनाचा शुभ मुहूर्त जाणून घ्या
Anant Chaturdashi 2023: 28 सप्टेंबर 2023 रोजी अनंत चतुर्दशी आहे. या दिवशी गणेशोत्सवाची सांगता होते. अनंत चतुर्दशीला विष्णुपूजेचा शुभ मुहूर्त आणि गणेश विसर्जनाचा शुभ काळ जाणून घ्या.
Anant Chaturdashi 2023 : हिंदू धर्मात अनंत चतुर्दशीला विशेष महत्त्व आहे. यंदा अनंत चतुर्दशी 28 सप्टेंबर 2023 रोजी आहे. हा दिवस भगवान विष्णूला (Lord Vishnu) समर्पित आहे. या दिवशी गणेशोत्सवाची सांगता होते. बाप्पाला मोठ्या थाटामाटात निरोप दिला जातो, या दिवशी बाप्पाच्या मूर्तीचे नदी आणि तलावांमध्ये विसर्जन केले जाते. अनंत चतुर्दशीला विष्णूपूजेचा शुभ मुहूर्त आणि गणेश विसर्जनाचा शुभ काळ जाणून घ्या
अनंत चतुर्दशी 2023 मुहूर्त
भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी 27 सप्टेंबर 2023 रोजी रात्री 10:18 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 28 सप्टेंबर 2023 रोजी संध्याकाळी 06:49 वाजता समाप्त होईल.
विष्णू पूजेची वेळ - सकाळी 06.12 ते संध्याकाळी 06.49
अनंत चतुर्दशी 2023 गणेश विसर्जन मुहूर्त
सकाळी 10.42 - दुपारी 3.10
दुपारी 4.41 ते रात्री 9.10
सकाळी 12.12 - 1.42 दुपारी, 29 सप्टेंबर
अनंत चतुर्दशी विशेष का आहे? जाणून घ्या याचे महत्त्व
अनंत चतुर्दशी - श्री हरी विष्णूने जगाच्या रक्षणासाठी चौदा रूपे धारण केली होती, म्हणून हा सण विशेष मानला जातो. या दिवशी श्री हरी विष्णूच्या अनंत रूपांची विधीपूर्वक पूजा केली जाते. मनगटावर 14 गाठ असलेला धागा बांधला जातो. असे मानले जाते की असे केल्याने वाईट शक्ती जवळ येत नाही, व्यक्तीवर येणारे संकट टळते.
अनंत चतुर्दशीला आपण 14 गाठी रक्षासूत्र का बांधतो?
अनंत चतुर्दशीच्या तिथीला भगवान विष्णूची पूजा करून रक्षासूत्र बांधल्याने माणसाच्या सर्व वाईट गोष्टी दूर होतात, अशी धार्मिक मान्यता आहे. या 14 गाठी भगवान विष्णूच्या 14 रूपांचे प्रतीक मानल्या जातात. असे म्हटले जाते की, हे रक्षासुत्र मनगटावर बांधल्याने सर्व प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक समस्यांपासून आराम मिळतो. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो.
अनंत चतुर्दशीला रक्षासूत्र बांधण्याचा मंत्र
अनंन्तसागर महासमुद्रे मग्नान्समभ्युद्धर वासुदेव।
अनंतरूपे विनियोजितात्माह्यनन्तरूपाय नमो नमस्ते॥
यासाठी करतात गणेश विसर्जन
पौराणिक कथेनुसार, एकदा वेद व्यासजींना त्यांच्या बोलण्याच्या गतीनुसार जो महाभारत लिहू शकेल, अशा व्यक्तीची आवश्यकता होती. आणि त्यांना माहित होते की, हे काम फक्त श्रीगणेशच करू शकतात. अशा स्थितीत त्यांनी श्रीगणेशाचे आवाहन केले. गणेशजींनी त्यांचा प्रस्ताव मान्य केला. 10 दिवस महर्षी वेद व्यास न थांबता महाभारत सांगत राहिले आणि गणेशजी ते लिहीत राहिले. 10 दिवसांनंतर जेव्हा वेद व्यासजींनी पाहिले, तेव्हा त्यांना आढळले की, गणेशजींचे तापमान खूप वाढले आहे. अशा स्थितीत त्यांनी गणेशजींना तलावात आंघोळ घातली. तेव्हापासून गणपती विसर्जनाची प्रथा सुरू झाल्याचे मानले जाते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या
Ganesh Chaturthi 2023 : गणेशोत्सवादरम्यान 'या' शुभ गोष्टी घरी आणा, कधीही पैशाची कमतरता भासणार नाही